जगात अनेक प्रकारच्या जमाती राहतात, ज्या आजही आदिम युगातील परंपरा आणि चालीरीतींचे पालन करतात. त्या आग विझवण्यासाठी आजही दगड घासतात. अशा जमाती सामान्य लोकांच्या संपर्कापासून दूर आहेत, परंतु त्यांच्या विचित्र परंपरा आजही पहायला आणि ऐकायला मिळतात. त्यांच्याकडून पालन केल्या जाणाऱ्या अनेक परंपरा अशा आहेत की, त्यांच्याबद्दल सांगितल्यास त्या अविश्वसनीय वाटतील. यातीलच एक परंपरा म्हणजे, महिलांची बोटे कापणे. (finger cutting tradition)
इंडोनेशियाच्या पापुआ गिनी बेटावर राहणारे दानी प्रजातीचे लोक ही विचित्र परंपरा पाळतात. हे लोक कुटुंबातील एखाद्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त करण्यासाठी त्यांच्या बोटाचा एक भाग कापतात. मृत नातेवाईकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि शोक व्यक्त करण्यासाठी, दानी जमातीच्या महिलांनी त्यांच्या बोटाचे टोक कापले जाणे अपेक्षित आहे. या जमातीचे लोक आजही जुन्या चालीरीतींचे पालन करताना दिसतात. (finger cutting tradition)

या जमातीच्या लोकांचा असा विश्वास आहे की, महिलेचे बोट कापल्यामुळे होणाऱ्या वेदनांनी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते. जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते, तेव्हा त्या घरातील महिलांची बोटे सहजपणे कापली जात नाहीत. तर महिलांची बोटे कापण्यापूर्वी अर्धा तास बांधली जातात. मग बोटे कापून जाळली जातात. (finger cutting tradition)
बोटे कापण्याची ही विचित्र परंपरा या जातीतील पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी आहे. परंतु सहसा ती महिलांनाच करावी लागते आणि पुरुष बोटे कापत नाहीत. इंडोनेशिया सरकारने या प्रथेवर बंदी घातली आहे, परंतु आजही ही वेदनादायक प्रथा येथील दुर्गम भागात सुरू आहे. (finger cutting tradition)

या जमातीचा शोध ८४ वर्षांपूर्वी पाश्चात्य वैज्ञानिकांनी लावला होता. १९३८ मध्ये अमेरिकन फिलँथ्रोपिस्ट रिचर्ड आर्कबोल्ड यांनी या जमातीबद्दल प्रथम जगाला सांगितले होते. या जमातीचे फोटो काढणे खूप अवघड आहे, कारण ही जमात लोकांपासून दूर राहते. असे असूनही अनेकजण मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून, त्यांच्यात मिसळून त्यांचे फोटो जगासमोर आणतात. या अंतर्गत जमातीशी संबंधित काही विचित्र गोष्टीही जगासमोर आल्या आहेत.
हे देखील वाचा: ‘या’ शहरात माणसांपासून जनावरांपर्यंत सर्वजण आहेत दगडाचे, कहाणी ऐकून व्हाल सुन्न
दानी जमातीची आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे, हे लोक आपल्या प्रियजनांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह पुरत नाहीत. दानी जमातीचे लोक मृतदेह अर्धवट जाळतात आणि नंतर घरात आणतात. मृतदेह अशा पद्धतीने जाळले जातात, ज्यानंतर तो ममीप्रमाणे जतन केला जाऊ शकतो. येथे तुम्हाला अनेक लोकांच्या घरांमध्ये ममी देखील मिळतील. आजही आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंडोनेशियामध्ये अशा अनेक जमाती राहतात, जे त्यांचे हजारो वर्ष जुने जीवन जगत आहेत. (finger cutting tradition)