Home » Vijay devarkonda birthday: फ्लॉप दिग्दर्शकाच्या मुलाने कसे मिळवले ‘सुपरस्टार’चे बिरुद ?

Vijay devarkonda birthday: फ्लॉप दिग्दर्शकाच्या मुलाने कसे मिळवले ‘सुपरस्टार’चे बिरुद ?

by Team Gajawaja
0 comment
Vijay devarkonda birthday
Share

सध्याच्या काळात बॉलिवूड कलाकारांना दाक्षिणात्य कलाकार जोरदार टक्कर देताना दिसत आहे.आजच्या घडीला अनेक दाक्षिणात्य कलाकार संपूर्ण जगात तुफान लोकप्रिय होताना दिसत आहे. अनेक कलाकारांना मिळालेल्या पॅन इंडिया ओळखींमध्ये एक मुख्य नाव म्हणजे विजय देवरकोंडा(Vijay devarkonda birthday). विजयला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही, साऊथ इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे त्याने दिले आहे. लवकरच तो बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार आहे. आज (९ मे) विजयचा वाढदिवस. यशाच्या अत्युच्च शिखरवर पोहचलेल्या विजयचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता या प्रवासात त्याने अनेक चांगले वाईट दिवस पाहिले. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया विजयच्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टींबद्दल.

तसे पाहिले तर विजयला(Vijay devarkonda birthday) पॅन इंडिया ओळख मिळवून दिली ती त्याच्या ‘अर्जुन रेड्डी’ या सिनेमाने. पुढे याच सिनेमाचा हिंदीमध्ये कबीर सिंग नावाने रिमेक करण्यात आला. या सिनेमाने बॉक्स ऑफीवर बक्कळ कमाई केली. विजय देवरकोंडाचा जन्म ९ मे १९८९ ला हैद्राबादमध्ये एका तेलगू कुटुंबात झाला. त्याचे वडील गोवर्धन राव हे देखील मनोरंजनविश्वात सक्रिय होते. त्याचे वडील ते टेलिव्हिजनविश्वातील अनेक शोच्या दिग्दर्शनाचे काम करायचे. मात्र त्यांना त्यात यश मिळाले नाही आणि त्यांनी काम करणे बंद केले. गोवर्धन राव हे दिग्दर्शनात फ्लॉप ठरले. मात्र त्यांच्या मुलाने मेहनतीच्या जोरावर सुपरस्टार हे बिरुद मिळवले. विजयला लहानपणापासूनच या क्षेत्राची ओढ होती. चौथीत असल्यापासूनच त्याने कथा लिहिण्याचे काम सुरु केले. पदवीचे शिक्ष पूर्ण झाल्यानंतर त्याने नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

=====

हे देखील वाचा- ‘मी अंधविश्वासू नाही मात्र माझा एनर्जीवर विश्वास आहे’, म्हणत कार्तिक सांगितला ‘भूल भुलैया २’ सिनेमाचा अनुभव

=====

पुढे त्याने २०११ साली ‘नुव्विला’ या चित्रपटापासून त्याच्या चित्रपट करिअरला सुरुवात केली. या सिनेमात तो सहायक कलाकाराच्या भूमिकेत होता. मात्र तरीही त्याने या भूमिकेत प्रेक्षक आणि समीक्षकांवर छाप पाडली. त्यानंतर पुढे २०१२ साली त्याला ‘लाइफ इज ब्यूटीफुल’ या सिनेमात सहायक भूमिका मिळाली. काही चित्रपटांमध्ये सहायक भूमिका केल्यानंतर २०१६ साली विजय(Vijay devarkonda birthday) ‘पेली चोपुलु’ या रोमॅंटिक ड्रामा सिनेमात मुख्य भूमिकेत झळकला. या सिनेमाला तेलगू बेस्ट फिचर चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, शिवाय विजयच्या अभिनयाचे देखील तुफान कौतुक झाले.

पुढे २०१७ साली आलेल्या ‘अर्जुन रेड्डी’ सिनेमाने तर विजय देवरकोंडाचे(Vijay devarkonda birthday) नशीबच बदलून टाकले. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले आणि त्याला या चित्रपटाने संपूर्ण जगात ओळख मिळवून दिली. या चित्रपटानंतर तो सुपरस्टार कलाकारांच्या आयडीत सामील झाला. त्याने ‘नोटा’, ‘डियर कॉमरेड’, ‘मेहनती’, ‘वर्ल्ड फेमस लवर’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. विजयचे त्याचे हिल एंटरटेनमेंट नावाने एक प्रोडक्शन हाऊस देखील आहे. विजय देवरकोंडाला ‘राऊडी’ नावाने देखील ओळखले जाते. विजय लहान असतांना खूपच उद्धट होता. त्यामुळेच त्याला त्याच्या कुटुंबातील लोकं राऊडी म्हणायचे. आता विजयने ‘राऊडी वियर’ त्याच्या कपड्यांचा एक ब्रँड लाँच केला आहे.

विजयच्या संघर्षातील दिवसांमध्ये त्याच्याकडे रिक्षाचे भाडे देण्याचे देखील पैसे नसायचे. मात्र आता त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. एका रिपोर्टनुसार विजयाकडे सध्याच्या घडीला ३० कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. दरवर्षी तो तब्ब्ल ६ कोटी रुपयांची कमाई करते. तो चित्रपटांमधून कमाई करण्यासोबतच सिनेमाच्या नफ्यात देखील शेअर घेतो. याशिवाय त्याची ब्रँड एंडोर्समेंटमधून सुद्धा तगडी कमाई होते. एका सिनेमासाठी तो तब्ब्ल ५/७ कोटी रुपये घेतो. त्याचा हैद्राबादमध्ये जुबली हिल परिसरात १५ कोटी रुपयांचा आलिशान बंगला आहे.

विजयला(Vijay devarkonda birthday) आलिशान गाड्यांची देखील खूपच हौस आहे. त्याच्याकडे अनेक मोठ्या गाड्यांचे कलेक्शन आहे. ज्यात मर्सिडीज बेंज, ऑडी, मर्सिडीज आदी अनेक गाड्या आहेत. आता तो लवकरच ‘लायगर’ या बॉलिवूडपटात झळकणार आहे. या सिनेमात तो अनन्या पांडेसोबत दिसणार आहे. सोबतच या सिनेमात ‘अमेरिकी बॉक्सर माइक टायसन’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. या सिनेमासाठी त्याने २० कोटींचे मानधन घेतले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.