फळांचा राजा आंबा हा सर्वांचाच लाडका आहे. वर्षभर लोक या फळाची वाट पाहत असतात. पिकलेल्या आंब्याची चव अप्रतिम असते. तसेच आंबा कच्चा असताना, म्हणजेच कैरीच्या रुपातही त्याचे अनेक फायदे आहेत. लोणच्यापासून ते चटण्या आणि भाज्यांपर्यंत प्रत्येकजण कैरीचा वापर करतो. पण तुम्हाला माहित आहे का की कच्च्या आणि पिकलेल्या दोन्ही प्रकाराच्या आंब्याची साल देखील खूप फायदेशीर असते. ती चेहऱ्यावर लावल्याने ग्लोइंग स्किन मिळू शकते. ( mango peel facial )
उन्हाळ्यात त्वचेची अतिरिक्त काळजी घ्यायची असेल, तर आंब्याचा वापर नक्की करा. पण आज आपण आंब्याबद्दल नाही, तर त्याच्या सालीच्या वापराबद्दल बोलणार आहोत. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल. उन्हाळ्यात धूळ, माती आणि घामामुळे चेहरा चिकट होतो. त्यामुळे चेहऱ्यावर आंब्याच्या सालीचा वापर करावा.
चेहऱ्यावरची रोम छिद्रे उघडली की ते सौंदर्य खराब करत राहतात. यावर उपाय म्हणून तुम्ही आंब्याच्या सालीचा वापर करू शकता. यासाठी आंब्याची साल फ्रीजमध्ये ठेवा. ती थंड झाल्यानंतर फ्रीजमधून बाहेर काढा आणि चेहऱ्यावर हलक्या हातांनी चोळा आणि मसाज करा. असे केल्याने चेहऱ्यावर दिसणारी मोठी छिद्रे बारीक होऊन बंद होतील आणि तुमची त्वचा सुंदर दिसेल.( mango peel facial )
=====
हे देखील वाचा – उन्हाळ्यात टॅनिंगपासून हवी असेल सुटका, तर मसूरच्या डाळीने करा चेहरा स्वच्छ
=====
सन टॅनिंग कमी करण्यासाठी आंबा उपयुक्त
रखरखत्या उन्हामुळे त्वचा टॅन होते, म्हणजेच ती काळी पडते. हे खूप लोकांच्या बाबतीत घडते. त्यामुळे आंब्याच्या सालीचा वापर करून यापासून सुटका करा. यासाठी आंब्याची साल बारीक करून घ्यावी. नंतर त्यात दही मिसळा. आता ही घट्ट पेस्ट चेहर्यावर लावून काही वेळ सोडा. दहा ते पंधरा मिनिटांनी चेहरा धुवा. सलग दहा दिवस असे करत राहिल्याने टॅनिंगची समस्या दूर होते.( mango peel faciall )
डाग होतील दूर
अनेकांच्या चेहऱ्यावर पुरळ किंवा जखमांमुळे डाग पडतात. हे डाग दूर करण्यासाठी विविध प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांचा वापर केला जातो. पण आंब्याच्या केवळ सालीपासून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. आंब्याच्या सालीवर मधाचे काही थेंब टाकून चेहऱ्यावर चोळा. हलक्या हातांनी मसाज करा आणि पाच मिनिटे राहू द्या. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. ही दिनचर्या रोज केल्यास, चेहऱ्यावर लवकरच फरक दिसून येईल.( mango peel facial )
=====
हे देखील वाचा – प्रत्येक गृहिणीसाठी आवश्यक आहे ‘या’ योगासनांचा सराव, फिटनेससाठी आहेत अत्यंत उपयुक्त
=====
नैसर्गिक स्क्रब करा तयार
आंब्याच्या सालीपासून तुम्ही नैसर्गिक स्क्रबही तयार करू शकता. विशेष म्हणजे, याचा वापर चेहरा आणि शरीर दोन्हीवर करता येतो. यासाठी आंब्याची साल बारीक करून पावडर बनवा. नंतर त्यात कॉफी पावडर टाकून स्क्रब तयार करा. तुम्हाला हवे असल्यास, त्वचा कोरडी पडू नये यासाठी तुम्ही खोबरेल तेलाचे काही थेंब टाकू शकता. या मिश्रणाने चेहऱ्याला स्क्रब केल्याने, त्वचा चमकदार होईल.( mango peel facial)