Home » Meme : Memeची सुरुवात कशी झाली? पहिलं Meme कोणतं होतं?

Meme : Memeची सुरुवात कशी झाली? पहिलं Meme कोणतं होतं?

by Team Gajawaja
0 comment
Meme
Share

आपल मुद्दा विनोदी पद्धतीने मांडण्यासाठी आपण याचा वापर करतो किंवा मित्रांशी बोलताना बोरिंग चर्चा विनोदी करण्यासाठी याचा वापर करतो. ते काय आहे माहिती आहे? माहिती आहे? ते म्हणजे Meme.  Meme ही सोशल मीडियाची एक वेगळी भाषा आहे असं आपण म्हणू शकतो.  रील्स आणि टिकटॉक येण्याआधी मीम्सच तर होते. ज्याने आपण आपली करमणूक करायचो. आजकाल तर कोणाता scene, dialogue किंवा काहीही meme बनेल सांगता येत नाही. फिल्म promotion, प्रॉडक्ट ads, एवढचं काय, तर राजकीय पक्ष सुद्धा लोकांना इन्फ्लुएन्स करण्यासाठी मीम्सचा वापर करतात. पण या memes ची सुरुवता कशी झाली? मीमचा इतिहास काय जाणून घ्या ! (Meme)

मीम रोजच्या जीवनात वापरण्याची सुरुवात सोशल मीडियामुळेच झाली हे खरं आहे. पण मीम या शब्दाचा इतिहास भारत स्वातंत्र्य होण्याच्या आधीचा आहे. 1940 च्या दशकात पझल्सची सुरुवात झाल्यानंतर, “मीम” शब्दाचा वापर न्यूयॉर्क टाइम्सच्या क्रॉसवर्डमध्ये 60 वेळा केला गेला होता. त्यानंतर 1976 मध्ये रिचर्ड डॉकिन्स या ब्रिटिश बायोलॉजिस्ट आणि झूओलॉजिस्ट याने लिहिलेल्या “द सेल्फिश जीन” या पुस्तकात “मीम” शब्द वापरला होता. तसं मीम हा शब्द प्राचीन ग्रीक शब्द मिमेमा या शब्दाचं एक लहान रूप आहे. ज्याचा अर्थ कॉपी म्हणजेच नकल करणे असा आहे. अमेरिकेतील भाषा शास्त्राचे प्राध्यापक किर्बी कॉनरोड म्हणतात की, मीम म्हणजे एक प्रकारचा विचार, जो आपल्या सर्कलमध्ये, मित्रांमध्ये, किंवा काही दिवसांपासून आपल्या मनात अडकलेल्या जाहिरातीच्या जिंगल्स प्रमाणे आपोआप पुनरावृत्त होतो. जसं एखादं जोक किंवा जिंगल आपोआप माणसांकडून पुन्हा- पुन्हा सांगितलं जातं, तसंच मीम्सचं पुनरावृत्ती होणं म्हणजेच मीम्सची खरी ओळख आहे आणि हेच खरं आहे.

मीम्सच्या जगातला पहिला मीम कोणता होता माहिती आहे? तो होता हा ( वरील फोटो ) असं आम्ही नाही म्हणत, असं लोकंच म्हणत होते. 2018मध्ये जेव्हा x म्हणजेच त्या काळच्या ट्विटर वर  हा फोटो viral झाला तेव्हा लोक म्हणू लागले की हा जगातील पहिला मीम आहे. 1921मध्ये प्रकाशित झालेल्या व्यंगचित्र मासिकात हे चित्र वापरण्यात आलं होतं. पण हे किती खरं आहे याची माहिती आपल्याला नाही. या मीमच्या आधीही अशाप्रकारचे कार्टून्स 1919 ते 1959 पर्यंत स्केचेस कॉमिक्समध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळायचे. (Meme)

मग इंटरनेटवर मीम्स वायरल व्हायला सुरुवात कधी झाली, तर त्याची सुरवात झाली रेझ कॉमिक्समधल्या कॅरक्टर्समुळे. रेझ कॉमिक्स एक वेब-कॉमिक्स आहे. या कॅरक्टर्सची निर्मिती कार्लोस रॅमिरेझ याने 2008 मध्ये ऑकलंड अमेरिकेत केली होती. या सर्व कॅरक्टर्समध्ये कार्लोसने बनवलेला ‘ट्रोलफेस’ हे कॅरक्टर्स प्रचंड पॉप्युलर झालं. तुम्ही सुद्धा हे ‘ट्रोलफेस’ मीम्स तुम्ही सुद्धा पहिलं असेल.

कार्लोसने हे कॅरक्टर्स बनवले तेव्हा तो 18 वर्षांचा होता आणि कॉलेजमध्ये शिकत होता. पण त्यांचं लक्ष कॉलेजच्या अभ्यासात कमी आणि कंप्युटरवर पेंटिंग करण्यावर जास्त होतं. तो रोज MS Paint वर काही ना काही ड्रॉ करत बसत. आणि नंतर ती ड्रॉइंग आर्ट साईट्सवर अपलोड करत. एक दिवस त्यांनी MS Paint वर काही साधे कार्टून बनवले. आणि रोजच्या प्रमाणे, त्यांनी ते डेविएंट आर्ट आणि 4chan नावाच्या साईटवर अपलोड केले आणि तो झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी, जेव्हा त्याने पहिलं की, त्याचा बनवलेला डूडल 4chan साईटवर जोरदार शेअर केला जात होतं. पण त्यात त्याचा काही फायदा होणार नव्हता, त्यामुळे कार्लोसने इंटरनेटपासून break घेऊन कॉलेजच्या अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. (Meme)

=============

हे देखील वाचा :

Mumbai : मुंबईच्या किना-यापासून मासे का दूर जात आहेत ?

World War III : तिसरे महायुद्ध भाडोत्री सैन्याच्या आधारे

==============

नंतर खूप दिवसांनी जेव्हा कार्लोसने पुन्हा इंटरनेट उघडलं, तेव्हा त्यांनी पाहिलं की त्याचं बनवलेलं कॅरक्टर्स इंटरनेटवर सर्व इमेज शेअरिंग साईट्सवर शेअर केले गेले होते. हे कोणालाच माहिती नव्हतं की सगळीकडे viral होणारे हे ‘ट्रोलफेस’ कार्लोसने बनवले आहेत. त्याच्या घरच्यांना सुद्धा याची कल्पना नव्हती. हे त्याने फक्त त्याच्या छोट्या बहिणीला सांगितलं होतं. मग ते तिने घरी सांगून टाकलं. ही माहिती कळताच कार्लोसच्या आईला इतका आनंद झाला की, तिने घराच्या भिंतीवर स्प्रे पेंट करून ट्रोलफेस बनवला आणि संपूर्ण परिसरात कार्लोसच्या या कामगिरीचा जल्लोष साजरा केला. हळूहळू सगळीकडे ट्रॉलफेस वापरला जाऊ लागला. ट्रोलफेस आणि रेझ कॉमिक्सचे इतर पात्र फेसबुकवर आणि इतर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर पॉप्युलर झाले. टी-शर्ट्स आणि कॉफी मग्सवरही ट्रोलफेस दिसायला लागले. म्हणून मग कार्लोसने 27 जुलै 2010 रोजी ट्रोलफेस US कॉपीराइट ऑफिसमध्ये रजिस्टर केलं. रजिस्टर केल्यानंतर, कार्लोस ट्रोलफेसच्या लाइसेंसिंग फी आणि इतर डील्सद्वारे लाखो रुपयांची कमाई केली आणि अजूनही तो करतो आहे.

आणखी एक फेस जे मीम म्हणून viral झालं होतं ते म्हणजे हे ( वरील फोटो ) हा चेहरा सुद्धा सोशल मीडिया आणि टी शर्ट्सवर तुम्ही पहिलं असेल. हा चेहरा आहे चाइनीज़ बास्केटबॉल प्लेयर याओ मिंगचा आहे. याओ एका प्रेस कॉन्फरन्सदरम्यान जेव्हा अशा प्रकारे हसले, तेव्हा कुणी त्यांचा मीम तयार केला. याओ यांच्या चेहऱ्याचे मीम सुद्धा पहिल्या viral होणऱ्या मीम्सपैकी एक आहे. सोशल मिडियावर आपलं आयुष्य शेअर करणाऱ्या आणि तिथेच अनेक तास घालवणाऱ्या लोकांसाठी मीम्स म्हणजे एक साहित्यप्रकारच आहे. या मीम्ससमुळे हे आधुनिक जीवन थोडं का होईना पण मनोरंजक झालं एवढं नक्की. (Meme)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.