फेब्रुवारी महिना संपत आला असून, सगळीकडे उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. फेब्रुवारीतच उन्हाळ्याची चाहूल लागल्याने सगळेच आता उन्हापासून वाचण्यासाठी विविध उपाय करताना दिसत आहे. उन्हाळा ऋतू हा आपल्या आरोग्यच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील ऋतू समजला जातो. या काळात आपले शरीर डिहायड्रेट होण्याची शक्यता सर्वाधिक असते. शिवाय थकवा, उष्णतेचा त्रास, त्वचाविकार, आणि त्वचेची जळजळ असे गंभीर आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होतात. अति उष्णतेमुळे मुत्रनलिकेत जळजळ होणे, पचनाच्या समस्या, डोकेदुखी आणि शरीरात उष्णता वाढणे यांसारखे त्रास उद्भवतात. त्यामुळेच या ऋतूमध्ये आपल्या शरीराचे काळजी अधिक चांगल्या पद्धतीने घेणे खूपच आवश्यक आहे. (Summer Care)
उन्हाळ्यात घामाच्या रुपाने उष्णता बाहेर पडत असते. त्यामुळे शरीराच्या आतील आणि बाहेरील त्वचा कोरडी पडत असते. अशावेळी शरीराला पाण्याची अत्यंत गरज असते. यासाठी वेळोवेळी पाणी पित राहणे गरजेचे असते. मुख्य म्हणजे उन्हाळ्यात आहारात बदल करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात पचायला हलका आणि कमी आहार घ्यावा. टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, काकडी फळांचं सेवन वाढवावं. थंड तुपाचाही आहारात सामावेश करावा. नारळ पाणी, ऊसाचा रस, कोकम सरबत प्यायल्याने उष्णतेचा त्रास कमी जाणवेल. याशिवाय या ऋतूमध्ये मांसाहार टाळावा आणि भरपूर पाणी प्यावे. याशिवाय उष्माघाताचा त्रास होत असलेल्या रुग्णाला जास्तीतजास्त द्रव आहार द्यावा तसेत ताप कमी होत नसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (Health)
पाण्याअभावी उन्हाळ्यात अनेकदा डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. यामुळे अनेक जण विविध आजारांना बळी पडतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला उष्णतेपासून स्वत:चा बचाव करायचा असेल, तर स्वतःला पूर्णपणे हायड्रेटेड ठेवणं आवश्यक आहे. यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. याशिवाय हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन करा. याशिवाय लिंबू पाणी, लस्सी यांसारखी पेये प्या. गरज पडल्यास ORS घ्या. (Todays Marathi Headline)

विनाकारण उन्हामध्ये बाहेर जाऊ नका. कामानिमित्त बाहेर जायचे असेल तर छत्री, टोपी, रूमाल, स्कार्फ हे उन्हाळ्यातील सुरक्षा कवचांसारखे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराबाहेर पडताना स्वच्छ पाणी पिणे गरजेचे आहे. बाहेर जाताना स्वत:ची पाण्याची बाटली सोबत घेऊनच बाहेर पडावे. त्याचबरोबर सैलसर, सुती, कॉटन आणि फिकट रंगांचे कपडे घालावेत. बाहेर उन्हात काम करणाऱ्यांनी तर टोपी किंवा छत्री वापरा. सनग्लासेस घाला. कांदा सोबत ठेवा. शक्य असल्यास मोठ्या सुती कापडाने डोके व चेहरा झाकून घ्या. थोड्या थोड्या वेळाने डोके, मान, चेहरा, हातपाय सतत ओलसर रुमालाने पुसत राहा. (Top Marathi Headline)
उन्हाळ्यात चांगली झोप घेणे देखील आवश्यक असते. म्हणून योग्य वेळेत झोपा आणि झोपताना स्किन केयर नक्की करा. झोपेचे चांगले रुटीन बनवा आणि त्याचे पालन करा. उन्हाळ्यात व्यायाम करणे देखील आवश्यक आहे. चालणे, सायकलिंग करणे, पोहणे, एरोबिक्स असा व्यायाम या ऋतूमध्ये करावा. या ऋतूमध्ये योगा करणे देखील फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात बाहेर फिरणे टाळावे, दिवसा झोपू नये, चंदनाचा लेप कपाळावर लावावा. उन्हाळ्यात कच्चा कांदा जरूर खावा. कच्चा कांदा उन्हाळ्यात पोट निरोगी ठेवतो. कांदा जेवणासोबत सॅलड म्हणून खा. याशिवाय तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर डोक्यावर कच्च्या कांद्याचे तुकडे ठेवून त्यावर जर सुती कापडाने डोके झाकून घेतले तर उन्हापासूनही तुमचे संरक्षण होईल. (Top Trending Headline)
उन्हाळ्यात तापमान अधिक असते. यामुळे हवेत उष्मा वाढतो. परिणामी आपण घामाघूम होतो आणि थंडावा मिळण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करतो. पण तुम्हाला माहीत आहे का याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतो. अनेकवेळा आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. त्यामुळे उन्हातून आल्यावर लगेचच थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे. हल्ली ऑफिसपासून ते घरापर्यंत सगळ्यांकडेच एसी असतो. यामुळे बाहेरून उन्हातून आल्यावर आपण रिलॅक्स होण्यासाठी एसीसमोर बसतो. त्यामुळे तुम्हाला सर्दी, पडसे होऊ शकते. एवढेच नाही तर श्वसनाचेही विकार होऊ शकतात. धाप लागू शकते. यामुळे बाहेरुन आल्यावर लगेचच एसीसमोर बसू नये. शरीराचे तापमान नॉर्मल झाल्यावरच एसीमध्ये बसावे. (Latest Marathi NEws)
========
========
उन्हातून आल्यामुळे आपल्याला भरपूर घाम येतो. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. बॉडी डिहायड्रेड होते. यामुळे आपण उन्हातून आल्यावर फ्रीजमधले थंड पाणी गटागट पितो. पण असे केल्याने नुकसान होते. त्यापेक्षा साधे पाणी प्यावे. उन्हातून आल्यावर बरेचजण बर्फ टाकून थंड पाणी, किंवा आईस्क्रीम नाहीतर कोल्ड ड्रिंक पिणे पसंत करतात. पण त्यामुळे सर्दी, खोकला आणि घशाला त्रास होऊ शकतो. उन्हाळ्यात शरीरातील पाणी घामाद्वारे बाहेर पडत असते. त्यामुळे शरिरात पाण्याची कमतरता निर्माण होते. परिणामी थकवा येणे, डोळ्यासमोर अंधार येणे, चक्कर येणे, गरगरणे असा त्रास होऊ शकतो. यामुळे बाहेरून आल्यावर पाच दहा मिनिटं शांत बसावे. लगेचचं कामाला लागू नये. शरीराचे तापमान नॉर्मल झाल्यावरच उठावे. (Social News)
(टीप : या लेखामध्ये देण्यात आलेली माहिती आणि उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
