येत्या २६ जानेवारी रोजी देशातील मुख्य प्रजासत्ताक दिनाचा सोहळा हा दिल्ली येथील कर्तव्यपथावर होणार आहे. यासाठी संपूर्ण दिल्ली आणि राष्ट्रपतीभवन येथे जोरदार तयार चालू आहे. भारताचे प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपतींचे निवासस्थान म्हणून राष्ट्रपतीभवनाची संपूर्ण जगामध्ये ओळख आहे. भारतातील राष्ट्रपतीभवन हे जगभर त्याच्या उत्कृष्ट वास्तुकलेचा आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतातील लोकांना देखील कायम या राष्ट्रपतीभवनाबद्दल अप्रूप असते. मात्र या भवनात प्रवेश करणे वाटते तेवढे सोपे नाही. (Delhi)
बातम्यांमध्ये अनेकदा आपण राष्ट्रपती भवनातील ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले असे ऐकायला देखील येते. दिल्लीमध्ये गेल्यानंतर राष्ट्रपती भवन पाहिले नाही असे होऊच शकत नाही. दिल्लीच्या सर्वच पर्यटक स्थळांपैकी सर्वात लोकप्रिय पर्यटक स्थळ म्हणून या भवनाकडे पाहिले जाते. ज्यांना ज्यांना राष्ट्रपती भवन पाहायचे त्यासाठी एक प्रक्रिया आहे ती फॉलो करून तुम्ही राष्ट्रपती भवनामध्ये प्रवेश करू शकता. मग ही प्रक्रिया कोणती आणि या भव्य अशा वास्तूची वैशिष्ट्ये कोणती चला जाणून घेऊया. (Marathi)
राष्ट्रपती भवनात जाण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत वेबसाइट visit.rashtrapatibhavan.gov.in वर जावे लागेल. याठिकाणी पेज ओपन केल्यावर तुम्हाला Book Now वर क्लिक करावे लागेल. Book Now वर क्लिक केल्यावर नवीन पेज सुरू होईल. यामध्ये तुम्हाला ज्यादिवशी आणि ज्या वेळेला जायचे असेल त्यावर सिलेक्ट करावे लागेल. याठिकाणी तुम्ही सकाळी ०९:३० वाजेपासून ते ०३:३० वाजेपर्यंत दरम्यानच्या काळात कधीही जाऊ शकतात. (Todays Marathi Headline)

तारीख आणि वेळ निवडल्यानंतर आणखी नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमची पर्सनल माहिती टाकायची आहे. जसे की, तुमचे नाव, तुमचे राज्य, तुमच्या जिल्ह्याचे नाव, तुमचा फोन नंबर, ईमेल आयडी इत्यादी. हे सर्व डिटेल्स भरल्यावर आणखी एक नवीन पेज सुरू होईल. यामध्ये तुम्हाला तिकिटाचे पैसे द्यावे लागतील. राष्ट्रपती भवनात जाण्यासाठी तिकिट फक्त ५० रुपये आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यूपीआय आयडी, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करू शकतात. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमचे तिकिट ईमेल आयडीवर मिळून जाईल. तिथून तुम्ही ते डाऊनलोड करू शकतात. (Social Updates)
राष्ट्रपती भवनमध्ये पोहोचण्यासाठी तुम्ही मेट्रो, बस आणि तुमच्या वाहनातूही जाऊ शकता. जर तुम्ही मेट्रोने येत असाल तर जवळचे मेट्रो स्टेशन हे उद्योग भवन आहे. याशिवाय तुम्ही भवनापासून सुमारे १ किमी अंतरावर असलेल्या केंद्रीय सचिवालय या स्टॉपवर किंवा पटेल चौक या स्टॉपवर उतरू शकतात. तुम्ही बसने येत असाल तर राष्ट्रपती भवनच्या समोरच बस स्टॉप आहे. या बस स्टॉपचे नाव केंद्रीय टर्मिनल आहे. लक्षात ठेवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रपती भवनामध्ये मोठी यंत्रणा काम करते. त्यामुळे तुम्हाला त्यांना कायम सहकार्य करावे लागते. या भवनामध्ये मोबाईल फोन आणि बॅग नेण्यास मनाई आहे. राष्ट्रपती भवनामध्ये आत जाण्यास सुरक्षा तपासणी अनिवार्य असून, तुम्ही या भवनाच्या गेट नंबर ३८ मधून प्रवेश करू शकता. (Marathi Trending Headline)
राष्ट्रपती भवन हे बाहेरुन जेवढे सुंदर दिसते तेवढेच वैशिष्ट्यपूर्ण ते आतमध्ये आहे. ३४० खोल्या आणि त्यासाठी ४५ लाख विट लागली आहे. हे जगातील सर्वात मोठ्या अशा लोकशाहीच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान आहे. तर पहिले हे ब्रिटिश व्हाइसरॉयचे अधिकृत निवासस्थान होते. ज्यावेळी भारताची राजधानी ही कलकत्याहून दिल्लीला हलविण्याचा निर्णय झाला तेव्हा हे बांधण्यात आले तर यासाठी १७ वर्षाचा कालावधी लागला होता. ही वास्तु एडविन लँडसीर ल्युटेन्स यांनी उभारली आहे. (Top Stories)

सध्याचा जो दरबार हॉल आहे तो ब्रिटीश राजवटीत सिंहासन कक्ष म्हणून ओळखला जात होता. तर त्यामध्ये दोन सिंहासने होती. राष्ट्रपती भवनातील या दरबार हॉलमध्ये ३३ मीटर उंचीवर २ टन वजनाची झाडी लटकलेली आहे. आता याचे स्वरुप बदलण्यात आले आहे. केवळ सर्वसाधारण खुर्ची आहे, जी अध्यक्षांसाठी आहे. ५ व्या शतकातील गुप्त काळाशी संबंधित आशीर्वाद मुद्रेसह गौतम बुद्धांची एक मूर्ती आहे. या सभागृहाचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रपतींच्या खुर्चीवरून एखादी रेषा आखल्यास ती थेट राजपथमार्गे दुसऱ्या टोकाला असलेल्या इंडिया गेटच्या मध्यभागी आढळते. राष्ट्रपती भवनातील सेंट्रलडोममुळे या भवनाची वेगळी ओळख आहे. हा घुमट चार कोर्टापासून ५५ फूट उंच इमारतीच्या मुकुटासारखा आहे. (Top Marathi News)
राष्ट्रपती भवनातील संगमरवरी या भव्य हॉलमध्ये किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांचे पुतळे आहेत. तर माजी व्हाइसरॉय आणि गव्हर्नर जनरल यांची चित्रे आहेत.त्यावेळी राणीला चांदीचे सिंहासन असण्याचाही उपयोग झाला होता. राष्ट्रपती भवनाच्या उत्तरेकडील ड्रॉइंग रूममध्ये इतर देशातील राष्ट्रप्रमुखांना भेटण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याच ड्रॉइंग रूममधील दोन फोटो हे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. एकामध्ये १४ ऑगस्ट रोजी एस.एन.घोषाल यांचे सत्तांतर आणि ठाकूर सिंग यांच्या माध्यमातून पहिल्या भारतीय गव्हर्नर जनरलचा शपथविधी अशी चित्रे आहेत. (Latest Marathi HEadline)
राष्ट्रपती भवनामध्ये १०४ लोक एकाच वेळी बसू शकतील असा एक हॉल आहे. पूर्वी या हॉलला स्टेट डायनिंग हॉल म्हणून ओळखले जात होते. पुढे त्याला बँक्वेट हॉल असे नाव पडले. या हॉलमधील भिंतीवर माजी अध्यक्षांचे फोटो लावले आहेत. छोट्या-मोठ्या कार्यक्रमांसाठी पिवळ्या रंगाची ड्रॉइंग रूम वापरली जाते. एकाच मंत्र्याचा शपथविधी किंवा मुख्य निवडणूक आयुक्तांचा शपथविधी याप्रमाणे अशा छोट्या राजकीय कार्यक्रमासाठी त्याचा वापर केला जातो. यामध्ये ग्रे ड्रॉइंग रूमही आहे, जी पाहुण्यांच्या स्वागतासाठी वापरली जाते. (Top Stories)
========
Makhunik Village : इराणचे एक गूढ गाव…..
USA VS Greenland : अमेरिकन सैन्याला कुत्र्यांचे भय
========
अशोका हॉलमध्ये सर्व प्रकारचे मोठे समारंभ होतात. तर त्याच्या छतावर केवळ देशाच्याच नव्हे, तर इतर देशांच्या सम्राटांच्याही मार्गांची झलक दिसते. छतावर अशोक हॉलच्या छताचे केंद्र, इराणी साम्राज्याचा सम्राट फतेह अली शाह याचे विशाल चित्र असून त्याभोवती २२ राजपुत्र शिकार करताना दिसतात. राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन हे पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. जवळपास १५ एकरमध्ये उभारण्यात आले आहे, जे लोकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे .ही बाग तयार करण्यासाठी एडविन लुटियन्स यांनी पॅराडाईजच्या बागा, काश्मीरच्या मुघल गार्डन्स, तसेच भारत आणि प्राचीन इराणच्या मध्ययुगीन काळात बांधलेल्या राजे राजवाड्यांच्या बागांचा अभ्यास केला होता. या बागेत १९२८ मध्ये वृक्षारोपनाचे काम सुरु झाले होते. हे काम तब्बल वर्षभर सुरु होते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
