संक्रांत म्हटले की लगेच डोक्यात येतात ते तिळाचे लाडू. प्रत्येकाला आवडणारे हे तिळाचे लाडू संक्रांतीचे मुख्य वैशिष्ट्य असते. मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वच जणं एकमेकांना तिळगुळ देतात आणि ‘तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे म्हणतात. असे म्हणण्याचे कारण म्हणजे, नात्यातील कटुता नष्ट होवो आणि गुळासारखा गोडवा त्यात पुन्हा येवो. संक्रांतीला सगळेच तिळगुळाचे लाडू बनवतात आणि सर्वांना वाटतात. या लाडूंना संक्रांतीमध्ये कमालीचे महत्त्व असते. असे असले तरी अनेकांना हे लाडू घरी बनवणे खूपच कठीण वाटते. पाक बरोबर होईल का?, लाडू कडक तर होणार नाही ना? आदी अनेक प्रश्न महिलांच्या डोक्यात येतात. मात्र आज आम्ही तुम्हाला या तिळगुळाच्या लाडूची एकदम परफेक्ट आणि सोपे रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी वाचून जर तुम्ही लाडू केले तर ते बरोबर होतीलच आणि चविष्ट देखील होतील. (Sankranti)
साहित्य:
-अर्धा किलो तीळ
– अर्धा किलो चिक्कीचा गूळ
-१ ते दिड वाटी शेंगदाण्याचे कूट
– १ चमचा वेलची पूड
– १ ते २ चमचे तूप
कृती
प्रथम तीळ मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यावेत. नंतर गॅसवर कढई किंवा मोठं भांड ठेऊन त्यात चिक्कीचा गूळ आणि तूप घालावे. गुळाचा गोळीबंद पाक तयार करून घ्यावा. म्हणजेच पाकची हाताने गोळी तयार होते की, नाही ते पाहा. पाक करताना तो सतत हलवत राहा. पाक व्यवस्थित झाल्यानंतर त्यात भाजलेले तिळ,दाण्याचं कूट, वेलची पूड घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर लगेचच लाडू वळायला घ्या. लाडू वळताना हाताला तूप लावल्यास लाडू सहज वळले जातील आणि हाताला चिकटणार देखील नाहीत. झटपट तिळाचे लाडू तयार होतील. (Marathi News)
______________________________________________________________________________________________________________________________________
पद्धत २
साहित्य :
तीळ, गूळ, तूप
कृती:
तीळ मंद आचेवर चांगले भाजून घ्या. तीळ भाजून झाल्यानंतर ते एका कॉटन कापडावर पसरवून पूर्णपणे थंड करून घ्या. तीळ गार झाल्यावर त्यातील २ टेबलस्पून तीळ बाजूला काढून ठेवावेत. उरलेले तीळ मिक्सरमध्ये घालून थोडे बारीक करून घ्यावेत. आता त्यामध्ये १ वाटी चिरलेला गूळ घालून तीळ आणि गूळ नीट मिक्स करून घ्या. हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून हाताने छान मिक्स करा. त्यानंतर यात १ टेबलस्पून साजूक तूप घालून पुन्हा मिक्स करा. आता बाजूला ठेवलेले तीळ या मिश्रणात घालून चांगले मिसळून घ्यावेत. तयार मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे करून लाडू तयार करा. हे लाडू बनवायला अगदी सोपे आणि अतिशय झटपट बनणारे आहेत. यंदा संक्रांतीला तुम्ही देखील नक्की करा. (Top Marathi News)
______________________________________________________________________________________________________________________________________

पद्धत ३
साहित्य :
१ १/२ कप तीळ
१/४ कप शेंगदाणा कुट
वेलची पूड
१ १/४ कप गुळ चिरून (साधा)
कृती
प्रथम साहित्य मोजून घ्या. तीळ भाजून घ्या. नंतर १ ते २ टेबलस्पून तीळ भाजलेले बाजूला काढा, नंतर बाकी तीळ मिक्सर मधे बारीक करा. तिळाचा कूट तयार झाला, आता त्यात गुळ मिक्स करा व नंतर मिक्सर चा भांड्यात टाकून परत फिरवून घ्या, नंतर त्यात वेलची जायफळ पूड घाला. आता त्यात शेंगदाणा कूट घाला, आणि बाजूला ठेवलेले भाजलेले तिळ घाला आणि मिश्रण एकजीव करा. आता मिश्रण थोडे थोडे हातात घेऊन त्याचे लाडू वळा. (Latest Marathi Headline)
_____________________________________________________________________________________________________________________________________
तीळ-गुळाची बर्फी
साहित्य
– तीळ
– गूळ
– तूप
– आवश्यकतेनुसार पाणी
– सुकामेवा
कृती
सर्वात आधी तीळ स्वच्छ करून भाजून घ्या. तीळ थंड झाल्यानंतर मिक्सर मधून बारीक दळून घ्यावी. आता एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये गूळ घालावा. आवश्यक असल्यास अगदी थोडे पाणी घालावे. आता हे ढवळत राहावे जेणेकरून मिश्रण कढईला चिकटणार नाही. आता या मिश्रणात बारीक केलेली तीळ घाला आणि चांगल्या प्रकारे एकत्रित करा. यानंतर यामध्ये आवडीनुसार सुकामेवा घाला. आता एक ताटलीला तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण घालावे. आता तुम्हाला हव्या त्या आकारात वड्या कापून घ्या. (Top Trending News)
______________________________________________________________________________________________________________________________________
========
Sankranti : संक्रांत स्पेशल: तिळगुळाच्या पोळीची सोपी रेसिपी
========
तीळ पापडी
साहित्य
साखर
तीळ
तूप
पिस्ता
कृती
तीळ चांगले भाजून घ्या. तीळ भाजून झाल्यावर ते प्लेटमध्ये काढून गार होऊ द्या. आता पिस्ते बारीक चिरून घ्या. तीळ पापडी लाटण्यासाठी पोळपाटाला आणि लाटण्याला थोडंसं तूप लावून ठेवा. पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये साखर घाला. साखर सतत ढवळत राहा आणि ती पूर्णपणे वितळवून घ्या. साखर वितळताना गॅसची फ्लेम मंद ठेवा. साखर पूर्ण वितळल्यानंतर त्यामध्ये भाजलेले तीळ घालून चांगलं मिक्स करा. यानंतर थोडे पिस्त्याचे तुकडे घाला आणि पुन्हा मिक्स करा. लगेचच मिश्रण पातळ लाटून घ्या. तयार आहे आपली तीळ पापडी. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
