Home » ‘हे’ उपाय करा आणि मिळवा डेरेदार तुळस

‘हे’ उपाय करा आणि मिळवा डेरेदार तुळस

by Jyotsna Kulkarni
0 comment
Tips for Basil plant Growth
Share

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. झाडांची हौस असो किंवा नसो तुळशी ही आपल्या प्रत्येकाच्या घरात असतेच असते. तिच्या धार्मिक महत्वासोबतच आरोग्यदायी फायदे देखील खूपच आहे. तुळशी नेहमीच बहरलेली असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. डेरेदार आणि मोठी तुळशी आपल्या देखील दारासमोर असावी आणि तिला पाहून आपल्यालाही आनंद, प्रसन्न वाटले पाहिजे. (Tips for Basil plant Growth)

मात्र तुळशीचे रोप घरी आणल्यानंतर अनेकदा काही दिवस चांगले राहून हळू हळू वळायला लागते, ते कोरडे होते, त्याला कीड लागते. अनेक उपाय करूनही या समस्या सुटत नाही. मुळातच तुळशीला पाणी कमी लागते. त्यामुळे कमी पाणी टाकूनही जर तुळशी टिकत नसेल तर नक्कीच वाईट वाटते. पण मग आपल्याकडेही उत्तम तुळशी टिकावी आणि बहरावी यासाठी काही छोटे उपाय केले तर नक्कीच फायदा होऊ शकतो. तुळशीची चांगली वाढ होऊन ती टिकण्यासाठी काही उपाय आपण पाहू.

Tips for Basil plant Growth

  • सर्वात आधी तुळशी ठेवण्याची योग्य जागा निवडा. जिथे किमान ५/६ तास सूर्यप्रकाश असेल अशा ठिकाणी तुळशीचे रोप लावावे. तुळशीच्या रोपाला सूर्यप्रकाशाची जास्त गरज असते.
  • तुळशीच्या झाडासाठी पाण्याचे प्रमाण देखील योग्य असावे. तुळशीला पाणी खूपच कमी लागते. त्यामुळे ऋतू कोणताही असो तुळशीला पाणी कमीच टाकावे. तुळशीला पाणी जास्त दिले तर, तिचे मुळ कुजून तुळशी खराब होण्याची भीती असते.
  • पावसाळ्यात वातावरणात थंडावा असतो आणि सूर्यप्रकाश देखील खूप कमी असतो, त्यामुळे या ऋतूत तुळशीला अजून कमी पाणी लागते.
  • तुम्ही तुळशी लावली ती जागा स्वच्छ ठेवा. तुळशीच्या कुंडीत अनेकदा कचरा साठत असतो. तुळशीचे गळालेली पाने, पिवळी पडलेली पाने कुंडीत पडतात. अशावेळेला आपण तुळशीची कुंडी सतत साफ करणे आवश्यक आहे.
  • तुळशीला चांगली वाढ मिळण्यासाठी माती देखील चांगली पाहिजे. पाण्याचा चांगला निचरा होणारी, सुपीक माती आपण या रोपासाठी वापरली पाहिजे. सोबतच तुळशीला मातीतून सर्वोत्कृष्ट पोषक द्रव्ये मिळतील याची काळजी घेणे आवश्यक आहे.
  • तुळशीला जशी योग्य माती आवश्यक आहे, तशी खते देखील महत्वाची आहेत. तुळशीच्या रोपाच्या उत्तम वाढीसाठी शेण खताचा वापर योग्य ठरतो. सोबतच इतर सेंद्रिय खते देखील या रोपासाठी चांगली असतात. मात्र त्याचे वापरण्याचे प्रमाण झाड किती मोठे, लहान आहे, यानुसार ठरवावे. जर खतं उपलब्ध नसतील तर चहाचा चोथा देखील तुळशीला घातलेला चालेल. शिवाय कुंडीतली थोडी माती उकरून चहाची पावडर टाकली तरी चालते. यामुळे झाडाची योग्य वाढ होऊन पानांना चमक येते.

Tips for Basil plant Growth

=================
हे देखील वाचा :  पावसाळ्यात जीन्स घातल्यानंतर त्याला चिखल लागला जातो. अशातच जीन्स स्वच्छ धुवायची कशी असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. यासाठीच सोपी ट्रिक जाणून घेऊया….
================
  • तुळशीच्या झाडाला मंजिरीच्या रूपात बी येते. हे बी आपण सतत काढणे आवश्यक आहे. कारण तुळशीला जर बी असेल तर या बी चे पोषण करण्यातच त्यातले सर्व गुणधर्म निघून जातात. त्यामुळे उरलेल्या झाडाचे पोषण अपूर्ण राहते. तुळशीचे बी अर्थात मंजिरी आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे. त्यामुळे यापासून तुम्ही नवीन झाड लावू शकता किंवा सर्दी, खोकल्यामध्ये त्याचा औषध म्हणून वापर करू शकता. सोबतच या झाडाची वेळोवेळी योग्य प्रकारची छाटणी देखील केल्यास झाडाच्या वाढीसाठी हे योग्य ठरेल.
  • कधी कधी तुळशीच्या पानांवर मोठ्या प्रमाणावर कीड लागते. या किडमुळे देखील झाड खराब होते. अशावेळेस तुम्ही हे कीड काढण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर करू शकतात. कडुलिंबाच्या पानांचा रस काढून त्यात पाणी मिसळून ते झाल्यावर स्प्रे केल्यास ही कीड नाहीशी होऊ शकते. (Tips for Basil plant Growth)

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.