Home » सकाळी नाश्त्यासाठी इडली ऐवजी खाऊन बघा ‘साबुदाण्याची इडली’!

सकाळी नाश्त्यासाठी इडली ऐवजी खाऊन बघा ‘साबुदाण्याची इडली’!

by Team Gajawaja
0 comment
sabudana idli
Share

रोजच्या नाश्त्यात काहीतरी वेगळं करून खायचं असेल, तर साबुदाणा इडली (sabudana idli) नक्की ट्राय करून पहा. खासकरून उपवासाच्या वेळी साबुदाणा जास्त वापरला जातो. पण साबुदाणा पासून बनवलेले पदार्थ, कोणत्याही वेळी सर्रास खाल्ले जातात. साबुदाणापासून बनवलेले पदार्थ स्वादिष्ट असण्यासोबतच पौष्टिक आणि फायदेशीर देखील असतात. त्यामुळे यावेळी रवा किंवा तांदळाची नव्हे, तर साबुदाणा इडली करून पहा. मात्र, तांदळाच्या इडलीप्रमाणे साबुदाणा इडली बनवण्यासाठीही तयारी करावी लागेल. पण एकदा तयारी झाली की, ही इडली बनवायला खूप सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊया की, साबुदाण्याची इडली (sabudana idli) कशी बनवायची.

साबुदाणा इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य

साबुदाणा इडली (sabudana idli) बनवण्यासाठी तुम्हाला शंभर ग्रॅम साबुदाणा, अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ, खाण्याचा सोडा, हवे असल्यास १/४ चमचे इनो सॉल्ट आणि दोन ते तीन चमचे तेल लागेल.

====

हे देखील वाचा – मुलांना आवडते स्वीट कॉर्न? तर त्यांच्यासाठी ‘अशा’ पद्धतीने बनवा त्याची भाजी

====

साबुदाणा इडली बनवण्याची प्रक्रिया

साबुदाणा इडली (sabudana idli) बनवण्यासाठी साबुदाणा रात्रभर भिजत ठेवा. साबुदाणा भिजवण्यासाठी तुम्ही दही वापरू शकता. साबुदाणा रात्रभर भिजवून ठेवल्याने, सकाळी तो मऊ होईल आणि त्याची इडली स्वादिष्ट होईल. दोन वाट्या दह्यात दोन वाट्या साबुदाणा टाकून ठेवा. तसेच त्यात अर्धी वाटी रवाही घाला. यामुळे इडली मऊ होईल.

साबुदाणा आणि रवा रात्रभर दह्यात भिजवल्यानंतर, सकाळी इडली बनवताना त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून इडलीचे पीठ तयार करा. आता या पिठात बेकिंग सोडा आणि मीठ घालून ते फेटून घ्या आणि बाजूला ठेवा. नंतर इडलीच्या पिठाला त्याच्या साच्यात घाला. हे करण्यापूर्वी, प्रत्येक साच्याला दोन ते तीन थेंब तेल लावा. जेणेकरून इडल्या साच्याला चिकटणार नाहीत.

स्टीमरमध्ये वाफ तयार झाल्यावर, सर्व साच्यांमध्ये इडलीचे पीठ घाला आणि शिजवण्यासाठी ठेवा. इडली शिजल्यावर थंड होऊ द्या. कारण गरम इडल्या काढताना त्या तुटू शकतात. तसेच, त्या थंड झाल्यावर सहज निघतील. अशाप्रकारे तयार आहे तुमची साबुदाणा इडली (sabudana idli)!

तुम्ही ही इडली फ्राय करूनही खाऊ शकता. साबुदाणा इडली फ्राय करण्यासाठी कढईत तेल गरम करा. याला मोहरी आणि भिजवलेली चणाडाळ किंवा उडीद डाळीचा तडका द्या. आता सर्व इडल्यांचे तुकडे करा आणि या तडक्यामध्ये टाका. थोडेसे फ्राय झाल्यावर गॅस बंद करा. सकाळचा स्वादिष्ट नाश्ता तयार आहे, जो पौष्टिक आणि पचण्याजोगा देखील आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.