फिगर कशी ही असो, साडी(saree) हा एक असा पोशाख आहे, जो प्रत्येक मुलीवर सुंदर दिसतो. पण अनेक महिला साडी नेसताना काही चुका करतात. त्यामुळे त्यांचा लुक खराब होतो. विशेषत: प्लस साईझच्या महिला. जर तुम्ही जाड असाल, पण तुम्हाला स्टायलिश दिसायचे असेल, तर साडी नेसताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
पेटीकोट की शेपवेअर?
जर तुमच्या पोटावर आणि कमरेच्या भागावर जास्त फॅट असेल, तर साडी(saree) नेसण्यासाठी सामान्य कॉटनचा पेटीकोट घालण्याची चूक कधीही करू नका. यामुळे तुम्ही अधिक जाड दिसाल आणि तुमचा संपूर्ण लुक खराब होईल. साडीत स्लिम लूक हवा असेल, तर शेपवेअर घाला. शेपवेअर तुम्हाला साडीमध्ये स्लिम दिसण्यास मदत करेल. विश्वास बसत नसेल, तर पुढच्या वेळी नक्की ट्राय करा.
====
हे देखील वाचा – जर हनिमूनला जात असाल, तर ‘हे’ ड्रेस नक्कीच ठेवा बॅगेत, स्टायलिशसोबत आकर्षकही दिसाल
====
ब्लाउज डिझाइनमध्ये चुका करू नका
पेटीकोटसोबतच साडीच्या(saree) ब्लाउजच्या डिझाईनमुळेही तुम्ही स्लिम दिसू शकता. तसे तर ब्लाउजच्या अनेक नेक डिझाइन आहेत. पण जर तुम्ही जाड असाल, तर बोट नेक किंवा कॉलर नेक किंवा जूल नेकलाइन असलेले ब्लाउज कधीही घालू नका. त्याऐवजी नेहमी पुढून आणि मागून डीप नेकलाइन असलेले ब्लाउज घाला. असे ब्लाउज तुम्हाला स्लिम दिसण्यास मदत करतील.

बॉर्डरकडे लक्ष द्या
जर तुम्ही जाड असाल, तर साडी कितीही सुंदर असली तरी रुंद बॉर्डरची साडी कधीही नेसू नका. यामुळे तुम्ही जाड दिसाल. त्याऐवजी, नेहमी पातळ बॉर्डर असलेली साडी(saree) निवडा. अशा साड्या तुम्हाला नेहमी सडपातळ दिसण्यास मदत करतील.
पदर कसा बनवायचा?
साडी आणि ब्लाउजच्या डिझाईनबरोबरच एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे साडी नेसण्याची पद्धत. जर तुम्ही जाड असाल, तर जेव्हाही तुम्ही साडी(saree) नेसता तेव्हा पदर नेहमी तुमच्या पायापर्यंत लांब ठेवा. हे अतिशय हुशारीने तुमची जाडी लपवण्याचे काम करेल.