AI Video : डिजिटल तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढत्या वापरामुळे आज सोशल मीडियावर लाखो व्हिडिओ रोज शेअर होत आहेत. पण यामध्ये कोणते व्हिडिओ खरे आहेत आणि कोणते AI (Artificial Intelligence) द्वारे तयार केलेले आहेत, हे सामान्य वापरकर्त्यांना ओळखणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. डीपफेक, AI-जनरेटेड कंटेंट आणि एडिटेड व्हिडिओंनी जनतेत मोठी गफलत निर्माण केली आहे. अशा परिस्थितीत AI व्हिडिओ ओळखण्याची क्षमता प्रत्येकासाठी महत्त्वाची बनली आहे. तज्ज्ञांच्या मते, काही बारकावे समजून घेतले, तर खोट्या आणि खऱ्या व्हिडिओतील फरक सहज ओळखता येतो. AI (Artificial Intelligence)
चेहऱ्याच्या हालचाली आणि अभिव्यक्तीतील विसंगती ओळखा कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेले व्हिडिओ बहुतेक वेळा चेहऱ्याच्या अभिव्यक्तींमध्ये सूक्ष्म चुका करतात. जसे की, डोळे न लपकणे, ओठांच्या हालचाली आणि आवाजातील सिंक न जुळणे, हसताना चेहऱ्यावर योग्य रेषा न दिसणे, किंवा भावनांमध्ये अप्राकृतिक stiff look जाणवणे. खरे व्हिडिओ नैसर्गिक दिसतात, तर AI व्हिडिओंमध्ये हालचाली ‘जड’ किंवा ‘अवघडलेल्यासारख्या’ दिसतात. AI (Artificial Intelligence)

AI Video
हात-पायांची मुव्हमेंट आणि शरीराचे प्रमाण तपासा AI किंवा डीपफेक व्हिडिओंमध्ये शरीराचे प्रमाण, हातांची हालचाल किंवा बोटांचे आकार बऱ्याचदा चुकीचे दिसतात. उदाहरणार्थ, हाताच्या बोटांची संख्या गडबड होणे, हात-पाय अनैसर्गिक पद्धतीने फिरणे किंवा चालताना शरीराची alignment बिघडलेली दिसणे. खरे व्हिडिओंमध्ये मानवी हालचाल smooth आणि संतुलित दिसते. AI (Artificial Intelligence)
Background glitches आणि लाइटिंगची चूक शोधा AI व्हिडिओंमध्ये background आणि foreground एकमेकात मिसळल्यासारखे दिसते. कधी कधी व्यक्तीचे केस background मध्ये विलीन होतात, सावल्यांची दिशा विरोधाभासी असते किंवा प्रकाशाचे वितरण असमान दिसते. खऱ्या व्हिडिओमध्ये प्रकाश, सावल्या आणि background natural असतात, तर AI व्हिडिओंमध्ये सूक्ष्म distortions लगेच नजरेत भरतात.
आवाज आणि lip-sync mismatch कडे लक्ष द्या AI जनरेटेड व्हिडिओमध्ये आवाज खऱ्या व्यक्तीच्या आवाजासारखा वाटला तरी शब्दांच्या उच्चारांमध्ये वेगळेपणा जाणवतो. Lip-sync पूर्णपणे जुळत नाही किंवा भाषेचा टोन एका क्षणात बदलतो. जर आवाजात किंचित robotic किंवा monotonous टोन असेल, तर तो व्हिडिओ AI आधारित असण्याची शक्यता जास्त असते.
========================
हे देखिल वाचा :
Facelift Trend: कमी वयातच तरुणांमध्ये वाढली प्लास्टिक सर्जरीची क्रेझ! जाणून घ्या का घेत आहेत हे धाडसी पाऊल
Airless Tyre : एअरलेस टायर किती टिकतात? जाणून घ्या ते ट्यूबलेसपेक्षा किती चांगले आणि फायदेशीर आहेत
=========================
Metadata आणि Source ची पडताळणी करा एखाद्या व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी त्याचा source, शेअर करणारा अकाउंट आणि व्हिडिओचे metadata तपासता येते. व्हिडिओ editing apps किंवा AI tools ची संकेत-चिन्हे metadata मध्ये दिसू शकतात. तसेच संशयास्पद किंवा नव्याने तयार झालेल्या अकाउंटवरून आलेले व्हिडिओ जास्त वेळा खोटे असू शकतात. व्यावसायिक fact-checking वेबसाइट्सदेखील AI व्हिडिओ ओळखण्यास मदत करतात. आजच्या डिजिटल जगात प्रत्येकाला माहितीदार राहणे आवश्यक आहे. AI तंत्रज्ञानाचा वापर जिथे सकारात्मक बदल घडवतो आहे, तिथे चुकीची माहिती पसरवण्याचा धोका देखील तितकाच मोठा आहे. म्हणून या टिप्स लक्षात ठेवल्यास, आपण कोणता व्हिडिओ खरा आणि कोणता कृत्रिम ते सहज ओळखू शकता आणि चुकीची माहिती पसरवण्यापासून स्वतःलाही रोखू शकता.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
