आता उन्हाळ्याची सुरुवात तर मोठ्या दणक्यातच झाली. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा तडाखा जाणवत आहे. उन्हाळा म्हटले की, अनेक समस्या निर्माण होतात, ज्यामुळे आपल्याला खूपच त्रास होतो. घामाची समस्या उन्हाळ्यात होणाऱ्या त्रासांमध्ये अधिक डोकेदुखी ठरते. उन्हाळ्यात भरपूर घाम येतो आणि या घामाला मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी देखील येते. तसे पाहिले तर उन्हाळयात घाम येणे खूपच सामान्य आहे. मात्र या घामामुळे आणि त्याच्या दुर्गंधी आपल्याला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना खूपच त्रास होतो. या घामाच्या दुर्गंधीमुळे चारचौघात अगदी लाजिरवाणे होते. (Summer)
घाम येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कमी अधिक प्रमाणात प्रत्येकालाच घाम येतो. उन्हाळ्यात घामाचे प्रमाण बऱ्यापैकी वाढलेले असते. सामान्यपणे घाम आल्यानंतर सहा तासांनी अंगाला दुर्गंधी येऊ लागते. शरीराच्या घाम येणाऱ्या भागात जंतू जमा होतात आणि दुर्गंधी निर्माण करतात. आता घामाला येण्यापासून आपण रोखू शकत नाही, मात्र घामाला येणारी दुर्गंधी नक्कीच थांबवू शकतो. जर आपण काही छोट्या घरगुती टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच ही दुर्गंधी गायब होईल. (Sweat Smell)
१) घामाच्या दुर्गंधीपासून आराम मिळवायचा असेल तर गुलाबपाणी चांगला उपाय ठरू शकतो. गुलाबजल जर तुम्ही स्प्रे बाटलीत सोबत बाळगले आणि गरज असेल तेव्हा स्प्रे केले तर नक्कीच घामाची दुर्गंधी निघून जाईल. याशिवाय तुम्ही गुलाब पाण्याने अंडरआर्म्स साफ करू शकता. अंघोळीच्या पाण्यात थोडे गुलाबजल मिसळून अंघोळ केल्यास घामाच्या दुर्गंधीपासूनही आराम मिळेल. (Lifestyle)
२) टोमॅटो हा देखील घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी उत्तम आहे. टोमॅटो हा व्हिटॅमिन-सी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असल्याने, हा जास्त घाम येण्यास प्रतिबंधित करतो. शिवाय शरीराच्या पृष्ठभागावरील बॅक्टेरिया काढून टाकण्यास देखील मदत करते. पण हा उपाय करायचा तरी कसा? तर टोमॅटोच्या रसात एक स्वच्छ कापड बुडवून ज्या ठिकाणी जास्त घाम आणि दुर्गंधी येते त्या भागांवर लावा. हा रस छिद्र बंद करेल आणि जास्त घाम कमी होईल. (Remedies For Sweat Smell)
============
हे देखील वाचा : Heatstroke : उन्हाळ्यात उष्मघातापासून वाचण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
============
३) घामाच्या दुर्गंधीमुळे वाटणारा ऑकवर्डनेस घालवण्यासाठी लोकं महागडे डिओड्रंट आणि परफ्युम लावतात. मात्र तरीही ही समस्या काही केल्या कमी होत नाही. थोड्यावेळासाठी याचा उपयोग होत असेल, मात्र जास्त काळासाठी या भंपक गोष्टी देखील फेल ठरतात. मग जास्त काळासाठी घामाची दुर्गंधी घालवायची असेल तर कडुलिंबाची पाने नक्कीच घामाचा वास घालवण्यासाठी कडूनिंबाची पानं चांगला ऑप्शन ठरतील. कडूनिंबाची पानं पाण्यात टाकून त्या पाण्यानं आंघोळ केल्यास, घामाचा दुर्गंध नाहीसा होतो. (Marathi Top Stories)
४) तुरटीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. आंघोळीपूर्वी अंडरआर्म्सवर तुरटी तीन ते चार मिनिटे चोळा आणि त्यानंतर स्वच्छ धुवा. यामुळे अंडरआर्म्सला घामाची दुर्गंधी येणार नाही. तुरटी दुर्गंधी घालवण्यासोबतच बॅक्टेरिया नष्ट करण्याचेही काम करते. (Latest Marathi News)
५) निलगिरीचे तेल पाण्यात मिसळून या पाण्याने आंघोळ केल्याने घामाचा वास दूर होतो. निलगिरीचे तेल बॅक्टेरियासाठी प्रतिबंध असून, अँटीफंगल देखील आहे. आंघोळ करताना पाण्यात निलगिरीचे तेल टाकून या पाण्याने आंघोळ करावी. (Social News)
६) रॉक सॉल्टच्या पाण्याने आंघोळ केल्याने बॅक्टेरियाचे संक्रमण कमी होण्यास मदत होते. या पाण्याने अंघोळ केल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात आणि घामाचा वास कमी होतो.
७) आंघोळीनंतर शरीरावर लॅव्हेंडर, पेपरमिंट, पाइन तेल, टी ट्री ऑईल, कॅस्टर ऑइल हलकेच लावल्यास शरीराची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.
============
हे देखील वाचा : Dhananjay Munde : मुंडेंचा मंत्रीपदाचा राजीनामा, संतोष देशमुख यांना न्याय मिळणार ?
============
८) यासोबतच दिवसातून दोन वेळा स्वच्छ आंघोळ करा. अंघोळीसाठी चांगला अँटिबॅक्टेरियल साबण वापरा. आंघोळीनंतर अंग पुसायला स्वच्छ टॉवेल वापरा आणि अंग पूर्णपणे कोरडे करा. चांगले डिओड्रंट वापरा. नैसर्गिक कॉटन अथवा लोकरीचे कपडे वापरा. घट्ट कपड्यांचा वापर जास्त करू नका.
९) काखेतील केस वेळोवेळी काढून टाका. केसांमुळे घाम त्यात साचून राहातो आणि, त्यामुळे दुर्गंधी जास्त येते. शिवाय आहारात देखील थोडे बदल करा. कांदा कमी प्रमाणात खा आणि फळं, मासे आणि भाजी या खाण्यावर जास्त भर द्या. सोबतच भरपूर प्रमाणात पाणी प्या.