Home » Independence Day : स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी ‘असे’ करा बुकिंग

Independence Day : स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी ‘असे’ करा बुकिंग

by Jyotsna Kulkarni
0 comment
Independence Day
Share

येत्या काही दिवसातच आपण आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. १५ ऑगस्ट हा आपला राष्ट्रीय सण असल्याने सगळेच या दिवसासाठी खूपच उत्सुक असतात. १५० वर्षांनी इंग्रजांनी आपल्याला त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त केले आणि भारत स्वतंत्र राष्ट्र झाला. या स्वातंत्र्यासाठी आपण आपल्या अतिशय महान दिग्गजांना गमावले आहे. अनेकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता देशासाठी बलिदान दिले. या दिवशी आपण या सर्व महान लोकांना श्रद्धांजली वाहतो आणि उत्सहाने १५ ऑगस्ट साजरे करतो.(Marathi News)

आता १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी देशाचा कोणताही राष्ट्रीय सण असला की त्याचे मुख्य सेलिब्रेशन हे दिल्लीला आपल्या राजधानीमध्ये असते. १५ ऑगस्टचा ध्वजारोहणाचा सोहळा हा लाल किल्ल्यावर होतो. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशातील नेते, उद्योगपती, परदेशातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व,कलाकार आदींसोबतच सामान्य नागरिक देखील उपस्थित असतात. मात्र अनेकांना प्रश्न पडला असेल की या सोहळ्याला सामान्य नागरिकांना येण्याची परवानगी असते का? आणि जर असेल तर आपण या सोहळ्याला जाऊन याची देही याची डोळा तो कसा पाहू शकतो? चला तर मग आज याबद्दलच जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

हो..सामान्य नागरिक स्वातंत्र्यात सोहळ्याला हजेरी राहू शकता. मात्र यासाठी तुमच्याकडे अधिकृत परवानगी असणे आवश्यक असते. यंदा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून ध्वरोहण करतील आणि देशाला संबोधित करतील. हा संपूर्ण सोहळा जगात थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून असंख्य लोकं बघत असतात. जर तुम्हाला देखील हा सोहळा लाल किल्ल्यावर जाऊनच अनुभवायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करणे गरजेचे आहे. जाणून घ्या या संपूर्ण प्रक्रियेबद्दल.  (Latest Marathi Headline)

तुम्ही १३ ऑगस्टपासून रक्षा मंत्रालयची वेबसाइट [aamantran.mod.gov.in](https://aamantran.mod.gov.in) किंवा [e-invitations.mod.gov.in](https://e-invitations.mod.gov.in) या वेबसाईटला भेट देऊन तुमची तिकिटेबुक करू शकता आणि या ऐतिहासिक क्षणाला प्रत्यक्ष उपस्थित राहून अनुभवू शकता. (Top Trending News)

==========

हे देखील वाचा : Red Fort : आग्रा आणि दिल्ली येथील लाल किल्ल्यामध्ये काय फरक आहे? कोणाला अधिक महत्व घ्या जाणून

==========

वेबसाइट करून तिकीट बुक कसे करावे?

* तिकीट बुक करण्यासाठी सर्वात आधी वेबसाईट ओपन करा आणि Independence Day 2025 Ticket Booking वर क्लिक करा.
* क्लिक केल्यानंतर आता एक फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती ज्यात, तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि किती तिकीट हवी आहेत आदी सर्व माहिती भरावी.
* तुम्हाला या फॉर्मसोबत आधार कार्ड किंवा कोणतेही अधिकृत ओळखपत्र अपलोड करावे लागते.
* स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या तिकटांची किंमत २० रुपये, १०० रुपये आणि ५०० रुपये अशी आहे. तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या किंमतीचे तिकीट बुक करा.
* तुमचे पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ई तिकीट मिळेल, ज्यामध्ये एक QR कोड आणि तुमच्या सीट नंबर विषयी माहिती असेल.
* हे तिकीट तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि त्याची प्रिंट घ्या. लाल किल्ल्यावर एंट्री वेळी तुम्हाला तिकीटाची प्रिंट लागेल. (Top Marathi News)

जर तुम्हाला ऑनलाईन तिकीट बुक करता येत नसेल तर तुम्ही ऑफलाइन देखील तिकिट खरेदी करू शकता. मात्र ऑफलाइन तिकीट खरेदी करण्यासाठी तुम्ही दिल्लीमध्ये असणे आवश्यक असते. ऑफलाइन तिकीट हे दिल्लीतील काही सरकारी भवन आणि काही विशेष काउंटरवरून १० ते १२ ऑगस्ट दरम्यान खरेदी करता येणार आहे. मात्र ऑफलाइन तिकीट ही खूपच मोजकी असतात. त्यामुळे ही लवकर संपण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळेच ही ऑफलाइन तिकीट खरेदी करण्यासाठी घाई करावी लागते. या तिकिटांची मागणी प्रचंड असल्यामुळे यांची विक्री देखील मोठ्या प्रमाणात होते. ऑफलाइन तिकीट खरेदी करताना देखील तुमचे अधिकृत ओळखपत्र असणे आवश्यक असते. (Latest Marathi News)

स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला लाल किल्ल्यावर पोहचण्यासाठी दिल्ली मेट्रो जनतेसाठी काही सुविधा देते. या सोहळ्याच्या दिवशी मेट्रो सकाळी ४ वाजल्यापासून सुरू केली जाते. त्यामुळे लोकांना लाल किल्ल्यावर पोहोचण्यात कोणतीही अडचण येत नाही. लाल किल्ला परिसरातील जवळची मेट्रो स्टेशन म्हणजे लाल किल्ला मेट्रो स्टेशन आणि चांदनी चौक मेट्रो स्टेशन. या स्टेशनवर उतरल्यानंतर अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर लाल किल्ला आहे जिथे स्वतंत्र्य दिनाचा सोहळा आयोजित केला जातो. हा कार्यक्रम सकाळी साडेसात वाजता सुरू होतो, यामुळे तुम्हाला किमान साडे सहा किंवा सात वाजेपर्यंत या ठिकाणी पोहोचणे आवश्यक आहे. (Social News)

==========

हे देखील वाचा : Independence Day : स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरच तिरंगा का फडकवला जातो?

==========

खास लक्षात ठेवायच्या गोष्टी

* तुमच्याकडे तिकीट असणे गरजेचे आहे याशिवाय तुम्हाला एन्ट्री मिळणार नाही. तिकीटाची प्रिंट हातात असली पाहिजे.
* कोणत्याही फेक वेबसाईट किंवा ऍप वरून तिकीट खरेदी करू नका यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते आणि पैसे देखील वाया जातील.
* तुमच्याकडे एंट्री करताना तुमचे अधिकृत ओळखपत्र असणे गरजेचे आहे.
* सोहळ्याला जाताना स्वतःजवळ कमीतकमी सामान बाळगा. इलेक्ट्रॉनिक सामान मर्यादित घ्या, कारण इथे सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंना परवानगी नाही.
* एंट्रीवेळी होणाऱ्या सुरक्षा तपासणीसाठी वेळ लागू शकतो यामुळे लवकरात लवकर सोहळ्याच्या ठिकाणी पोहचा.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.