Home » पार्टनरची माफी मागायची असेल तर ‘या’ टीप्स जरुर लक्षात ठेवा

पार्टनरची माफी मागायची असेल तर ‘या’ टीप्स जरुर लक्षात ठेवा

by Team Gajawaja
0 comment
Say sorry to partner
Share

प्रत्येक रिलेशनशिपमध्ये रुसवे-फुगवे येतातच, परंतु त्यामुळे तुम्ही एकमेकांपासून दूर जाणे हे काही योग्य नाही. या उलट नात्यात वाद-भांडण झाल्यानंतर एकाने तरी समजून घेत आपल्या पार्टनरशी बोलण्याचा प्रयत्न करावा. अशातच चूक तुमची असेल तर तुम्ही पार्टनरला त्याबद्दल सॉरी नक्कीच बोला. पण त्यावेळी सुद्धा पार्टनरच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची सुद्धा काळजी घ्या. कारण तुमच्या नात्यातील विश्वास हा सर्वाधिक महत्वाचा पैलू असून त्यावरच तुमचे नाते दीर्घकाळ टिकते. एकदा का तुमच्या विश्वासाला तडा गेल्या तो पुन्हा त्याच पद्धतीने मिळवणे फार कठीण होते. त्यामुळे चुक तुमची असेल तर जरुर पार्टनरची माफी मागा.(Say sorry to partner)

माफी मागणे म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीसमोर झुकलो असे होत नाही. तर आपण आपल्या मनाचे मोठेपण दाखवत आपली चुक मान्य केली हे यामधून दिसते. परंतु पार्टनर तरीही तुम्ही चुक केल्यानंतर माफी मागून ही ऐकून घेत नसेल तर अजिबात संतापू नका. थोडं थांबा आणि पार्टनरला नक्की कोणत्या कारणामुळे तुमचे बोलणे पटत नाही आहे ते पहा आणि त्यानुसार उत्तरे द्या. रिलेशनशिपमध्ये भांडण झाल्यानंतर दीर्घकाळ त्याच मुद्द्यावरुन एकमेकांशी न बोलणे सुद्धा फार चुकीचे आहे. याचा थेट परिणाम तुमच्या दोघांच्या नात्यावर तर होतोच पण तुमचे कोणत्याही कामात लक्ष सुद्धा लागत नाही. त्यामुळे पार्टनरची कशी माफी मागायची असा प्रश्न पडला असेल तर पुढील काही टीप्स जरुर लक्षात ठेवा.

हे देखील वाचा- पार्टनरसोबत पैशांवरुन वाद होतात? ‘या’ टीप्स येतील तुमच्या कामी

Say sorry to partner
Say sorry to partner

-सर्वात प्रथम पार्टनरची माफी मागताना तुमच्या बोलण्यात भावना असू द्या. आपल्या बोलण्याचा लहेजा हा खालच्या स्वरात असू द्या.कारण असे केल्यानंतर तुम्ही तुमचे मत पार्टनरला भले सांगितले तरीही पार्टनर तुमच्या माफीसाठी नकार देणार नाही. नात्यामध्ये आलेली कटूता दूर होईल.

-जर तुम्ही किंवा तुमचा पार्टनर एखाद्या गोष्टीमुळे खुप संतप्त झाला असेल तर लगेच एकमेकांशी बोलणे टाळा. थोडे थांबा आणि स्वत: ला शांत करा. जेणेकरुन तुम्ही शांत झाल्यानंतर तुमच्यामध्ये जो काही वाद निर्माण झाला आहे तो शांतपणाने सोडवता येईल.

-जेव्हा तुम्ही पार्टरला सॉरी बोलता म्हणजेच तुम्ही केलेली चुक पुन्हा करणार नाही किंवा त्यामधून सुधारण्याचा प्रयत्न करा. तसेच पार्टनरची माफी मागताना तुमच्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीला तुमच्यावर विश्वास बसेल असे बोला जेणेकरुन त्यांना तुम्ही आता केलेली चुक ही पुन्हा करणार नाही याची खात्री पटेल.(Say sorry to partner)

-तुमचा पार्टनर तुमच्यावर नाराज असेल तर त्यांच्यावरच उलट भडकून बोलण्याऐवजी स्वत: केलेली चुक मान्य करा आणि माफी मागा. तसेच तुमच्या चुकीची अधिकाधिक स्पष्टता किंवा बहाण्याऐवजी तुम्ही थेट माफी मागून तो वाद तेथेच मिटवण्याचा प्रयत्न करा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.