Home » Kanjivaram Sarees : कांजीवरम साड्यांची काळजी कशी घ्यावी?

Kanjivaram Sarees : कांजीवरम साड्यांची काळजी कशी घ्यावी?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Kanjivaram Sarees
Share

साडी म्हणजे प्रत्येक भारतीय स्त्रीचा आवडता पोशाख. आजच्या आधुनिक जगात मुली, महिला कितीही मॉडर्न झाल्या तरी साडी नेसणे प्रत्येकालाच आवडते. वरवर जरी अनेकांनी साडी न आवडण्याचा अविर्भाव केला तरी मनात साडीबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर असतो. साडी नेसल्यावर एक वेगळेच फिलिंग एक वेगळाच आनंद मिळतो. साडीप्रेमी असलेल्या प्रत्येक स्त्रीकडे विविध प्रकारच्या असंख्य साड्या असतात. बनारसी, पटोला, पैठणी, बांधणी, ब्रोकेड, कॉटन आदी अनेक साड्या कपाटात आपापल्या जागी स्थिरावलेल्या असतात. मात्र या सर्वांमध्ये अतिशय खास, उंच ठिकाणी एका वेगळ्याच तोऱ्यात विसावलेली दिसते ती ‘कांजीवरम’ साडी.(Saree)

अतिशय रॉयल आणि रिच लूक देणाऱ्या कांजीवरम या साडीला पर्यायच नाही. लग्नसमारंभापासून ते एखाद्या पार्टीपर्यंत या कांजीवरम साडी नेहमीच तुम्हाला आकर्षक लूक देते. तुम्हाला फंक्शनमध्ये वेगळे आणि अधिक सुंदर दिसायचे असेल तर पारंपरिक कांजीवरम साडी हा उत्तम पर्याय ठरतो. एव्हरग्रीन कांजीवरम साडी नेहमीच तुमची शान वाढवते आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स तुम्हाला देते. (Kanjivaram Saree)

Kanjivaram Sarees

कांजीवरम साड्या या दक्षिण भारतातील प्रसिद्ध हस्तकलेचा वारसा आहे. कांजीवरम हे तमिळनाडूमधील एका छोट्या शहराचे नाव आहे जिथे या साड्या शतकानुशतके विणल्या जात आहेत. या साड्या १००% शुद्ध रेशमापासून बनवलेल्या आहेत आणि त्यावर विविध प्रकारच्या डिझाईन्स केल्या जातात. सोन्याची जरी आणि कापूस जरी ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. कांजीवरम साड्यांची रचना या साडयांना खास बनवते. कांजीवरम साडीचे वैशिष्ट्य म्हणजे रुंद आणि साडीच्या रंगाशी कॉन्ट्रास्ट करणाऱ्या रंगांचे काठ. या साडीची किंमत २५०० पासून सहा लाख रुपयांपर्यंत असते.(Take care of kanjivaram saree)

=======

हे देखील वाचा : Matheran Closed : माथेरान १८ मार्चपासून बंद होणार ? काय आहेत कारणं

========

आपण कोणतेही साडी जेव्हा खरेदी करतो, तिच्यासोबत काळानुरुप आपल्या अनेक आठवणी आणि महत्वाचे क्षण देखील जोडले जातात. प्रत्येक साडी आपल्यासाठी खास असते. अतिशय सुंदर असलेल्या या कांजीवरम साड्या केवळ सुंदरच नाहीत तर खूप महागड्या देखील आहेत. एकदा आपण या साडीमध्ये मोठी गुंतवणूक केल्यानंतर ही साडी नीट सांभाळण्यासाठी देखील आपल्याला थोडे प्रयत्न करणे गरजेचे आहेत. कांजीवरम साडी घेतल्यानंतर ती अनेक वर्ष चांगली राहावी यासाठी काही छोट्या आणि सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊया त्याबद्दल.(Marathi Top Stories)

व्हेलवेटच्या कापडाचा वापर
सिल्कच्या साड्या कायम व्हेलवेटच्या कपड्यात गुंडाळून ठेवाव्या. यामुळे साडीचे सिल्क खराब होत नाही आणि सोबतच सिल्कची चमकही टिकते. ओलाव्यामुळे सिल्कच्या साड्या खराब होतात, त्यामुळे सिल्कच्या साड्या ओलाव्यापासून दूर ठेवाव्या. या सिल्कच्या साड्या कधीही प्लास्टिकच्या कव्हरमध्ये किंवा पिशव्यांमध्ये ठेवू नयेत. असे केल्यास त्यांच्यात दमटपणा येऊन साडी खराब होऊ शकते. थोड्या थोड्या काळाने किमान ३ महिन्यांनी या साड्या बाहेर काढून साडयांना हवा दाखवून पुन्हा नीट ठेवाव्या. या साड्या कधीच धुवू नका त्याऐवजी ड्राय क्लीन करा.(Trending News)

Kanjivaram Sarees

कपाटाचा वापर टाळावा
कधीही सिल्कच्या साड्या इतर कपड्यांसोबत वॉर्डरोबमध्ये ठेवू नका. या साड्यावर थेट सूर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण सूर्यप्रकाशामुळे सिल्कच्या साड्यांचा रंग हलका होतो. त्यांना नेहमी थंड वातावरण असलेल्या जागी ठेवले पाहिजे. या साड्या स्टोरेज बॉक्समध्ये ठेवणे देखील उत्तम पर्याय ठरू शकतो. या साड्या ठेवल्यानंतर त्यांच्या आसपास कडुलिबांची सुकलेली पाने, लवंग किंवा सिलिकॉन जेलचे पॅकिट ठेवल्यास, यामुळे साड्यांवर ओलावा किंवा दमटपणा येत नाही. मात्र सिल्कच्या साडी सोबत डांबर गोळ्या कधीच ठेऊ नये.(Social News)

=======

हे देखील वाचा : Shiv Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांची नावे माहित आहे का?

========

हँगर्स टाळा
अनेकदा आपण पाहिले असेल तर महिला साड्या ठेवताना हँगर्सचा वापर करतात. मात्र मात्र सिल्क साड्यांच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही. या साड्या जास्त काळ हँगर्सला लावल्याने त्यांच्यावर केलेले जड जरीकाम कापड कमकुवत करते आणि त्यामुळे साड्या सहजपणे फाटू शकतात.(Top News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.