भारतात पंतप्रधान हे सर्वात मोठे पद आहे. राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असून, सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे फक्त पंतप्रधानांना दिले गेले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाची जबाबदारी पंतप्रधानांच्या खांद्यावर असते. भारताचे पंतप्रधान हे भारत देशामधील केंद्र सरकारचे प्रमुख आणि देशाच्या राष्ट्रपतीचे प्रमुख सल्लागार असतात. पंतप्रधान, भारताच्या मंत्रीमंडळाचा आणि संसदेमधील बहुमत मिळालेल्या राजकीय पक्षाचे नेते असतात. भारत सरकारच्या कार्यकारिणी शाखेचे ते प्रमुख असतात. (PM)
पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख असतात आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी जबाबदार असतात. ते मंत्रीमंडळाची निर्मिती करतात आणि मंत्र्यांना पदे नियुक्त करतात. देशाच्या संदर्भातले सर्वच निर्णय पंतप्रधान घेत असतात. त्यामुळे हे पद देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. या पदाचे महत्त्व आणि जबाबदारी खूपच जास्त असल्याने पंतप्रधान असलेल्या व्यक्तीला कामात मदत व्हावी म्हणून एक पर्सनल सेक्रेटरी दिला जातो. यालाच आपण सध्या भाषेत पीएस म्हणतो. (PS)
पीएस पंतप्रधानांना त्यांच्या कामात हरप्रकारे मदत करत असतो. जसे की पीएमचे शेड्युल, मिटींग्स, दौरे, फाईल्स, सरकारी विभागातून येणारी माहिती आणि मोठ्या निर्णयांची तयारी, पीएमचे दैनंदिन शासकीय कामकाज, संवेदनशील फाईल्स, मंत्रालयांतील समन्वय आणि गोपनीय माहिती हाताळण्याची मोठी जबाबदारी असते. आदी सर्वच कामं पीएस पार पडतात. मात्र देशाच्या पंतप्रधानांचा पीएस हे एवढे मोठे संवेदनशील पद सांभाळण्यासाठी ती व्यक्ती देखील तशीच ताकदीची असावी लागते. मग पंतप्रधानांचा पीएस होण्यासाठी कोणत्या अटी शर्थीची पूर्तता करावी लागते?, कोणाला पीएस होता येते?, त्यांचा पगार किती असतो?, पर्सनल सेक्रेटरी पद कसे भरले जाते ? ते काय काय काम करतात? आदी सर्वच प्रश्नांची उत्तरं आपण या लेखातून जाणून घेऊया. (PMO)

पंतप्रधानांचा दिवसागणिक कामकाज सुरळीत चालवणारा, सर्वात विश्वासार्ह आणि अनुभवी अधिकारी म्हणजे पर्सनल सेक्रेटरी. जे अधिकारी लोकं हे पद भूषवतात ते अधिकारी टॉप लेव्हलचे प्रशासनिक निर्णय, शेड्युलिंग, गोपनीय प्रकरणे आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या कामकाजाचे व्यवस्थापन सांभाळतात. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पर्सनल असिस्टंट २०१४ बॅचच्या IFS अधिकारी निधी तिवारी या आहेत. त्याच पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या कामात असिस्ट करतात. (Marathi)
पीएम पर्सनल सेक्रेटरी काय काम करतात?
– पंतप्रधानांची दररोजची कामाची वेळ सकाळी ७ ते रात्री उशिरापर्यंत असते. त्यातील प्रत्येक मिनिटाचे नियोजन – कोण भेटणार, कोणत्या मंत्रालयाची फाईल प्राथमिक आहे, कोणता परदेशी अधिकारी भेटणार, कोणत्या विषयावर माहिती द्यायची हे सर्व पर्सनल सेक्रेटरी पाहतात.
– पंतप्रधानांनी कोण भेटणार आहे, त्यांच्या केव्हा, कुठे बैठका आहेत, कोणत्या विषयावर बोलणी होणार, सर्व काही हे निश्चित करतात.
– प्रत्येक मंत्रालयातून येणारा अहवाल आणि डॉक्युमेंट पीएमपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी यांच्याकडे असते.
– देश-विदेशातील बैठका आणि दौऱ्यांचा संपूर्ण प्लॅन तयार करणे.
– पीएमपर्यंत वेळोवेळी योग्य ती माहिती पोहचवणे आणि त्यांच्या निर्णयांना पुढे नेण्याची मोठी जबाबदारी पार पडणे.
– गोपनीय प्रकरणे सुरक्षित ठेवणे.
– आपत्ती, राष्ट्रीय संकट किंवा इतर आपात्कालीन परिस्थितीत योग्य भूमिका निभावणे (Social Updates)
सध्या पंतप्रधानांच्या सेक्रेटरी कोण आहेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी कार्यरत आहे. निधी तिवारी या २०२४ च्या आयएफएस बॅचच्या अधिकारी आहेत. DoPT कडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, निधी तिवारी या पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून काम करत होत्या. दरम्यान, आता त्यांचे प्रमोशन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Top Stories)
कोण आहे निधी तिवारी?
निधी तिवारी ६ जानेवारी २०२३ पासून पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून काम करत आहे. निधी तिवारी यांनी २०१३ मध्ये नागरी सेवा परीक्षेत ९६ वा क्रमांक मिळविला होता. त्या वाराणसीमधील महमूरगंज येथील रहिवासी आहेत. वाराणसी २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. २०१३ मध्ये यूपीएससीची तयारी करण्यापूर्वी निधी तिवारी वाराणसीत सहायक आयुक्त होत्या. नोकरी करता करता त्यांनी यूपीएससीची तयारी केली. पंतप्रधान कार्यालयात आतापर्यंत त्या परराष्ट्र आणि सुरक्षा विभागात उपसचिव होत्या. त्या सरळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना रिपोर्ट करत होत्या. (Todays Marathi Headline)

निधी तिवारी यांचे खासगी सचिव म्हणून काम खूप महत्त्वाचे असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांचे समन्वय करणे, बैठका आयोजित करणे आणि सरकारी विभागांशी संपर्क साधण्याचे काम त्या पाहतात. यापूर्वीही अनेक महिला अधिकाऱ्यांना पीएमओमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. (Marathi News)
पीएमओ आणि विविध मंत्रालये, विभाग आणि इतर विभाग यांच्यातील समन्वयाचा एक महत्त्वाचा दुवा म्हणून निधी तिवारी यांच्यावर जबाबदारी असते. धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी आणि त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. निधी तिवारी यांना पंतप्रधानांच्या खाजगी सचिवपदी बढती दिल्याने महिला सक्षमीकरणाचा संदेशही दिला गेला आहे. याशिवाय त्या पंतप्रधान मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथून त्या आल्या आहेत. (Marathi Trending Headline)
पीएमचे पर्सनल सेक्रेटरी कसे निवडले जातात?
या पदासाठी साधारण व्यक्ती किंवा सामान्य शासकीय कर्मचारी नाही, तर अनुभवी आणि उच्च पदस्थ सिव्हिल सर्व्हिसेस अधिकारी निवडले जातात. जे प्रामुख्याने IAS (Indian Administrative Service), IFS (Indian Foreign Service), IRS (Indian Revenue Service) या सेवेतील अधिकारी या पदासाठी विचारात घेतले जातात. साधारणपणे १२ ते २० वर्षांचा मोठमोठ्या पदांवरील कामाचा अनुभव, संवेदनशील माहिती हाताळण्याची क्षमता आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग हे गुण या अधिकाऱ्यांमध्ये असणे आवश्यक असते. (Top Marathi News)
निवड प्रक्रिया कशी होते?
पंतप्रधानांचे पर्सनल सेक्रेटरी म्हणून कोणाची नेमणूक करायची, हे पूर्णतः पंतप्रधानांच्या विश्वासावर आधारित असते. पण त्याआधी काही महत्त्वाच्या टप्प्यांतून ही प्रक्रिया पार पडते. या टप्प्यात IB, RAW, गृह मंत्रालय आणि PMO सुरक्षा विभाग संबंधित अधिकाऱ्याची पार्श्वभूमी तपासतात. त्यांची नोकरीतील कामगिरी, संवेदनशील प्रकरणातील भूमिका, प्रशासकीय निर्णयक्षमता, शिस्त, वादग्रस्त नोंदी या सर्व गोष्टींची तपासणी केली जाते. (Marathi Latest News)
========
Investment : बाळाच्या जन्मापासून सुरू करा गुंतवणूक, भविष्यात तयार होईल तब्बल 3 कोटींचा फंड!
========
प्रधान सचिव, अतिरिक्त सचिव, संयुक्त सचिव अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती या पदाच्या संभाव्य अधिकाऱ्यांच्या नावांचा अभ्यास करते. त्या अधिकाऱ्यांचा अनुभव, PMO च्या कामकाजाशी असलेली जवळीक, संवाद कौशल्य, प्रोटोकॉल समज, आणि संवेदनशील फाईल्स हाताळण्याची क्षमता पाहिली जाते. सर्व निकष पूर्ण झाल्यावर निवडलेले एक अथवा दोन अधिकारी अंतिम बैठकीसाठी पंतप्रधानांना भेटतात. पीएम स्वतः त्या अधिकाऱ्याशी चर्चा करून निर्णय घेतात. देशातील एकाही प्रशासकीय पदासाठी इतकी उच्चस्तरीय आणि वैयक्तिक तपासणी होत नाही. (Top Trending News)
पीएम पर्सनल सेक्रेटरीचे वेतन किती असते?
पीएम पर्सनल सेक्रेटरी या पदावर सर्वसाधारणपणे वरिष्ठ IAS-IFS अधिकारी असतात. त्यासाठी त्यांचे वेतनही त्यांच्या रँक नुसार असते. त्यांचा सरासरी पगार १.५ लाख ते २.५ लाख महिना असतो. याशिवाय त्यांना सरकारी घर, कार, सिक्युरिटी, मेडिकल सुविधा आणि अधिकृत परदेश प्रवासाचे फायदे आणि विशेष फायदे मिळतात. शिवाय इतर भत्ते देखील दिले जातात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
