आजच्या फास्ट आणि मॉडर्न काळात आपण जगत असताना आपले जीवन सुखकारक होण्यासाठी अनेक बाबी, गोष्टी उपलब्ध आहेत. मात्र या सर्वगोष्टींमुळे किंवा आधुनिकीकरणामुळे माणसाच्या जीवनावर याचा विपरीत परिणाम होऊ लागला आणि त्यामुळे त्याला आरोग्याच्या विविध समस्या जाणवण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यातून बचाव करण्यासाठी अनेक उपाय केले जाऊ लागले. डॉक्टर, डायटिशियन यांच्या सल्ल्याने नानाविध प्रकारच्या बिया खाण्यास सुरुवात झाली.
याच बिया प्रकारातील एक नाव म्हणजे ‘चिया सीड्स’. हे नाव आता आपल्याला काही नवीन नाही. सोशल मीडिया आणि कलाकारांच्या तोंडात आपल्याला हे नाव सतत ऐकू येते. ग्लॅमर जगतातील अनेक कलाकार हे स्वतःला फिट ठेवण्यासाठी चिया सीड्स खाताना दिसतात. या चिया सीड्स किंवा चिया बियांमध्ये भरपूर पोषक असतात, म्हणूनच त्यांना सुपरफूड मानले जाते. फायबर, प्रथिने, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे चांगल्या प्रमाणात आढळतात.
चिया सीड्स भिजवल्याने त्या फुगतात. त्यामुळे एक जेल तयार होते, जे ब्लोटिंग कमी करते. त्यामुळे रक्तातील साखर आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. चिया सीड्स भिजवल्यावर पाणी शोषून घेतात आणि त्या त्यांच्या वजनाच्या तब्बल बारा पट वाढतात. त्यामुळे या सीड्स हायड्रेशनसाठी अतिशय उत्तम पर्याय समजला जातो. कारण त्या शरीराला जास्त काळ हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. खासकरून जेव्हा तुम्ही या चिया सीड्स व्यायाम केल्यानंतर किंवा गरम हवामानात खातात तेव्हा त्या जास्त उपयुक्त ठरतात. याचा आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. चला जाणून घेऊया चिया सीड्स खाण्याचे फायदे.
अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध
चिया सीड्समध्ये अँटीऑक्सिडंट्सची उच्च पातळी असते, जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह डॅमेजपासून पेशींचे रक्षण करतात. भिजविलेल्या चिया सीड्सचे दररोज खाल्ल्याने वृद्धत्व कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यास मदत
भिजवलेल्या चिया सीड्स पोटात फुगतात. त्यामुळे भूक कमी लागू शकते आणि जास्त खाणे आपोआप टळू शकते. याचा थेट परिणाम तुमच्या भूकेवर होऊन जेवण कमी खाल्ले जाते आणि मग वजन कमी होण्यास मदत होते.
हृदयाच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट
चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिडस्, फायबर, अँटिऑक्सिडंट्सचे मिश्रण असते. हे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट आहे. हे पोषक घटक खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.
ऊर्जेचा स्रोत
चिया सीड्स हे स्लो-रिलीज कार्बोहायड्रेट्सचे पॉवरफुल सोर्स आहेत; ज्यामुळे ते ऊर्जा आणि सहनशक्ती वाढविण्यास मदत करतात. चिया सीड्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम व फॉस्फरस हे घटक जास्त प्रमाणात असतात, जे हाडे आणि दात मजबूत राखण्यासाठी आवश्यक असतात. भिजविलेल्या चिया सीड्सचे नियमित सेवन केल्याने हाडांची घनता सुधारण्यास मदत होते.
साखरेची पातळी राखण्यास मदत
भिजवलेल्या चिया सीड्स रक्तप्रवाहात होणारे साखरेचे शोषण कमी करतात. परिणामी रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे विशेषतः मधुमेहींंसाठी चिया सीड्स फायदेशीर ठरतात.
फायबरचा उत्कृष्ट स्रोत
उच्च फायबर सामग्रीसह, चिया बिया पचनास मदत करू शकतात आणि आपल्या आतड्याच्या आरोग्यास समर्थन देऊ शकतात.
=======
हे देखील वाचा : सकाळी लवकर उठण्याचे फायदे
=======
ओमेगा-3 फॅटी ऍसिडस्
चिया सीड्स हे ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे सर्वोत्तम वनस्पती-आधारित स्त्रोतांपैकी एक आहे. जे मेंदूच्या आरोग्यास समर्थन देतात, जळजळ कमी करतात आणि हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देतात.
चिया सीड्स कशा खाव्या
चिया सीड्स खाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे चिया सीड्स पाण्यात भिजवून सकाळी खाणे. चिया सीड्स दिवसभरात कोणत्याही वेळी खाऊ शकता, कोणत्याही जेवणात ते समाविष्ट करा. चिया सीड्स कच्च्या खाल्ल्या जाऊ शकतात शिवाय त्याचे पुडिंग बनवतात, स्मूदी आणि ज्यूसमध्ये मिसळून देखील नाश्त्याला खाता येतात. चिया सीड्स नैसर्गिकरित्या ग्लूटेन-फ्री आहे.
(महत्वाची टीप : वरील बाबी गाजावाजा एक माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून गाजावाजा कोणताही दावा करत नाही. माहिती वाचून तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच त्या बाबी किंवा गोष्टी अंमलात आणा.)