आपण जर मानसिक रुपात खुश असू तर त्याचा चांगला परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. तसेच आपल्याला दीर्घायुष्य सुद्धा लाभू शकते. परंतु अशा प्रकारचा आनंद मिळवण्यासाठी काही करावे लागते. बहुतांश लोकांजवळ सर्वकाही गोष्टी उपलब्ध असतात. कोणत्याही गोष्टीची कमतरता त्यांना नसते तरीही ते खुश नसतात. व्यक्तीला आपल्या आयुष्यात आनंदी (Happy life) राहण्यासाठी आपले वागणे-बोलणे आणि दररोजच्या कामांमध्ये थोडा बदल करण्याची गरज असते. कारण प्रत्येकाचे आयुष्य ही विविध पैलूंप्रमाणे घडलेले आहे. काहींच्या आयुष्यात खुप आनंद आहे तर काही जणाचे वाईट दिवस सुरु आहे. या सर्व गोष्टी आपल्या हातात नसतात. त्यामुळे आपल्याला जे आयुष्य मिळाले आहे त्यात समाधानी राहून कसे जगावे हे कळले पाहिजे. पण तरीही तुम्हाला सर्वकाही मिळून सुद्धा नाखूश असाल तर त्यावेळी नक्की काय करावे हे जर तुम्हाला कळले तर तुम्ही नेहमीच आनंदित दिसून येऊ शकता.
आयुष्यात केलेल्या अगदी लहान लहान बदलावांमुळे सुद्धा तुमच्यात फार मोठा फरक पडू शकतो. जसे की, आपल्याकडे असलेल्या वस्तू किंवा एखादी गोष्ट ही इतरांसोबत शेअर करणे, समोरच्या व्यक्तीशी आदराने आणि त्यांच्या भावना समजून घेणे या सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आवर्जुन केल्याच पाहिजेत. पण कोणतेही काम करताना त्यात तुमचा स्वार्थ साधू नका. असे केल्यास तुम्ही आनंदी व्हाल पण तो एका मर्यादित काळापुर्ताच असेल.
आनंदी राहण्यासाठी काही खास टीप्स
-एनएचएसडॉटक्यू यांच्यानुसार जी लोक तणावामुळे त्रस्त असात त्यांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ताण हा कधीच स्वत:हून कधीच कमी होत नाही. त्यासाठी तुम्ही मेडिटेशन, योगा किंवा मित्रपरिवारा सोबत मनमोकळे पणाने आपल्या मनातील गोष्टी बोला.
-आयुष्यात मजा-मस्ती करणे हे फार गरजेचे आहे. कारण प्रत्येक गोष्ट करण्यासाठी एक वेळ आणि काळ ठरवण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही जर ऑफिसला जाणारे असाल तर कामाचा तुम्हाला काहीवेळेस अधिकच ताण येतो. अशावेळी कामातून थोडी रजा घेऊन कुठेतरी फॅमिली किंवा मित्रमैणींसोबत बाहेर फिरायला जाऊन या. तुम्हाला थोडे बरे वाटेल.
हे देखील वाचा- तुमच्या ‘या’ सवयींमुळे तुम्ही आयुष्यात होऊ शकता कंगाल
-आणखी महत्वाचे म्हणजे तुमचा तुमच्यावरील आत्मविश्वास. भले तुमच्याकडे सर्वकाही आहे पण आपण जर एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्यात नक्कीच यश मिळवू असा आत्मविश्वास तुमच्यात पाहिजे. नाहीतर माझ्याकडून होत नाही किंवा मी खुप वेळ देतोय तरीही होत नाही असे करुन चालणार नाही.(Happy life)
-तंदुरस्त आरोग्य असावे असा सल्ला आपल्याला नेहमीच दिला जातो. त्यामुळे आपल्याला असलेल्या काही वाईट सवयी या वेळच्या वेळीच सोडून दिल्या पाहिजेत. त्यांचा अधिक वापर करण्यास आपण सुरुवात केली तर आयुष्यात यशाच्या मार्गाने जाण्याऐवजी अपयशच पदरी पडेल. त्यामुळे नेहमीच आनंदी रहायचे असेल तर वाईट सवयींपासून थोडे दुरच राहिलेले बरे.
-संतुलित डाएटचे ही नियमितपणे सेवन करा. कारण तुम्ही फिट असाल तरच काही कामे योग्य पद्धतीने आणि सुरळीत करु शकता.