Home » Hotel आणि Motel मध्ये ‘हा’ आहे फरक

Hotel आणि Motel मध्ये ‘हा’ आहे फरक

by Team Gajawaja
0 comment
Hotel vs motel
Share

जेव्हा आपण हॉटेल असा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला वाटते की, हे एक खाण्यापिण्याचे ठिकाण असेल.भारतात खाण्यापिण्याच्या ठिकाणाला सर्वसामान्यपणे हॉटेल असे म्हटले जाते. मात्र असं नसते. खरंतर आपल्या सर्वांनाच हॉटेल आणि मॉटेल मधील नेमका फरक काय हे माहिती नसते. आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी फिरायला जातो तेव्हा राहण्यासाठी बुकिंग करतो. त्या ठिकाणाला सुद्धा हॉटेल असे म्हणतो. यामुळे बहुतांशजण यामध्ये सुद्धा फसतात. अशातच आम्ही तुम्हाला हॉटेल आणि मॉटेल मधील नक्की फरक काय याच बद्दल सविस्तर सांगणार आहोत. (Hotel vs Motel)

-हॉटेल
हॉटेल म्हणजे लोकांना राहण्याचे ठिकाण. येथे काही खोल्या तयार केल्या जातात ज्यामध्ये गेस्ट थांबतात. हॉटेलमध्ये पार्किंग, किचन, स्विमिंग पूल अशा काही सुविधा असतात. हॉटेलची खास गोष्ट अशी की, येथे किचनमध्ये केवळ तेथे थांबलेला गेस्टच नव्हे तर बाहेरील व्यक्ती सुद्धा खाण्यापिण्यासाठी येऊ शकतो.

हॉटेलच्या रुममध्ये तुम्ही तुमच्या बजेट नुसार तेथील सुविधांचा लाभ घेऊ शकता. जसे की, टीव्ही, फ्रिज, फोन, रुम सर्विस असे. जगभरात हॉटेल वन स्टार, टू स्टार, थ्री स्टार, फोर आणि फाइव्ह स्टार अशा कॅटेगरीत विभागलेले असतात. त्यामध्ये ग्राहकांना दिली जाणारी सुविधा सुद्धा विविधच असते.

मॉटेल
हा शब्द थोडा विचित्र वाटो. पण हा शब्द दोन शब्दांना मिळून तयार करण्यात आलेला आहे. मोटर आणि हॉटेल. खरंतर दीर्घ प्रवासानंतर किंवा महामार्गांवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थांबण्याची जागा म्हणजे मॉटेल. यामध्ये अधिक खोल्या नसतात. त्यामध्ये अधिक सुविधा सुद्धा दिल्या जात नाहीत. त्यालाच मॉटेल असे म्हटलेजाते.

मॉटेलमध्ये थांबण्यासाठी फार कमी खर्च येतो. तसेच त्याच हॉटेलसारख्या सुविधा दिल्या जात नाहीत. सध्या भारतात मॉटेल फार कमी प्रमाणात आहेत. मात्र अमेरिका, युरोप सारख्या देशात याची संख्या अधिक आहे.

-रेस्टॉरंट
आपण आपल्या घरातील मंडळींसोबत जेथे डिनर किंवा लंचसाठी जातो त्याला रेस्टॉरंट असे म्हटले जाते. रेस्टॉरंट सर्वसामान्यपणे अशा ठिकाणी असतात जेथे दिवस-रात्र ते खुले ठेवता येऊ शकतात. या ठिकाणी तुम्ही जेवणाचा स्वाद घेऊ शकता. येथे मात्र तुम्ही रात्रभर थांबू शकत नाहीत. (Hotel vs Motel)

हेही वाचा- ऐकावं ते नवलच..! ‘या’ देशात नागरिकांचे वय होत आहे कमी

-रिसॉर्ट
रिसॉर्ट म्हणजे असे ठिकाण जेथे टुरिस्ट लोक येऊन राहतात किंवा तुम्ही सुद्धा तेथे राहण्यासाठी जाऊ शकता. यामध्ये तुम्हाला पार्किंग, स्विमिंग पूल, जिम, पार्लर, स्पा, खेळण्यासाठी मैदान अशा काही सुविधा मिळतात. येथे थांबणे थोडं खर्चिक होऊ शकते. रिसॉर्टमध्ये लोक सुट्टी घालवण्यासाठी जातात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.