सर्वांनी ‘फिर हेरा फेरी’ हा चित्रपट तर बघितलाच असेल. यामध्ये Bipasha Basu म्हणजेच श्यामच्या अनुराधाची एक कंपनी असते, जिचं नाव असतं लक्ष्मी चीट फंड ! या कंपनीची एक खासियत म्हणजे इथे पैसे गुंतवले की २५ दिन में पैसा डबल होऊन मिळायचे. मग आपला राजू भैय्या इथून तिथून लाखो पैसा गोळा करून या कंपनीत गुंतवतो आणि २५ दिवसानंतर आपले डबल पैसे घ्यायला जातो, पण त्याला मिळतो ठेंगा… पण अशीच चक्कर येण्याची पाळी आता अनेक मुंबईकरांवर आली आहे. कारण त्यांच्यासोबत असाच काहीसा FRAUD झाला आहे. तो FRAUD करणारी कंपनी आहे, ToRRES ! गेल्या काही दिवसांपासून या कंपनीची भलतीच चर्चा आहे, पण त्याहून जास्त चर्चा आहे या कंपनीमध्ये पैसे गुंतवून फसलेल्या लोकांची… चला तर जाणून घेऊया हे नेमकं प्रकरण काय आहे.(Torres Company Fraud)
टोरेस ही विदेशी कंपनी… या कंपनीत पैसे गुंतवले की घसघशीत रिटर्न्स मिळत, यासाठी ही कंपनी प्रसिद्ध होती. टोरेस कंपनी सोने, चांदी आणि हिरे यांची विक्री करत होती. म्हणजे ज्वेलरी कंपनी… मात्र हे सर्व दागदागिने बनावट होते. गेल्याच वर्षी दादर भागात या कंपनीने आपलं पहिलं ऑफिस सुरु केलं. आणि यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी त्यांची आपले ब्रांचेस सुरु केले. कंपनीत गुंतवणूक केलेल्या रकमेवर ६ टक्क्यांपासून ११ टक्क्यांपर्यंत व्याज दिला जात होता. फक्त ४ हजार रुपयांपासून या कंपनीत पैसे गुंतवता येत होते. आठवडाभरात तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर झटपट परतावा मिळेल, असे अमिष लोकांना दाखवण्यात आलं. (Marathi News)
मग काय, लोकं लागली गुंतवायला… सहा लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कंपनी ६ टक्के व्याज देत होती. तर सहा लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यावर गुंतवणूकदारांना ११ टक्के व्याज मिळत होत. सुरुवातीच्या काळात टोरेस कंपनीने मोठमोठ्या इमारतींमध्ये घरे, गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा ठेवला होता. त्यामुळे लोकांना विश्वास बसला. अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये कंपनीत गुंतवायला सुरुवात केली. महत्त्वाचं म्हणजे डिसेंबरपर्यंत लोकांना आठवड्याला पैसे मिळतसुद्धा होते. पण अचानक गेल्या दोन आठवड्यांपासून अनेक गुंतवणूकदारांना परतावा मिळालाच नाही. त्यामुळे सर्वांनी कंपनीच्या ऑफिसकडे धाव घेतली. पण कंपनीला होता टाळा… आणि सर्वांनी डोक्यावर हात मारून घेतला.(Torres Company Fraud)
काहीतरी fraud असल्याचं कळताच अनेक गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रार दाखल केली. मुंबईतल्या हजारो गुंतवणुकदारांचे पैसे घेऊन फरार झाल्याचा आरोप आता या कंपनीवर केला जात आहे. या कंपनीच्या शाखा बंद झाल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी ऑफिससमोरच आंदोलन करायला सुरुवात केली आहे. काही लोकांनी तर ऑफिसवर थेट दगडफेकच केली आहे. याप्रकरणी दादरच्या शिवाजी पार्क पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे आणि पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये सर्वेश सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्का, तौफिक रियाझ उर्फ जॉन कार्टर, तानिया कॅसातोवा, व्हॅलेंटिना कुमार अशी गुन्हा दाखल करणाऱ्या पाच जणांची नाव आहेत. (Torres Company Fraud)
दादरमधल्या टोरेस ऑफिसमधून 13 कोटी 48 लाख 15 हजार 92 रुपयांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फसवणूक, ऑफिसला टाळा, पोलिसात तक्रार, आंदोलन, दगडफेक आणि बरच काही… पण या प्रकारानंतर अनेक गुंतवणूकदारांवर पश्चात्तापाची वेळ आली आहे. त्यांचं म्हणण आहे की, आम्हाला आता व्याज वगैरे नको. पण आम्ही जे पैसे गुंतवले आहेत, तेवढे आम्हाला परत करा. या कंपनीकडून गेल्या काही दिवसांपासून कोणतीही माहिती दिली जात नाही. सगळे contacts सुद्धा बंद आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण पसरलेलं आहे. (Marathi News)
=================
हे देखील वाचा : Google Map : बायको सोबत भांडण झालं आणि त्याने गूगल मॅप तयार केलं !
================
असं म्हटलं जातंय की, टोरेस कंपनीचा मालक दुबईमध्ये आहे. आणि हा पूर्ण त्यांचा planning होता. संपूर्ण नियोजनासह त्यांनी पळ काढला आणि रातोरात कंपनी बंद केली. सध्या कंपनीतले सगळेच लोक फरार आहेत. तेव्हा आता गुंतवणुकदारांच्या पैशांचं काय होणार आणि तपासातून पुढे काय समोर येणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. त्यामुळे सर्वांना एकच सांगण आहे की, लक्ष्मी चीट फंड म्हणजेच टोरेस सारख्या fraud कंपनीच्या नादाला लागून आपले पैसे वाया घालवू नका. शेवटी पश्चाताप याशिवाय तुमच्याकडे काहीच उरणार नाही.