आजच्या आधुनिक काळातील मुलींचा अतिशय लाडका आणि लोकप्रिय पेहराव म्हणजे जीन्स. कॅज्युअल आणि फॉर्मल अशा दोन्ही लूकमध्ये जीन्स अगदी परफेक्ट बसते. अतिशय आरामदायी वेशभूषा म्हणून जीन्स मुली आणि महिलांमध्ये देखील विशेष प्रिय आहे. त्यामुळे प्रत्येक मुलीकडे, महिलांकडे जीन्स असतेच असते. मात्र अनेकदा आपण जीन्स फक्त आपल्याला आवडते, आपल्याला बसली किंवा आपल्या आवडत्या कलरची आहे म्हणून आपण घेतो. इथेच आपण चुकतो. (Jeans)
आपण जीन्स घेताना फक्त साईझ आणि कलर हाच विचार करतो. हा विचार देखील महत्त्वाचाच आहे, मात्र यासोबतच आपण अजून काही गोष्टी देखील लक्षात ठेवल्या पाहिजे. जेणेकरून आपण घेतलेली जीन्स आपल्यावर अधिक चांगली दिसेल आणि आपला लूक उठून येईल. मग जीन्स घेताना आपण नक्को कोणत्या गोष्टी चेक करून घ्याव्या हेच आपण या लेखातून जाणून घेऊया. (Fashion Tips)
– जीन्स निवडताना आपण आपल्या शरीरानुसार विचार करावा. अर्थात जर तुम्ही बारीक असला तर स्किनी जीन्स किंवा स्लिम फिट जीन्स तुमच्यावर जास्त खुलून दिसेल. शिवाय तुमच्या पायांना देखील योग्य लुक मिळतो. मध्यम शरीरयष्टीच्या स्त्रियांनी बूटकट किंवा फ्लेअर्ड जीन्स घेतली पाहिजे. तर थोडे भरदस्त महिलांनी हाय-वेस्ट जीन्स निवडावी कारण यामुळे पोटाचा भाग कमी दिसतो. (Top Stories)
– जीन्स खरेदी करताना फिटिंगकडे खासकरून जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. जीन्स खूप टाइट किंवा खूप सैल असू नये. जीन्स घातल्यानंतर चालणे, बसणे, अशा शारीरिक क्रिया अतिशय सहजपणे करता आल्या पाहिजे. जीन्स निवडताना ती योग्य मटेरियलची निवडणे देखील महत्त्वाचे आहे.
– जीन्स निवडताना तिची लांबी देखील महत्त्वाची असते. पायघोळापर्यंत पोहोचणारी जीन्स क्लासिक आणि स्टायलिश वाटते. ट्रेंडी लुक हवा असेल, तर अँकल-लेंथ जीन्स किंवा कटेड हेम्ससारखे पर्याय तुम्हाला ग्लॅमरस लूक देतात. (Lifestyle)
– जीन्सचा कलर देखील निवडताना विचार करणे योग्य ठरते. खासकरून डार्क ब्लू, ब्लॅक किंवा ग्रे जीन्स कोणत्याही कलरच्या आणि पॅटर्नच्या टॉपसोबत चांगल्या दिसतात. सोबतच या जीन्स फॉर्मल तसेच कॅज्युअल अशा दोन्ही लुकसाठी उपयुक्त असतात. (Fashion News)
==============
हे देखील वाचा : Mahakumbhmela महाकुंभमेळ्यासाठी जाताय मग ‘हे’ अॅप डाऊनलोड कराच
==============
– जीन्स खरेदी करताना ब्रँड आणि बजेटकडेही लक्ष द्या. नामांकित ब्रँड्सची जीन्स टिकाऊ असते आणि चांगले फिटिंग देते. मात्र, तुमच्या बजेटनुसार स्थानिक ब्रँड्सचे पर्यायही नक्कीच तुम्ही पाहू शकता. जीन्स खरेदी करताना आधी ट्रायल घेणे नेहमीच चांगले ठरते.
– जीन्ससोबत आपण फक्त टॉप घालून लूक पूर्ण करत नाही. तर त्यासोबत कमी का असेना पण ऍक्सेसरीज देखील घालतो. अशावेळेस जीन्समध्ये तुम्ही स्टायलिश दिसण्यासाठी अॅक्सेसरीज योग्य प्रमाणात वापरणे आणि निवडणे गरजेचे असते. योग्य बेल्ट, शूज आणि टॉप यामुळे तुमचा संपूर्ण लुक क्लासी दिसतो. नेहमीच या ऍक्सेसरीज निवडताना सध्या कोणता ट्रेंड चालू याचा विचार नक्की करा.