प्रत्येकाला आपल्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ स्वत:साठी द्यावासा वाटतो. त्यामुळे व्यक्ती एखाद्या ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन करतो. परंतु फिरायला जायचे म्हणजे कोणत्या ठिकाणी जायचे ते कुठे राहायचे असा प्रश्न उभा राहतोच. परंतु बहुतांश लोकांना माहिती असेल की, हॉटेलमध्ये रुम (Hotel Room Secret) क्रमांक १३ ची खोली नसते. यामागे काही काहीजण विचित्र तर्क ही लावतात किंवा काहीजण याकडे दुर्लक्ष ही करतात. मात्र १३ क्रमांकाला बहुतांश लोक हे अनलकी (Unlucky) असल्याचे मानतात. खरंतर पाश्चिमात्य देशांमध्ये १३ अंकाला अत्यंत अशुभ मानले जाते. याच कारणामुळे आता भारतात ही त्यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात झाली आहे. काही हॉटेल्समध्ये रुम क्रमांक १२ नंतर थेट रुम क्रमांक १४ असल्याचे दिसून येते. १३ क्रमांकासंदर्भात प्रत्येकाची आपापली मतं आहेत.
विदेशात १३ क्रमांकासंदर्भात लोकांच्या मनात एक प्रकारची वेगळीच भीती निर्माण झाली आहे. तेथे असे मानले जाते की, भगवान येशू याला फसवणारा व्यक्ती त्यांच्यासोबत तेराव्या खुर्चीवर विराजमान होता. याच कारणामुळे १३ क्रमांक हा योग्य नसल्याचे मानतात.या घटनेनंतर युरोप, अमेरिकेसह अन्य काही देशात ही १३ क्रमांक अशुभ असल्याचे मानले जाते. पाश्चिमात्य लोकांमध्ये या संदर्भात ऐवढी भीती आहे की, इमारतीत सुद्धा १२ व्या मजल्यानंतर थेट १४ वा मजला तयार केला जातो. त्याचसोबत फ्रान्समध्ये खाण्याच्या टेबलासाठी १३ खुर्च्या असणे अनलकी असल्याचे मानले जाते.
हे देखील वाचा- जेव्हा लोकांनी Egyptian Mummies खायला सुरुवात केली, नेमके काय घडले असेल?
भारतात सुद्धा काही परदेशी नागरिक फिरण्यासाठी येत असतात. त्यामुळे त्यांच्या मान्यतेला लक्षात घेता भारतातील हॉटेल्समध्ये ही रुम क्रमांक १३ नसते. जर तुम्हाला १३ क्रमांकाची भीती वाटत असेल तर तुमच्यात ट्रिस्काइडकाफोबिया (Triskaidekaphobia) ची लक्षण निर्माण झालेली असू शकतात.(Hotel Room Secret)
या व्यतिरिक्त भारतातील चंदीगढ असे शहर आहे जेथे सेक्टर १३ नाही आहे. कारण ज्याने शहराचा नकाशा तयार केला तो विदेशातील होता. तो सुद्धा १३ क्रमांक अशुभ असल्याचे मानत होता. त्यामुळे आज ही चंदीगढ येथे सेक्टर क्रमांक १३ नाही आहे. येथे १३ नंतर १४ क्रमांकाचे सेक्टर तयार करण्यात आले आहे. तर आजवर तुम्ही याकडे लक्ष दिले नसेल तर आता द्या. कारण तुम्हाला सुद्धा एखाद्या हॉटेलमध्ये १३ क्रमांकाची रुम आढळली नाही तर त्यामागे काय कारण असू शकते याचा विचार करायला आता भाग पाडले जाईल.