साडी नेसणे प्रत्येक भारतीय स्त्रीला आवडत असते. प्रत्येक स्त्री ही साडीच अतिशय आकर्ष आणि सुंदर दिसते. साडी नेसणे आणि ती सांभाळणे जरी आजच्या मुलींना जास्त शक्य नसले तरी साडी नेसायला सगळेच कारण शोधतच असतात. साडी नेसणे ही देखील एक कला आहे. जास्त पिन्स न लावता साडी चापून चुपून नेसणे प्रत्येकालाच येते असे नाही. साडी नेसायचे जेव्हा महिला ठरवतात तेव्हा, साडी सोबतच तिला नीट बसवण्यासाठी लागणाऱ्या पिन्स सर्वात आधी बाहेर काढल्या जातात. कारण साडीला नीट ठेवण्यासाठी या पिन्स मोठी भूमिका पार पडतात. महिला कितीही साडीमध्ये कम्फरटेबल असल्या तरी एकतरी पिन साडीला लावावीच लागते. ज्यामुळे ती नीट राहील.(Saree Drapping)
मात्र साडीला या पिन्स लावण्याचे अनेक तोटे देखील आहेत. साडीला आपण जिथे पिन्स लावतो तिथे हळूहळू छोटे होल पडण्यास सुरुवात होते. आणि नंतर साडी फाटते. अनेक चांगल्या भारी साड्या देखील या पिन्समुळे लवकर खराब होतात. खासकरून पदर आणि निऱ्यांच्या ठिकाणी साड्या लवकरच फाटतात. पण पिन लावणे देखील आवश्यक असते. मग असे कोणते उपाय किंवा टिप्स आहेत का..? ज्या वापरून साडीला पिन लावणे डोकेदुखी पण ठरणार नाही, साडीला होल देखील पडणार नाही आणि साडी खराब देखील नाही होणार.(Saree Caring Tips)
मोती
साडी किंवा ओढणीमध्ये सेफ्टी पिन अडकू नये यासाठी मोत्याचा वापर नक्कीच फायदेशीर ठरेल. साडीच्या पदराला पिन लावताना सगळ्यात आधी पिनमध्ये किंवा साडीवर मोती ठेवून नंतर साडीला पिन लावावी. यामुळे साडी कोणत्याही ठिकाणी अडकल्यास ओढली जाऊन फाटणार नाही. आजकाल तर मोती असलेल्या सेफ्टी पिन्स देखील बाजारात सहजपणे मिळतात. (Social News)
=========
हे देखील वाचा : Pamban Bridge : जाणून घ्या भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिजची वैशिष्ट्ये
==========
रंगीत बटणं
महागड्या साड्यांना पिन्समुळे होल पडू नये किंवा या साड्यांचे कापड खराब होऊ नये म्हणून साडीला पिन लावताना रंगीत बटणाचा वापर करावा. यामुळे साडीचे धागे व्यवस्थित राहतात. साडीवर सेफ्टी पिन लावताना बटन लावून ओवून घ्या. हा उपाय केल्यामुळे साडीचे फ्रॅब्रिक फाटणार नाही आणि साडी जशीच्या तशी व्यवस्थित टिकून राहील.(Fashion News)
टिकली
कपाळावर लावलेली जाणारी टिकली देखील येथे नक्कीच उपयोगी पडणारी आहे. यासाठी टिकलीवर सेफ्टी पिन लावून नंतर ती पिन पदरावर किंवा ओढणीवर लावू शकता. यामुळे कपड्यावर कोणत्याही प्रकारचे होल किंवा धागे निघून येणार नाहीत. (Marathi Top News)
=========
हे देखील वाचा : Airports : ‘ही’ आहेत जगातील सर्वाधिक धोकायदायक विमानतळं
==========
कागदाचा लहान तुकडा
साड्यांना सेफ्टी पिन लावताना कागदाच्या लहान तुकड्याचा वापर करावा. सगळ्यात आधी कागदावर पिन लावून नंतर तो कागद असलेली पिन साडी किंवा ओढणीवर लावावी. यामुळे साड्या खराब होतं नाही. यासाठी तुम्ही घरात असलेल्या साडीला मॅचिंग अशा छोट्या कागदाच्या तुकड्याचा वापर देखील करू शकता.(Latest Marathi News)