Home » Kitchen Tips : पहिल्यांदा मातीची भांडी वापरताय…? मग करा ‘या’ टिप्स फॉलो

Kitchen Tips : पहिल्यांदा मातीची भांडी वापरताय…? मग करा ‘या’ टिप्स फॉलो

by Jyotsna Kulkarni
0 comment
Kitchen Tips
Share

सध्या सर्वच लोकं हळूहळू का असेना आपल्या आरोग्याच्या बाबतीत सजग होताना दिसत आहे. थोड्याफार प्रमाणात व्यायाम, खाण्याच्या बाबतीत देखील कटाक्षाने काही गोष्टी पाळताना दिसतात. याचा परिणाम आपल्या घरातील किचनवर देखील होताना दिसत आहे. यातलाच एक महत्त्वाचा बदल म्हणजे जेवण शिजवण्यासाठी वापरली जाणारी भांडी. सध्या ऍल्युमिनियमची भांडी कोणीच वापरताना दिसत नाही. त्याऐवजी पितळी, कास्ट आर्यन आणि मातीची भांडी वापरण्यावर कल दिला जात आहे. (Kitchen Tips)

अनेक लोकांच्या घरात थोड्याफार प्रमाणात तरी मातीची भांडी दिसतात. काही महिला मोठ्या हौशीने ही भांडी आणतात मात्र ती वापरावी कशी असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण ही भांडी बाजारातून आणल्या आणल्या आपण धुवून वापरू शकत नाही. त्यासाठी एक प्रक्रिया पार पाडावी लागते. मातीच्या भांड्यांचे सिझनिंग केल्याशिवाय ती वापरायची नसतात. मग या भांडयांना सिझनिंग कसे करावे?, ही भांडी कशी वापरावी चला जाणून घेऊया. (Marathi)

मातीची भांडी सिझनिंग कशी करावी?
– बाजारातून मातीचे भांडे घरी आणल्यावर सुती कापडाने स्वच्छ पुसून घ्यावे. भांडे सुती कपड्याने पुसल्याने भांडयात असलेली धूळ साफ होते.
– मातीचे भांडे मजबूत होण्यासाठी स्वच्छ कपड्याने ते पुसून पाण्यात बुडवून ठेवावे. नवीन मातीची भांडी 20 ते २२ तास पाण्यात बुडवून ठेवल्यास भांडी अधिक मजबूत होतात. (Todays Marathi Headline)
– मातीचे भांडे पाण्यात ठेवल्यानंतर ते स्क्रबने चोळून स्वच्छ करावे. भांडे स्क्रबरने घासल्यास त्यातील घाण साफ होते.
– वरील सर्व कृती झाल्यावर उन्हात भांडे ठेवावे. भांडे चांगले कोरडे झाल्यावर भांड्याच्या आतील आणि बाहेरील दोन्ही भाग स्वच्छ पुसून घ्या.
– पाणी सुकल्यानंतर त्या भांड्यांना तेल लावून परत उन्हामध्ये ठेवून द्या. या भांडयांना मोहरीचे, शेंगदाण्याचे किंवा तुम्ही खात असलेले कोणतेही तेल आतून बाहेरून लावून ठेवावे. त्यानंतर पुन्हा हे भांडे उन्हात वाळवावे. पूर्ण वाळल्यानंतर ते स्वयंपाकासाठी तयार होते.
– मातीच्या भांड्यात केव्हाही सर्वप्रथम भात शिजवावा. याने मातीचे भांडे दीर्घकाळ टिकते. खरं तर, तांदळाच्या पाण्यामुळे भांडे मजबूत होते. (Marathi News)


मातीचे भांडे स्वच्छ कसे करावे?
– मातीच्या भांड्यांमधील अन्नाचा वास आणि तेल निघावं म्हणून ती गरम पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर ती मऊ घासणीने स्वच्छ धुवून घ्या. (Top Marathi Headline)
– मातीचे भांडं अनेकवेळा धुतल्यानंतरही त्यात अन्नाचा वास येत राहतो. यासाठी मातीच्या भांड्यात गरम पाणी टाका. आता त्यात 3 चमचे बेकिंग सोडा टाकून ते अर्ध्या तास ठेवून द्यावे. त्यानंतर हे भांडं स्वच्छ पाण्याने धुवा.
– मीठ हे सर्वोत्कृष्ट नॉन टॉक्सिक क्लिनर मानले जाते. त्यामुळे हे मातीच्या भांड्यांची घाण साफ करण्यासाठी आणि बॅक्टेरिया मुक्त करण्यासाठी उपयुक्त आहे.
– मातीची भांडी साफ करण्यासाठी साबण कधीही वापरू नका. मातीची भांडी साबण सहज शोषून घेतात. (Top Stories)

काही महत्वाच्या टिप्स
– मातीची भांडी घेताना त्याचा तळ/बुड बघावा. तो जाड हवा, नाहीतर उष्णतेने भांडे तडकू शकते.
– नवीन भांडे कधीही गॅसवर तेल घालूनच गरम करायचे. आधी गरम करू नये. ती फुटू शकतात. सुरुवातीला मंद आचेवर ठेवा.
– स्वयंपाक झाला की गरम पाणी ओतून स्वच्छ करावी. तेलाचा तवंग, अन्नकण निघून येतात.
– भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबाची साल , मीठ , व्हिनेगर वापरू शकता. (Top Marathi News)
– मातीच्या भांड्यांसाठी वेगळा स्क्रब किंवा स्पंज ठेवा.
– भांडी धुवून झाल्यावर शक्य असेल तर उन्हामध्ये सुकवून घ्या.

=========

Jewellery : लग्नसराईसाठी पारंपरिक दागिन्यांचे आकर्षक पर्याय

=========

मातीच्या भांड्यात अन्न शिजवण्याचे फायदे
– मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यास, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाणही अन्नात आढळते, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. (Top Trending Headline)
– मातीच्या भांड्यात असणारे लहान छिद्र आग आणि ओलावा समान रीतीने प्रसारित करण्यास मदत करतात ज्यामुळे अन्नातील पोषक तत्त्व सुरक्षित राहतात.
– मातीच्या भांड्यात कमी तेलाचा वापर केला जातो.
– मातीच्या भांड्यांमध्ये अन्न स्वादिष्ट होतं. या भांड्यांमध्ये शिजवण्यामुळे अन्न पौष्टिक राहतं तसेच अन्नाची चव वाढते.
– मातीच्या भांड्यातील जेवणामुळे अपचन आणि गॅसची समस्या दूर होते. तसेच बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्तता मिळते.
– अन्नामध्ये उपस्थित असलेले पौष्टिक घटक नष्ट होत नाहीत.
– अन्नाचे पीएच मूल्य राखले जाते, ते बर्‍याच रोगांना प्रतिबंधित करते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.