Home » ट्रकच्या मागे लिहिण्यात येणाऱ्या Horn OK Please चा अर्थ काय?

ट्रकच्या मागे लिहिण्यात येणाऱ्या Horn OK Please चा अर्थ काय?

by Team Gajawaja
0 comment
Horn OK Please
Share

रस्त्यांवरुन धावणारे आपण ट्रक पाहतो. मात्र त्याच्या मागे नेहमीच एखादी शायरी किंवा स्लोगन लिहिलेले असते हे नक्की. खरंतर जगभरात ट्रक चालवले जातात. परंतु भारतात चालवल्या जाणाऱ्या ट्रकच्या मागे लिहिण्यात आलेली शायरी किंवा स्लोगन त्याची खासियत ही वेगळीच असते. रस्त्यांवर, महामार्गावर ट्रकच्या मागे काही पद्धतीच्या शायरी असतात हे खरंय. पण प्रत्येक ट्रकच्या मागे ‘हॉर्न ओके प्लीज’ (Horn OK Please) असे जरुर लिहिलेले असते. ते तुम्ही नक्कीच पाहिले असेल. यावरुन तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, हे नक्की कशासाठी लिहिले जात असेल? त्याचबद्दल आपण आज अधिक जाणून घेऊयात.

ट्रकच्या मागे हॉर्न ओके प्लीज लिहिले आहे त्यावरुन असे कळते की, जर एखादी गाडी ओव्हरटेक करत असेल तर त्याने हॉर्न जरुर वाजवावा. परंतु हॉर्न ओके म्हणजे नेमके काय यासंदर्भात चर्चा करुयात. ट्रकच्या मागे OK लिहिण्याची सुरुवात ही खरंतर दुसऱ्या महायुद्धापासून झाली होती. ट्रक नेहमीच आर्मीसाठी गरजेचे होते. ट्रकच्या माध्यमातून सैनिक आणि हत्यारे ही एका जागेवरुन दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात.

Horn OK Please
Horn OK Please

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जेव्हा डिझेलची कमतरता भासली होती त्यानंतर ट्रकच्या डिझेलमध्ये केरोसिन मिक्स करुन चालवले जात होते. तर केरोसिन हे ज्वलनशील असल्याने त्यामुळे लगेच आग पेटते. केरोसिन असलेले ट्रकचा अपघात झाल्यास लगेच पेट घ्यायचे. याच कारणामुळे इशारा देण्यासाठी ट्रकवर On Kerosene असे लिहिले होते. हेच आता OK मध्ये बदलले गेले आहे. त्यामुळेच आज ही जवळजवळ सर्वच ट्रकवर लिहिले जाते.(Horn OK Please)

हे देखील वाचा- इतिहासात सप्टेंबर १९३९ मध्ये सुरु झाले होते दुसरे महायुद्ध, जाणून घ्या अधिक

हॉर्न ओके प्लीज लिहिण्यामागे आणखी काही दावे केले जातात. त्यानुसार आपण जसे पाहिले की, ओव्हरटेक करण्यापूर्वी हॉर्न जरुर वाजवावा. मात्र नंतर हळूहळू OKT मधून T हा काढून टाकण्यात आला. येथे OKT चा अर्थ ओव्हरटेक होता. आता फक्त OK लिहिले जाते. दरम्यान, महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी हे लिहिण्यावर बंदी घालण्यात आली होती. कारण असे मानले जात होते की, यामुळे ध्वनी प्रदुषण वाढण्यास मदत होते.

या व्यतिरिक्त फोर्ब्सच्या केनेथ रापोजाच्या एका वृत्तात असे म्हटले होते की, ट्रक चालक साइड मिररची मदत घेण्याऐवजी या तथ्याचे संकेत देत हॉर्नचा उपयोग करतात की, आता ते कारला ओवरटेक करत आहेत. अशाच प्रकारे असे सुद्धा ट्रक आहेत ज्यांना वास्तवार साइड मिरर नसतात. या केसमध्ये ट्रकच्या मागे बोल्डमध्ये हॉर्न ओके प्लीज लिहावे लागते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.