Home » १० हजार खोल्या असलेले हॉटेल ८० वर्षांपासून बंद, पण का?

१० हजार खोल्या असलेले हॉटेल ८० वर्षांपासून बंद, पण का?

by Team Gajawaja
0 comment
Hotel Pora
Share

जेव्हा आपण आपल्या शहरातून एखाद्या अनोखळी शहरात जातो तेव्हा तेथे थांबवण्यासाठी आपण हॉटेलचा पर्याय निवडतो. आपल्या पाहुण्यांच्या सुखसुविधांसाठी हॉटेल मालकांकडून उत्तम प्रकारची काळजी घेतली जाते. अशातच काही वेळेस तुम्ही ज्या हॉटेल मध्ये राहिला असाल तेथील सुविधा तुम्हाला आवडली असेल किंवा नसेल. परंतु असे एक हॉटेल आहे ते उभारले तर गेले पण तेथे कोणी ही राहिलेच नाही. असे ही नाही की, हॉटेलच्या खोल्या कमी आहेत. चक्क १० हजार खोल्या असून ही या हॉटेलमध्ये कोणीही थांबले नाही. (Hotel Pora)

जर्मनीतील बाल्टिक समुद्राजवळील रुगेन आयलँन्डवर हे हॉटेल आहे. ते गेल्या ८० वर्षांपासून बंद पडले आहे. १० हजार खोल्या आहेतच पण अधिक हैराण करणारी गोष्ट अशी की, आजवर येथे कोणीही थांबले नाही. या हॉटेलची निर्मिती १९३६ ते १९३९ दरम्यान झाली. तेव्हा जर्मनीतील हिटर आणि त्याच्या नाजी सैन्याचे वर्चस्व होते. नाझींनी या हॉटेल स्ट्रेंथ थ्रु ज्वॉय प्रोग्राम अंतर्गत ते बनवले होते. ते बनवण्यासाठी जवळजवळ ९ हजार कामगार लागले होते.

दा प्रोरा (Hotel Pora)असे या हॉटेलचे नाव आहे. हे नाव देण्यामागे काही खास कारण ही होते. खरंतर हे हॉटेल एका स्मारकाप्रमाणे दिसते. प्रोराचा अर्थ झाडीदार मैदान किंवा पडीक जमिन असा होतो. या हॉटेलला समुद्र किनाऱ्यापासून जवळजवळ १५० किमी दूर उभारले गेले आङे. हॉटेल दा प्रोरा आठ इमारतीमध्ये विभागले गेले आहे. तसेच ४.५ किमी क्षेत्रावर ते बांधले गेले आहे. यामध्ये सिनेमागृह आणि कार्यक्रम हॉल, स्विमिंग पूल आणि अन्य सुखसोई सुद्धा आहेत. ऐवढेच नव्हे तर एखादे क्रुज शिप तेथे आरामात उभे राहू शकते.

हे देखील वाचा- जगदीशपुर…एकेकाळी ओखळले जायचे इस्लामनगर, असा आहे इतिहास

खडकात रुपातंर झालेय हॉटेलचे
हॉटेलचे बांधकाम सुरु होते. ते बांधकाम पूर्ण होण्याआधीच १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरु झाले. युद्ध सुरु झाल्यानंतर याचे बांधकाम थांबले गेले आणि सर्व कामगारांना हिटरलच्या युद्ध कारखान्यात काम करण्यासाठी पाठवण्यात आले. दरम्यान, १९४५ रोजी युद्ध संपले त्यानंतर कोणाचेही लक्ष त्या हॉटेलकडे गेले नाही. आता हे हॉटेल एका खडकाळ ठिकाणात रुपांतर झाले आहे. असे सांगितले जाते की, जर ते पूर्णपणे बांधून झाले असते तर जगातील सर्वाधिक मोठे आणि सुंदर हॉटेल असते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.