Home » पाकिस्तानात दहशतवाद्यांना कशी दिली जाते ट्रेनिंग?

पाकिस्तानात दहशतवाद्यांना कशी दिली जाते ट्रेनिंग?

by Team Gajawaja
0 comment
Mumbai Terror Attack Threat
Share

आपण नेहमीच बातम्या ऐकतो की, जम्मू-कश्मीर येथे दहशतवाद्यांकडून हल्ला केला गेला. तसेच दहशतवादी घटनेची जबाबदारी एखाद्या संघटनेने घेतली आहे. परंतु या सर्व गोष्टी करण्यासाठी सुद्धा दहशतवाद्यांना ट्रेनिंग तर दिलीच जात असेल ना? खासकरुन पाकिस्तानात अशी बहुतांश ठिकाण आहेत जेथे लोकांना जिहादच्या नावाखाली दहशतवादाची ट्रेनिंग दिली जाते. तरुणांचे ब्रेन वॉश करुन त्यांना ट्रेनिंग देण्यात येते. अशातच नुकत्याच उदयपूर येथे सुद्धा झालेल्या हत्याकांडामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कारण या घटनेतील आरोपी हा पाकिस्तानातून ट्रेनिंग घेऊन आला होता. त्यावरुनच पाकिस्तानातील दहशतवादाबद्दल अधिकच चर्चा होऊ लागली आहे. तर पाकिस्तानात दहशतवाद्यांना कशी ट्रेनिंग दिली जाते, त्यावेळी काय काय होते याबद्दलच आपण थोडक्यात जाणून घेऊयात.(Terrorist training)

कशी होते ट्रेनिंग?
खरंतर दहशतवादी संघटनांच्या या ट्रेनिंग कॅम्पमध्ये विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. तसेच त्या संबंधित शस्र सुद्धा पुरवली जातात. या ट्रेनिंग कॅंम्पमध्ये फायरिंग रेज सुद्धा उपलब्ध असते. कारण बंदुकीसंदर्भातील सर्व माहिती ट्रेनिंगदरम्यान दिली जाते. त्याचसोबत ज्या लोकांना दहशतवादासाठी तयार केले जाते त्यांना फक्त शारिरक नव्हे तर मानसिक रुपात ही तयार केले जाते. त्यांच्या राहण्याची, खाण्या-पिण्यासह धार्मिक गोष्टींवर ही लक्ष दिले जाते.

हे देखील वाचा- जगातली सर्वात चांगल्या राहण्यायोग्य शहरांच्या यादीत भारतामधील ‘या’ दोन शहरांचा समावेश…  

Terrorist training
Terrorist training

कशी दिली जाते ट्रेनिंग?
फॉरेन पॉलिसी डॉट कॉम यांच्या एका लेखानुसार, या ट्रेनिंग कॅम्पमध्ये दिवसाची सुरुवात नमाजाने होते. त्यानंतर जिहादासंदर्भातील खुप भाषण ऐकवली जातात. तसेच शारिरीक अभ्यासानंतर ट्रेनिंग असते. संपूर्ण दिवस ट्रेनिंग दिल्यानंतर संध्याकाळी त्यांना उपदेश दिले जातात त्याचसोबत त्यांच्या साथीदारांना ही यामध्ये सहभागी होण्यासाठी सांगितले जाते. मुस्लिमांच्या विरोधात होणाऱ्या अत्याचारांसंबंधित माइंड वॉश केले जाते. या व्यतिरिक्त विविध धर्माच्या आधारित व्हिडिओ दाखवून त्यांना दहशतवादी हालचाली करण्यासाठी तयार केले जाते.

कोणत्या-कोणत्या गोष्टींची ट्रेनिंग होते?
ज्या लोकांना ट्रेनिंग दिली जाते त्यांना लहान लहान हत्यारे जसे AK-47 आणि पीके मशीनगनसह रॉकेटच्या सहाय्याने चालणारे हातगोळे, सैन्याच्या ताफ्यावर हल्ला करण्याचे प्लॅनिंग आणि सुरुंग लावण्याची ट्रेनिंग दिली जाते. तर अलकायदा सारख्या दहशतवादी संघटनेत दहशतवाद्यांना स्नाइपर, राइफल आणि मोर्टारची ट्रेनिंग जाते. टेक्नॉलॉजीत होणाऱ्या बदलांनुसार दहशतवाद्यांना तयार केले जाते.(Terrorist training)

दहशतवादी संघटना किती आहेत?
पाकिस्तान हा दहशतवादी संघटनांना त्यांच्या देशात खतपाणी देत असल्याचे बोलले जाते. कित्येक वेळा त्यांचे सत्य ही समोर आले आहे. जर अमेरिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या फॉरेन टेरेरिस्ट ऑर्गेनाइजेशनबद्दल बोलायचे झाल्यास जवळजवळ १२ दहशतवादी संघटना येथे काम करतात. यापैकी ५ संघटना या भारतासाठी काम करतात. या व्यतिरिक्त पाकिस्तानात असे काही ट्रेनिंग ग्रुप आहेत जे दहशतवादी तयार करतात. असे सांगितले जाते की, यांची संख्या तीन डझनच्या जवळपास हे. काही रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानात जवळजवळ ५० संघटना काम करतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.