Home » Gold : जाणून घ्या कायद्यानुसार घरात किती सोने ठेवता येते?

Gold : जाणून घ्या कायद्यानुसार घरात किती सोने ठेवता येते?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Gold
Share

भारतीय महिलांना सर्वात जास्त प्रिय असलेल्या गोष्टी म्हणजे साड्या, मेकअप, ज्वेलरी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सोने. अनेकदा विनोदामध्ये असे म्हटले जाते की, भारतीय महिलांच्या कपाटामध्ये जेवढे सोने असेल तेवढे कदाचित इतर देशात देखील सापडणार नाही. श्रीमंत असो किंवा गरीब प्रत्येक महिला सोने परिधान करण्यासाठी उत्सुक असते. आपल्याकडे देखील सोन्याचा अमुक एक दागिना असावा अशी प्रत्येक स्त्रीची मनोमन इच्छा असते. आज जर सोन्याचा भाव पाहिला तर नक्कीच आपल्याला सोने घेणे अवघड नाही अशक्यच वाटेल. पण तरीही थोडे थोडे सोने जमा करत महिला दागिने तयार करतात. केवळ महिलाच नाही तर पुरुषांना देखील सोन्याची कमालीची हौस असते. (Marathi News)

मुख्य म्हणजे भारतात सोने हे केवळ एक हौसेसाठी किंवा दागिने म्हणून घेतले जात नाही तर ती एक गुंतवणूक समजली जाते. भारतात खूप आधीपासूनच गुंतवणुकीचे अनेक पर्याय असले तरी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय सर्वच भारतीय महिलांचा आवडीचा पर्याय आहे. अनेकजण सोन्यात गुंतवणूक करतात. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना गेल्या काही वर्षांमध्ये चांगले रिटर्न सुद्धा मिळाले आहेत. भारतामध्ये सोन्याला केवळ गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातूनच नाही तर तर भावनिकदृष्ट्याही मोठे महत्त्व आहे. हिंदू धर्मात सोन्याला अगदी पवित्र समजले जाते. हिंदू धर्मात शुभकार्यात सोने खरेदीला विशेष महत्त्व दाखवले जाते. सोने हा अतिशय पवित्र आणि महत्वाचा धातू समजला जातो. (Latest Marathi News)

तुम्ही सुद्धा जर थोडे थोडे करून सोने घेत असाल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल किंवा तुम्हाला सोन्याचे दागिने बनवायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची असणार आहे. कारण, सोन्याचे किंवा सोने साठवण्याचे देखील काही नियम आहेत का? असतील तर ते नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. सोने घरात ठेवण्यावर काही मर्यादा येतात का? याबद्दलच माहिती जाणून घेऊया.  (Marathi News)

Gold

घरात किती सोने ठेवायचे?
घरात ठेवलेल्या सोन्याच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासोबतच सोन्याचे दागिने किंवा बिस्कीट घरी ठेवण्याबाबत सरकारी नियम काय सांगतात याचीही एखाद्या व्यक्तीला जाणीव असायला हवी. एक विवाहित महिलेला किमान ५०० ग्रॅम सोने आपल्याजवळ ठेवण्याची परवानगी आहे. तर अविवाहित महिलेसाठी निर्धारित प्रमाण २५० ग्रॅम आहे. याशिवाय कुटुंबातील पुरुष सदस्याच्या बाबतीत एका पुरुषाला १०० ग्रॅम सोने किंवा दागिने ठेवण्याची परवानगी आहे. (Top Marathi News)

हे सोने कोणत्याही परिस्थितीत जप्त केले जात नाही. ही मर्यादा फक्त कागदपत्र नसलेल्या सोन्यासाठी लागू आहे. मात्र जर तुमच्याकडे या मर्यादेपेक्षा जास्त सोने असेल, तर तुमच्या बिलात किंवा आयकर रिटर्नमध्ये घोषणापत्र असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे वैध पुरावा असेल, तर तुम्ही कितीही सोने साठवू शकता. आयकर विभागाची ही मर्यादा फक्त कागदपत्रांशिवाय सोन्यावर लागू होते. याचा अर्थ असा की तुमच्याकडे कितीही सोने असले तरी पुरावा आवश्यक आहे. (Latest Marathi Headline)

सोने विक्रीचे नियम
जर तुम्ही सोने खरेदी केले आणि ते तीन वर्षांच्या आत विकले तर तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नावर अल्पकालीन भांडवली नफा कर आकारला जाईल. हा कर तुमच्या आयकर स्लॅबनुसार आकारला जातो. जर तुम्ही तीन वर्षांपेक्षा जास्त काळ सोने साठवून ठेवल्यानंतर ते विकले तर तुम्हाला दीर्घकालीन भांडवली नफा कर आकारला जाईल, जो सामान्यतः २०% असतो, ज्यामध्ये इंडेक्सेशन फायदे असतात. हा कर सोने विकून मिळणाऱ्या नफ्यावर आकारला जातो. (Marathi News)

या दिवाळीत, जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हे नियम लक्षात ठेवा. योग्य कागदपत्रे राखून, तुम्ही कोणत्याही भीतीशिवाय सोन्याचा आनंद घेऊ शकता. सोने तुमची संपत्ती वाढवतेच असे नाही तर तुमच्या परंपरा देखील अबाधित ठेवते. भविष्यातील समस्या टाळण्यासाठी तुमच्याकडे प्रत्येक खरेदीचा स्पष्ट हिशोब असल्याची खात्री करा. (Top Trending News)

=======

Dhantrayodashi : धनत्रयोदशीला ‘या’ गोष्टींची खरेदी ठरेल लाभदायक

Diwali : धनत्रयोदशीला कुबेर पूजन करण्यामागे आहे खास कारण

=======

नियमानुसार जर दोन लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सोने खरेदी करायचे असेल तर अशा खरेदीवेळी खरेदीदाराला पॅन कार्ड देणे बंधनकारक आहे. तसेच दहा हजारापेक्षा जास्त रक्कमेचा व्यवहार बँकेद्वारेच करणे सुद्धा आवश्यक आहे. या नियमानुसार सोनं खरेदी करताना पावती घ्यायला हवी, कारण हीच पावती भविष्यात गरज पडल्यास कायदेशीर अडचणीत तुम्हाला वाचवणारी ठरेल. जर घरात वरील मर्यादेपेक्षा जास्त सोनं असेल, तर ते कसं मिळवलं याचा ठोस पुरावा असणे गरजेचे आहे. सोनं खरेदीची पावती, वारसा हक्काचे कागदपत्र किंवा उत्पन्नाचा पुरावा असणे अनिवार्य आहे. जर पुरावा दिला गेला नाही, तर आयकर विभाग सोनं जप्त करू शकतो आणि संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई होऊ शकते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.