आपण नेहमीच बाजारातून फळं, भाज्या आणल्या की त्या जागेवर ठेवण्यापूर्वी किंवा वापरण्यापूर्वी स्वच्छ धुतल्या जातात. अर्थात भाज्या आणि फळं धुऊन खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे असते. कारण बाजारातून आणलेल्या भाज्या आणि फळं यांवर मोठ्या प्रमाणावर धूळ, माती, कचरा तर असतो सोबतच विविध रासायनिक खतं देखील असतात. त्यामुळे जर आपण भाज्या फळं धुतले नाही तर हे सर्व आपसूकच आपल्या पोटात जाते आणि त्याचा आपल्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. सर्वच भाज्या आणि फळं स्वच्छ करणे तसे एकदम सोपे असते. मात्र स्ट्रॉबेरी हे फळं स्वच्छ करणे अवघड असते. (Strawberry)
लाल भडक, रसाळ आणि चवीला आंबट गोड असणारी स्ट्रॉबेरी सगळ्यांचेच आवडते फळं आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच स्ट्रॉबेरीच्या सिझनची आतुरतेने वाट बघत असतात. स्ट्रॉबेरी जेवढी चवीला मस्त लागते तेवढीच ती आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असते. या फळामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर असतात, जे रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल आणि पचन नियंत्रित करण्यासाठी उत्तम असतात. ही आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, त्वचा तजेटदार बनवण्यास आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मात्र ही स्ट्रॉबेरी घरी आणल्यावर धुणे खूपच आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे स्ट्रॉबेरीवर सर्वात जास्त केमिकल्स असतात. (Marathi)

स्ट्रॉबेरी ‘डर्टी डझन’ फळांपैकी एक आहेत, ज्यामध्ये कीटकनाशकांचे अवशेष सर्वाधिक असतात. साधे पाणी ही रसायने आणि लपलेले बॅक्टेरिया पूर्णपणे काढून टाकत नाही. स्ट्रॉबेरी खाणे हे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. परंतु योग्य स्वच्छता न केल्यास ते हानिकारक ठरू शकतात. अनेक लोकं स्ट्रॉबेरी सध्या पाण्याने दोन ते तीन वेळ धुऊन घेतात. मात्र स्ट्रॉबेरीला नीट स्वच्छ करण्यासाठी केवळ पाण्याचा वापर पुरेसा नसतो. त्यामुळे स्ट्रॉबेरी स्वच्छ करण्यासाठी नक्की काय करावे आणि स्ट्रॉबेरी स्वच्छ कशी करावी? जाणून घेऊया. (Top Trending Headline)
स्ट्रॉबेरी स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात १ भाग व्हाइट व्हिनेगर आणि ३ भाग पाणी घ्या. स्ट्रॉबेरीज या पाण्यात ५ ते १० मिनिटे भिजवून ठेवा. नंतर त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. याव्यतिरिक्त तुम्ही १ लिटर पाण्यात घेऊन त्यात १ चमचा बेकिंग सोडा मिसळा. स्ट्रॉबेरीज या पाण्यात ५ मिनिटे भिजत घाला. नंतर त्या स्वच्छ पाण्याने दोनदा धुवा. स्ट्रॉबेरी स्वच्छ करण्यासाठी मिठाचा वापर देखील केला जातो यासाठी १ लिटर पाण्यात १ चमचा मीठ घालून मिश्रण तयार करा. आता स्ट्रॉबेरीज यात ५ ते १० मिनिटे भिजत ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. (Top Stories)
=======
Kitchen Tips : कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येते? मग ‘या’ टिप्स करा फॉलो
=======
आता कोणत्याही पद्धतीने स्वच्छ धुऊन घेतलेल्या सर्व स्ट्रॉबेरी एका कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर त्या एक एयरटाईट कंटेनर घ्या. या एयरटाईट कंटेनरमध्ये खाली टिशुपेपर टाका. या टिशूपेपरवर स्ट्रॉबेरी ठेवा आणि वरून पुन्हा टिशूपेपर ठेवा आणि झाकण लावून तो डब्बा फ्रिजमध्ये ठेवा. आता या स्ट्रॉबेरी तुम्ही कधीही खाऊ शकता. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
