दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि प्रकाशाचा सण. संपूर्ण जगाला अंधारातून उजेडाकडे नेण्याचा संदेश दिवाळी देते. संपूर्ण अंध:कारला दिवाळीत लावली जाणारी एक छोटीशी पणती बाजूला सारते आणि उजेड पसरवते. मात्र हळूहळू हाच प्रकाशाचा सण नागरिकांचा श्वास कोंडवण्यास कारणीभूत ठरत आहे. मधल्या काही वर्षांपासून दिवाळी झाली की लगेच किंबहुना दिवाळीच्या दिवसांमध्येच वायू प्रदूषणाच्या बातम्या येण्यास सुरुवात होते. दिवाळीमध्ये फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे आपल्या वातावरणात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण तयार होते. या प्रदूषणाचा देत परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होताना दिसतो. (Air Pollution)
एक दोन दिवसांपासून भारतातील दिल्ली, मुंबईसारख्या सर्वच मोठ्या शहरांमध्ये हवेच्या प्रदूषणाने उच्च पातळी गाठली आहे. दिवाळीच्या अतिशबाजीनंतर दिल्लीच्या हवेची गुणवत्ता खालावली आहे. सकाळी, दिल्लीतील बहुतांश भागात हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) अत्यंत धोकादायक श्रेणीत नोंदवला गेला आहे. त्यामुळे ही हवा मनुष्याच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. दिल्लीतील चाणक्य प्लेसमध्ये सर्वोच्च असा AQI ९७९ नोंदवला गेला. तर नारायणा गावाने ९४० AQI नोंदवला आहे. (Marathi News)
तिग्री एक्सटेंशनमध्ये ९२८ AQI नोंदवला गेला आहे. जर भविष्यात AQI हा इतकाच उच्च राहिला तर त्याचा दुषपरिणाम लहान मुलांच्या, वृद्धांच्या आणि अगदी निरोगी व्यक्तींच्या आरोग्यावर देखील होणार आहे. दिल्लीतर जगातील सर्वात जास्त वायुप्रदूषण असलेल्या शहरांपैकी पहिल्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. वायू प्रदूषण जास्त वाढल्याने मनुष्याला नक्की काय त्रास होऊ शकतो?, वायू प्रदूषणामुळे कोणते आजार होण्याची भीती आहे? चला जाणून घेऊया.

वातावरणातील हवेची गुणवत्ता खालावणे म्हणजे वायू प्रदूषण होय. हवा हा आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे. दैनंदिन जीवनात कळत न कळत आपल्याकडून असे काही घटक हवेत सोडल्या जातात की जे आपल्या शरीराला हानिकारक असतात. आपण सतत श्वास घेत असतो, या श्वासासोबतच हवेतील अनेक घातक गोष्टी नकळतपणे आपल्या शरीरात जातात आणि त्याचा आपल्या शरीरावर, आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. वाढत्या कार्बन डाय ऑक्साइड मुळे सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करणारा ओझोन वायूचा थर क्षतिग्रस्त होत आहे. या मुळे जागतिक तापमानवाढीचे मोठे संकट निर्माण होत आहे. (Marathi News)
वायू प्रदूषणाच्या थेट संपर्कात आल्याने हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो. पार्टिक्युलेट मॅटर (PM2.4 आणि PM10), नायट्रोजन डायऑक्साइड (NO2) आणि कार्बन मोनोऑक्साइड (CO) यांसारखे वायु प्रदूषक रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव निर्माण होतो. यामुळे, एथेरोस्क्लेरोसिस होतो, ज्यामध्ये रक्तवाहिन्या जाड किंवा कडक होतात. एथेरोस्क्लेरोसिस हे हृदयविकार, पक्षाघात आणि पक्षाघाताचे प्रमुख कारण आहे. वायू प्रदूषणामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित सर्व प्रकारच्या असंसर्गजन्य रोग, स्वयंप्रतिकार रोग, मधुमेह, संधिवात इत्यादींचा धोका वाढतो. तसेच तुम्ही दिवसातून २५,००० वेळा श्वास घेता आणि बाहेर सोडता. प्रदूषित हवेच्या सतत संपर्कामुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. विशेषत: हिवाळ्यात वायू प्रदूषण वाढल्यामुळे फुफ्फुसाच्या समस्यांनी त्रस्त लोकांची समस्या वाढते. (Todays Marathi Headline)
वायू प्रदूषणामुळे लोकांमध्ये नैराश्य आणि डिप्रेशनमध्ये जाण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे अनेक जण आत्महत्याही करतात. प्रदूषित ठिकाणी राहणाऱ्या लोकांना मानसिक विकार होण्याची शक्यता जास्त असते. स्मृतिभ्रंश सारख्या धोकादायक आजाराचे कारण देखील हवेचे प्रदूषण ठरू शकते. एका अहवाला नुसार, आतापर्यंत अनेक संशोधनांमध्ये ही बाब समोर आली आहे की, वायू प्रदूषणामुळे लोकांची स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते. त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर आणि वृद्धांवर होतो. एवढेच नाही तर प्रदूषणामुळे नैराश्याचा धोकाही वाढतो. विषारी हवा आपल्या फुफ्फुस आणि हृदयासाठीच नाही तर मेंदूसाठीही धोकादायक ठरू शकते. (Marathi News)
वायू प्रदूषणाची कारणे
भारत हा विकसनशील देश आहे हे आपल्याला माहित आहे, पण या विकासामुळे निसर्गाचा होत चाललेला ऱ्हास मात्र कोणालाही का दिसत नाही. मोठमोठ्या कारखान्यातून निघणारा हानिकारक धूर हा सर्रासपणे वातावरणात सोडला जातो. याशिवाय औष्णिक वीज केंद्रामधून निघणारा धूर आणि रासायनिक उद्योगामधून तयार होणारे सहायक घटक हे हवेत सोडले जातात. यामुळे हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आजकाल सर्वांकडे स्वतःच्या गाड्या आहेत. या गाड्यांमधून निघणारा धूर वायू प्रदूषण वाढण्यास हातभार लावत आहे. (Marathi Trending Headline)
विविध कारणांमुळे निसर्गतः असलेले मोठे मोठे जंगले तोडले जात असून, त्या ठिकाणी इमारती बांधल्या जात आहेत. वृक्षतोडीमुळे मृदेची धूप होते त्यामुळे मातीचे बारीक सारीक कन हे हवेत पसरतात आणि हवा प्रदूषित होते. रोजचा कितीतरी मेट्रिक टन कचरा जमा होत असतो. हा कचरा जमा करून डम्पिंग ग्राउंड वर नेऊन टाकला जातो. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता तिथेच तो जाळण्यात येतो. हा जाळणारा कचरा देखील मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण वाढवत आहे. (Top Marathi News)

शेतकरी आपल्या शेतीतील पिक काढून घेतल्यानंतर पिकांचे राहिलेले अवशेष शेतातच जाळून टाकतात. रासायनिक खते किंवा औषधींची फवारणी करताना बारीक तुषार हवेत पसरतात. शेताची नांगरणी करताना उडणारा मातीचा धूर, या सर्व कारणांमुळे हवा प्रदूषित होते. मानवांद्वारा बाहेर सोडल्या जाणाऱ्या उच्छवासात कार्बन डाय ऑक्साइड सोडला जात असतो. हा वायू हवा प्रदूषित करतो. जंगलातील वणवा, ज्वालामुखीतून निघणारी राख, आणि कार्बन डाय ऑक्साइड सारखे हानीकारक वायू, यांसारखे काही नैसर्गिक घटक देखील वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरतात. (Latest Marathi Headline)
वायू प्रदूषणावर उपाय
– उद्योग क्षेत्रांतून निघणारा रासायनिक धूर कमी करण्यासाठी योग्य त्या उपकरणांचा किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. वातावरणात धूर सोडण्याआधी शक्य असल्यास त्यावर प्रक्रिया करून तो बाहेर टाकावा.
– जिथे शक्य असेल तिथे सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. असे केल्याने खूप साऱ्या वाहनांतून निघणारा धूर कमी होऊन प्रदूषण सुद्धा कमी होईल.
– वृक्षतोड थांबवावी आणि सार्वजनिक वनीकरण सारख्या कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे. कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम होताना, वृक्षतोड कमीत कमी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. सोबतच बागेसाठी राखीव जागा सोडण्याची अट घातली पाहिजे. (Top Trending Headline)
========
Health : दिवाळीत फराळ खाऊन त्रास होतोय मग करा झटपट ‘हे’ उपाय
========
– टाकाऊ कचरा न जाळता त्याची विल्हेवाट कशी लावल्या जाईल, त्या बद्दल विचार करावा.
– शेती संबंधी जे अवशेष जाळण्यात येतात ते न जाळता त्या पासून खत तयार करणारे तंत्रज्ञान वापरावे.
– लोकसंख्या वाढीला आळा घालण्यास प्रयत्न वाढवले पाहिले. शिवाय दैनंदिन जीवनात अपारंपरिक उर्जा स्रोतांचा वापर वाढवला पाहिजे.
– वायू प्रदूषणाबाबत लोकांमध्ये जनजागृती अभियान राबविणे आवश्यक झाले आहे. शिवाय शासनाने देखील वायू प्रदूषण विरुद्ध कठोर कायदे करणे गरजेचे झाले आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
