दिवाळी आली की सर्वत्र मिठाई आणि फटाक्यांनी सजलेली दुकाने दिसू लागतात. आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला मिठाई, गोड पदार्थ भेट दिले जातात. त्यामुळेच मिठाईच्या दुकानात या दिवाळीमध्ये सर्वाधिक गर्दी असते. आणि याचाच फायदा घेत काही दुकानांमध्ये भेसळयुक्त मिठाई बनवली जाते. ही मिठाई थोडी स्वस्त असली तरी ती आरोग्यासाठी अत्यंत घातक असते. पनीर किंवा खव्याचा वापर करुन केलेली ही मिठाई शरीरासाठी अपायकारक ठरते. सध्या दिवाळीच्या निमित्तानं दुकानांमध्ये असलेल्या या मिठाईमधील भेसळयुक्त मिठाई कशी ओळखावी हे सर्वात महत्त्वाचे झाले आहे. (Sweet Disguise)
अनेक शहरांमधून भेसळयुक्त मिठाईची विक्री होत असल्यामुळे अन्न विभागाची देशभरात छापेमारी सुरू आहे. यात अन्न विभागाने विविध भागातून बनावट मावा, तूप, पनीर ताब्यात घेतले आहे. यापासून तयार झालेली मिठाई ही नुकसान कारक असते, शिवाय काही मिठाईमध्ये वाजवीपेक्षा जास्त रंगाचा वापर करण्यात येतो, हे सुद्धा आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे अन्न विभागानं जाहीर केले आहे. त्यामुळे आपण जेव्हा दुकानात मिठाई घेण्यासाठी जाल, तेव्हा ती मिठाई चांगल्या दर्जाच्या जिन्नसापासून तयार केली आहे, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात काही ठिकाणी भेसळयुक्त मिठाई, मावा, पनीर आणि तूप यांच्यापासून तयार केली जाते. या भेसळखोरांविरोधात अन्न विभागातर्फे कारवाई करण्यात येते. (Social News)
मात्र त्यासोबत सर्वसामान्यांनीही काळजी घेण्याची गरज असते. काहीठिकाणी मिठाईतील दूधही भेसळयुक्त असते. हे दुध करण्यासाठी सिंथेटिक रसायनांचा वापर केला जातो. यापासूनच मावा आणि मग मिठाई तयार होते. ही मिठाई कशी ओळखावी हा एक मोठा प्रश्न आहे. मात्र ही मिठाई बाजारभावापेक्षा खूप कमी किंमतीत विकली जाते. त्यावरु त्याचा दर्जा ठरवणे सोप्पे जाते. त्यासाठी मिठाई खरेदी करतांना ती खात्रीशीर दुकानांमधूनच खरेदी करण्याचे आवाहन अन्न प्रशासन विभागातर्फे करण्यात येते. शिवाय दुधापासून बनवलेल्या काही मिठाईमध्ये स्टार्च किंवा सिंथेटिकचा वापर होतो. यापासून झालेली मिठाई ओळखायची असेल तर थोडीशी मिठाई हातामध्ये घ्यावी त्यातील खवा हा दाणेदार असेल तर मिठाई चांगल्या दर्जाच्या दुधापासून तयार झालेली आहे, असे समजावे. (Sweet Disguise)
त्या मिठाईचा मावा पिठासारखा भासला तर त्यातील मावा नकली आहे, असे समजावे. शिवाय हाच गोड पदार्थ पाण्यात टाकला तर काही क्षणात तो विरघळतो. पण या मिठाईसाठीचा मावा भेसळयुक्त दुधापासून तयार केला असेल तर या पाण्याच्या वर फक्त फेस येतो. यावरुन हे दुध सिंथेटिक रसायन वापरुन केल्याचे समजते. या रसायनामुळे दुधावर भरपूर फेस तयार होतो. आणि त्याचाच मावा केला जातो.
काहीवेळा फक्त तुपात तयार झालेली मिठाई खरेदी केली जाते. तुपातही भेसळ असेल तर ती कशी ओळखावी हा प्रश्न पडतो. तेव्हा तुपातील मिठाईचा एक छोटा तुकडा गॅसवर ठेवावा. यात तुप असेल तर ते लगेच विरघळते, आणि तूपाचा सुगंध येतो. मात्र हे तुप नकली असेल आणि खराब वास येतो. ब-याचवेळा अतिरिक्त रंगाचाही वापर मिठाई सजवण्यासाठी केला जातो. अशावेळीही मिठाई पाण्यात टाकावी. पाण्यात मिठाईचा रंग उतरल्यास मिठाईमध्ये जास्तीचा रंग टाकला आहे, हे समजते. (Social News)
======
हे देखील वाचा : नव्याची आशा !
====
मिठाई आकर्षक करण्यासाठी त्याच्यावर सजावट केली जाते. यात काहीवेळी ड्रायफ्रूट टाकले जातात. यामध्ये पिस्त्याचा वापर होतो. पण हे पिस्ते अतिशय खराब दर्जाचे असतात. मात्र त्यांना रंग लावण्यात येतो. अशावेळी हे पिस्ता तुकडे हातात घेऊनही त्यांची पारख करता येते. काहीवेळा भेसळयुक्त मिठाईवर केशर आणि चांदीच्या वर्कचा सजावटीसाठी वापर केला जातो. त्यापासूनही सावधान रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चांदीचा वर्क पाण्यात टाकून त्याची चाचणी केली जाते. या सणाच्या काळात भेसळयुक्त पनीरही मोठ्या प्रमाणात विकले जाते. अशावेळी पनीरचा तुकडा हातात घेऊन तो नरम आहे का याची पहाणी करावी. तसेच त्याचा वास अंबंट असेल तर असे पनीर घेऊ नये. पनीरचा रंगही दुधासारखा शुभ्र असेल तर ते पनीर ताजे असल्याचे मानले जाते. दिवाळी हा आनंदाचा सण आहे. अशावेळी भेसळयुक्त मिठाईमुळे आरोग्यास हानी होणार नाही, याची काळजी घेतली तर हा सण अधिक चांगल्याप्रकारे साजरा करता येणार आहे. (Sweet Disguise)
सई बने