कोरोना संपल्यानंतर आता जगात मानसिक रुग्ण वाढत आहेत. हे असे लोक आहेत, जे आजकाल भुताच्या भीतीने चांगलेच घाबरलेले आहेत. अशी धक्कादायक प्रकरणे ब्रिटनमधून सातत्याने समोर येत आहेत. या रुग्णांवर नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे. कोरोनामधून बरे झाल्यानंतर, आता लोक इतर आजारांशी झुंज देत आहेत. (Horror show and Psychology)
ब्रिटनमध्ये कोरोनानंतर लोकांमध्ये विलक्षण हालचाली दिसून आल्या आहेत. इथले लोक तांत्रिकपासून ते डॉक्टरांपर्यंत सर्वांची मदत घेत आहेत. इथे काही लोक आपल्या घरात झोपेतून उठून बसतात, तर कोणाला तरी जड वस्तू पडल्याचा आवाज येतो. लोक त्यांच्या घरात ध्वनी शोधणारी यंत्रे आणि कॅमेरा बसवत आहेत, जेणेकरून त्यांना अशा घटनांची नोंद करता येईल.
ब्रिटनमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने भूत ओळखणाऱ्या घोस्ट हंटरची मागणीही अचानक वाढली आहे. कोविडनंतर सुरू झालेला हा त्रास आता राष्ट्रीय स्तरापर्यंत वाढला आहे. (Horror show and Psychology)
लंडनच्या गोल्ड स्मिथ युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर क्रिस्टोफर फ्रेंच म्हणाले की, कोविडच्या काळात लोकांनी त्यांच्या फावल्या वेळेत टेलिव्हिजनवर प्रसारित होणारे हॉरर थ्रिलर सीरियल, सोशल मीडिया आणि भयपट कार्यक्रम पाहिले. हे सर्व पाहिल्यानंतर त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात, १००० हून अधिक लोकांनी रात्री अचानक लाईट जाणे, विचित्र आवाज येणे या घटनांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. (Horror show and Psychology)
अशा आजारांना मानसिक आजार म्हणतात. ज्यामध्ये चिंता (Anxiety), निद्रानाश (Insomnia), नैराश्य (Depression) आणि ओब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर (OCD) आणि पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) यासारख्या समस्या प्रामुख्याने दिसून येतात. (Horror show and Psychology)
========
हे देखील वाचा – मानवांना दारू आवडण्याचे कारण आले समोर; मद्यधुंद माकडांवरील संशोधनातून समोर आली विचित्र गोष्ट
========
झोप न येण्याची समस्या लोकांमध्ये सर्वात जास्त दिसून येत आहे आणि लोक नेहमी कोणत्या ना कोणत्या खोल विचारात काम करताना दिसत आहेत. यासोबतच सतत अस्वस्थ वाटण्याची समस्याही समोर येत आहेत.
एकूणच कोरोनामुळे असाही प्रकार घडलाय. विश्वास बसत नसला तरी हे सत्य आहे.