मधमाशा मध तयार हे करतो हेच आपण वेळोवेळी ऐकले आहे. पण तुम्ही कधी एखाद्या मुंगीला मध तयार करताना पाहिले आहे का किंवा त्याबद्दल ऐकले आहे का? नाही ना. पण मुंगी सुद्धा मध तयार करते, हे ऐकून थोडे विचित्र वाटेल किंवा तुम्ही हसाल सुद्धा. पण हे खरं आहे. जगात मुंग्यांची अशी एक प्रजाती आहे जी मध तयार करते. त्यांना सामान्य भाषेत हनीस्पॉट अॅन्ट्स किंवा हनी अॅन्ट्स असे म्हटले जाते. त्या सुद्धा मधमाश्यांप्रमाणेच फुलांमधील गोड रस एकत्रित करतात. पण त्यांनी मध जे काढले आहे ते साठवून ठेवण्याची त्यांची पद्धत मात्र वेगळी आहे. वैज्ञानिक भाषेत त्याला कॅम्पोनोट्स इंफ्लेट्स म्हणतात. तर जाणून घ्या त्या कशा पद्धतीने मध साठवण्याचे काम करतात त्याबद्दल अधिक. (Honey Ants)
हनी अॅन्ट्स तर मध बनवतात पण त्या साठवण्यासाठी मधमाश्यांसारखे पोळं तयार करत नाही. त्या आपल्याच पोटात ते साठवतात. ते फुलांमधील गोड रस चोखतात जो मधात रुपांतर होतो आणि त्यांच्या पोटात साठला जातो. एकावेळानंतर त्यांचे पोट ऐवढे मोठे होते की, एखादी दुसरी मुंगी सुद्धा त्यांच्यासमोर लहान होते. याच कारणामुळे त्यांना ओळखणे सुद्धा अगदी सोप्पे आहे.
एका मर्यादित कालावधीनंतर त्यांच्या पोटात ऐवढे मध जमा होते की, त्यांना चालणे सुद्धा मुश्किल होते. अशा स्थिती भिंतीतील एखाद्या ठिकाणी त्या राहतात किंवा तेथून हलत नाहीत. जेव्हा कधी दुसऱ्या सदस्यांना जिवंत राहण्यासाठी भोजनाची गरज असते तेव्हा ते त्या मुंगीच्या पोटातील गोड स्तराचा पदार्थ खाऊन जिवंत राहतात. त्यांना सुद्धा टोळीने राहणे आवडते.
मुंग्यांची ही प्रजाती ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मेक्सिको आणि अफ्रिकाच्या वाळवंटात आढळते. ती अशी ठिकाण असतात जेथे मुंग्यांना भोजन अगदी सहज मिळू शकत नाही. त्यामुळे मुंग्यांना जीवंत राहण्यासाठी फुलांमधील रसावर अलवंबून रहावे लागते. मध साठवण्यासाठीची त्यांची ही पद्धत त्यांना जीवंत राहण्यास कामी येते. (Honey Ants)
हे देखील वाचा- नदीच्या पाण्यातून काढले जाते सोनं? सत्य ऐकून व्हाल हैराण
रिचर्समध्ये असे समोर आले आहे की, मधमाशी असो किंवा मुंगी, दोघांच्या मधा अँन्टीऑक्सिडेंट्स असतात. एका रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, यांच्या मधाचा उपयोग मधुमेहाच्या उपचारासाठी केला जाऊ शकतो. दरम्यान, यावर पुरेसा रिसर्च होणे अद्याप शिल्लक आहे. रिसर्चनंतर हे समोर येईल की या गोष्टीत किती सत्यता आहे.