Home » Saree : महागड्या साड्यांची काळजी घेताना ‘या’ गोष्टी कायम लक्षात ठेवा

Saree : महागड्या साड्यांची काळजी घेताना ‘या’ गोष्टी कायम लक्षात ठेवा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Saree
Share

साडी…सर्वच महिलांचा अतिशय आवडता पेहराव आहे. ज्यांना साडी नेसता येत नाही अशा महिलांना देखील साडी आवडते. मुख्य म्हणजे साडी नेसल्यावर स्त्रीचे सौंदर्य अधिकच खुलून येते. प्रत्येक स्त्री साडीमध्ये अतिशय सुंदर दिसते. याच साड्या म्हणजे भारतीय महिलांचा वीकपॉइंट आहे. पूर्वी विशिष्ट, खास कार्यक्रमांच्या निमित्ताने महिला साड्या खरेदी करायच्या मात्र आता असे राहिले नाही. काळ बदलला तशा खरेदीच्या सवयी देखील बदलल्या आहेत. आता महिलांना साडी खरेदी करण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नाही त्या कधीही, केव्हाही साड्या घेऊ शकतात. (Saree)

साड्यांमध्ये आपल्याला अगणित सुंदर आणि भरपूर प्रकार पाहायला मिळतात. जसे की पैठणी, ऑरगेंझा, गढवाल, सिल्क, कॉटन, सिंथेटिक, बनारसी, चंदेरी, शिफॉन, इक्कल, कांजीवरम आदी. प्रत्येक प्रकारची आपली एक खासियत आहे. शिवाय प्रत्येक स्त्रीला देखील असे वाटत असते की, आपल्याकडे साड्यांच्या प्रत्येक प्रकारातील किमान एकतरी साडी असायला हवी. यातही आपण पाहिले तर सिल्क साड्यांची महिलांमध्ये विशेष आवड पाहायला मिळते. (Marathi News)

अतिशय कमाल, रिच लूक देणाऱ्या या साड्या म्हणजे निव्वळ सुख देणाऱ्या आहेत. सिल्क साड्या प्रत्येक स्त्रीकडे असतातच. मात्र सिल्क साडी घेतल्यानंतर ती जपून ठेवणे देखील खूपच आवश्यक आहे. अतिशय महाग असणाऱ्या या साड्यांची जर आपण नीट काळजी घेतली नाही तर त्या वेळेआधीच खराब होतात. जर आपण या साड्यांची योग्य काळजी घेतली नाही तर त्या लवकर खराब होतात. सिल्कच्या साड्यांमध्ये किडे लागण्याचीही भीती आहे. शिवाय या साड्यांची चमक देखील निघून जाण्याची शक्यता आहे. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला तुमच्या सिल्कच्या आणि इतर महागड्या साड्यांची काळजी कशी घ्यावी याच्या काही टिप्स सांगणार आहोत. (Marathi)

– सिल्कच्या साड्यांना किड्यांपासून वाचवण्यासाठी तुम्ही साड्यांमध्ये नॅप्थालीनच्या गोळ्या ठेवू शकता. पण थेट साडीवर ठेवल्यास फॅब्रिकचा रंग फिकट होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी तुम्ही या गोळ्या कापडात गुंडाळून ठेवू शकता. (Saree Care Tips)

– सिल्कच्या साड्या कायम मलमल किंवा सुती कपड्यात गुंडाळून ठेवा. सिल्कच्या साड्यांच्या ओलसरपणाचा वास घालवण्यासाठी, या साड्यांना कोवळ्या सूर्यप्रकाशात थोड्या वेळासाठी उघडून ठेवा. असे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, साड्यांना थेट सूर्यप्रकाश दाखवू नका.

Saree

– सिल्क साडीवर जर पाणी पडले तर त्या ओल्या साडीला थेट उन्हात वाळवण्याची चूक करू नका, असे केल्यास साडीवर कायम स्वरूपी पाण्याचा डाग राहून जाईल. साडीवर पडलेले पाणी सावलीमध्येच फॅन खाली वाळवा. (Todays Marathi Headline)

– सिल्कच्या साडीवर थेट डिओचा वापर करु नये. कारण, साडीवर डिओचे डाग पडण्याची शक्यता असते.

– बरेचदा साडी घडी झालेल्या रेषेवर फाटते, यासाठी काही महिन्यांच्या अंतरांनी साड्यांची घडी बदलावी. सिल्कच्या साड्यांची घडी घालताना टिश्यू पेपरचा वापर करायचा. त्यामुळे त्या कपड्यांत ओलसरपणा रहात नाही. टिश्यू पेपरऐवजी बटर पेपरवर साडी रोल करून ठेवली तरी चालेल. (Top Trending News)

– आपल्या किंमती, भरजरी साड्या आपल्या नेहमीच्या वापरातील साड्यांपेक्षा वेगळ्या ठेवाव्यात. साड्या ठेवण्यासाठी जी खास कव्हर किंवा साडी बॉक्स बाजारामध्ये मिळतात, त्यांचा वापर या साड्या ठेवण्यासाठी करावा.

– तुमच्या साड्या ड्राय क्लीन करणे शक्य नसल्यास घरच्या घरी सौम्य डीटर्जन्टचा वापर करून थंड पाण्यामध्ये धुवाव्यात. ‘इझी‘ सारख्या उत्पादनांचा अश्या वेळी वापर करावा. (Top Marathi Headline)

– सिल्क साडीवरील डाग घालवण्यासाठी पेट्रोलचा वापर करा. ज्यूस, आइस्क्रीम, चहाचे डागांसाठी सौम्य डिटर्जंट आणि रिमूव्हरने अगदी सहज निघून जातात. ते थोडेसे कापसात घेऊन डागावर हलक्या हाताने चोळा. साडीवर ब्रशचा वापर टाळा, कारण साडी फाटण्याचा धोका असतो. (Marathi News)

– सिल्कच्या साड्यांना कीटकांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यांना आर्द्रतेपासून वाचवण्याची गरज आहे. कपड्यांमध्ये ओलावा असल्याने त्यात बुरशीची वाढ होऊ शकते. त्यामुळे कपड्यांना दुर्गंधी येऊ लागते आणि कीटकांचा प्रादुर्भाव होण्याचाही धोका असतो. अशा स्थितीत कपाटात रेशमी कापड जास्त वेळ ठेवल्यास ते एकदा सूर्यप्रकाशात काही काळ उघडावे आणि दुमडून ठेवावे. (Top Stories)

– साड्या धुताना कपड्यांच्या ब्रशचा वापर अजिबात करू नये, कारण या साड्यांचे धागे अतिशय नाजूक असतात, व ब्रशच्या वापराने साडीचा कपडा किंवा रेशीम खराब होऊ शकते, किंवा फाटू शकते. (Latest Marathi News)

=========
Post Lunch Fatigue : लंच केल्यानंतर थकवा येत असल्यास करा हे उपाय, दिवसभर राहाल फ्रेश

=========

– तसेच या साड्यांना इस्त्री करताना त्यावर एक पातळ सुती कपडा ठेऊन इस्त्री फिरवावी. जर इस्त्री थेट साडीवरच ठेवली, तर इस्त्रीच्या गरमीने साडीचे नाजूक रेशीम जळण्याची शक्यता असते. इस्त्री करताना इस्त्री फार जास्त गरम असणार नाही याची काळजी घ्यावी. (Top Marathi Headline)

– साड्या कपाटामध्ये किंवा साडी बॉक्स मध्ये ठेवताना त्यामध्ये डांबराच्या गोळ्या किंवा कडूनिंबाची पाने ठेवावीत. डांबराच्या गोळ्या ठेवताना त्या थेट साडीवर न ठेवता, एखाद्या तलम कपड्यामध्ये बांधून, त्याची पुरचुंडी बांधून ठेवावी. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.