Hotel Room No 13 : आपण सर्वजण मित्रपरिवारासोबत फिरायला कुठे ना कुठेतरी राहतो. फिरायला गेल्यानंतर तेथे राहण्याची उत्तम सोय कोणती असेल यासाठी हॉटेल्स, होमस्टेचा पर्याय निवडला जातो. पण तुम्हाला माहितेय का, बहुतांश हॉटेलमध्ये 13 नंबरची खोली नसते. यामागील कारण काय हे आज आपण जाणून घेऊया…
का नसते 13 क्रमांकाची खोली
आपल्याकडे बहुतांश गोष्टी अशा असतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. यापैकीच एक म्हणजे हॉटेलमधील खोली क्रमांक 13 चा समावेश आहे. बहुतांशजण क्रमांकानुसार खोलीवर क्रमांक लावतात. पण 12 क्रमांक खोलीनंतर 12 A अथवा थेट खोली क्रमांक 14 लावतात.

Hotel Room No 1
कारण काय?
पाश्चिमात्य देशांमधील लोक 13 क्रमांकाची खोली असणे अशुभ मानतात. यामागील मुख्य कारण म्हणजे ख्रिस्ती धर्मियांच्या आस्थेसंबंधित आहे. असे म्हटले जाते की, येशूच्या अखेरचे जेवण जेवणाऱ्यांची संख्या 13 होती. याशिवाय ज्यावेळी येशूचा मृत्यू झाला तेव्हा तारीख 13 च होती. अमेरिका आणि युरोपीयन देशांमध्ये बहुतांशजण खोली क्रमांक 13 पाहूनच घाबरतात. (Hotel Room No 13)
ट्राइस्किडेगाफोबिया देखील आहे कारण
जगभरातील काही लोकांमध्ये खोली क्रमांक 13 मुळे एक खास प्रकारची भीती असते. ज्याला ट्राइस्किडेगाफोबिया नावाने ओखळले जाते. यामुळे जगभरातील बहुतांश हॉटेलमध्ये खोली क्रमांक 13 नसतो.