आतापर्यंत मासिक पाळीच्या दरम्यान पॅड्सचा वापर केला जात होता. परंतु आता पॅडला पर्याय म्हणून मेंस्ट्रुअल कप किंवा टॅम्पॉन असे ऑप्शन आले आहेत. कारण सध्या तरुण मुलींचा कल हा मेंस्ट्रुअल कप किंवा टॅम्पॉन वापरण्याकडे जात आहे. मात्र तुम्हाला सुद्धा मासिक पाळीच्या दरम्यान पॅड्सला राम राम करुन मेंस्ट्रुअल कप (Menstrual cup) वापरायचा असेल तर त्याचा उपयोग कसा करावा किंवा तो वापरल्यानंतर फेकून द्यायचा की नाही अशा सर्व गोष्टींबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. तर जाणून घेऊयात मासिक पाळीवेळी मेंस्ट्रुअल कपचा कसा उपयोग करावा.
मेंस्ट्रुअल कप म्हणजे काय?
मेंस्ट्रुअल कप हे एक प्रकारचे पुन्हा वापरता येणारे महिलांसाठी खास मासिक पाळीच्या वेळी तयार करणारे हायजीन प्रोडक्ट आहे. मेंस्ट्रुअल कप हे रबर किंवा सिलिकॉन पासून तयार केले जाते आणि याचा आकार लहान कप सारखा असतो. ते मासिक पाळीदरम्यान वजाइनामध्ये फिट केले जाते आणि यामध्येच पाळी वेळी शरिरातून निघणारे रक्त स्टोर होते. 100 टक्के मेडिकल ग्रेड सिलिकॉन पासून तयार करण्यात आलेला मेंस्ट्रुअल कप हा लहान, मध्यम आणि मोठा अशा आकारामध्ये येतो. त्यामुळे तुम्हाला जर मेंस्ट्रुअल कप खरेदी करायचा असेल तर त्यासंदर्भातील माहिती वाचा. या रियुजेबल कपला धुण्यासाठी तुम्हाला एक प्रकारचे लिक्विड ही दिले जाते.

मेंस्ट्रुअल कप वापरण्यापूर्वी पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा
तुम्हाला जर मेंस्ट्रुअल कप वापरायचा असेल तर सर्वात प्रथम तुमच्यासाठी कोणती साइज परफेक्ट आहे ते पहा. प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला त्यावर त्यासंदर्भातील माहिती दिलीच असेल. पण तरीही तुम्हाला तुमची परफेक्ट साइज कळत नसेल तर एकदा डॉक्टरचा सल्ला घ्या. जेणेकरुन तुमचा मासिक पाळीदरम्यानचा ब्लड फ्लो आणि कपच्या स्टोरेजच्या क्षमतेबद्दल ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील.
हे देखील वाचा- मासिक पाळीच्या वेदनांपासून सुटका हवी असेल, तर नियमित करा हे योगप्रकर!
मासिक पाळीवेळी मेंस्ट्रुअल कपचा कसा उपयोग करतात?
-सर्वात प्रथम आपले हात स्वच्छ धुवून घ्या
-आता पाणी किंवा ल्यूब क्रिम ही कपच्या वरील बाजूस असलेल्या रिंग आकारावर लावा.
-आता कप हाताने घट्ट दुमडा आणि अशा पद्धतीने पकडा की रिंग आकार असलेला भाग हा वरील बाजूस असेल
-आता ते आपल्या वजाइनमध्ये टाकताना सुद्धा त्याची रिंग ही वरील बाजूस असावी
-मेंस्ट्रुअल कप हा सर्विक्स (गर्भाशय ग्रीवा) च्या खाली काही इंच लावावा.
-वजाइनामध्ये मेंस्ट्रुअल कप व्यवस्थित लागल्यानंतर थोडा फिरवा जेणेकरुन तो एअरटाइड होईल.
मेंस्ट्रुअल कप तुम्ही व्यवस्थितीत लावला आहे की नाही हे तेव्हाच कळेल जेव्हा तो लावल्याची तुम्हाला जाणीव होणार नाही. तसेच तुम्हाला चालताना किंवा बसताना कप हा खाली आल्याचे वाटत असेल तर लगेच तो व्यवस्थितीत लागला आहे का ते पुन्हा एकदा तपासून पहा.

कधी आणि केव्हा काढाल?
कोणताही मेंस्ट्रुअल कप ६-१२ तासांसाठी सहज वापरता येतो. रात्री झोपताना सुद्धा त्याचा तुम्ही वापर करु शकता. दरम्यान कधीच १२ तासांच्या वर मेंस्ट्रुअल कपचा (Menstrual cup) वापर करु नये. अधिकच फ्लो झाल्यास किंवा तो भरल्यानंतर तो लगेच बदला.
-कप वजाइनामधून काढण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा
-आता हाताच्या दोन बोटांनी तो बाहेरच्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करा. पण कप वजाइनामधून बाहेर काढताना तो घट्ट धरा
-फक्त हलका दाबल्यानंतर तो सहज वजाइनामधून बाहेर येईल.
-कपमधील ब्लड हे टॉयलेटमध्ये टाकून द्या.
वापरल्यानंतर ‘या’ पद्धतीने घ्या काळजी
मेंस्ट्रुअल कप हा वापरल्यानंतर स्वच्छ धुवा आणि नंतर कापडाने पुसून घ्या. कप हा उकळत्या पाण्यात ठेवून स्वच्छ करण्याचा नेहमी सल्ला दिला जातो. पण तुम्ही सिरोना ब्रँन्डच्या मेंस्ट्रुअल कपचा स्टर्लाइजरचा वापर करु शकता. बाजारात विविध ब्रँन्डचे आणि एकदा वापरुन झाले की फेकून द्यायचे असे ही मेंस्ट्रुअल कप मिळतात.