Home » Honda Motors च्या कर्मचाऱ्यांना बोनसवर झटका, कंपनीने ‘या’ कारणास्तव मागितले पैसे

Honda Motors च्या कर्मचाऱ्यांना बोनसवर झटका, कंपनीने ‘या’ कारणास्तव मागितले पैसे

by Team Gajawaja
0 comment
Honda Motors
Share

आर्थिक वर्षाच्या गेल्या तिमाहीत कमाईत घट झाल्याने त्रस्त असलेल्या होंडा मोटर्सने (Honda Motors) आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस संदर्भात झटका दिला आहे. जापानी कार निर्माती कंपनीने कर्मचाऱ्यांना असे म्हटले की, त्यांना ओव्हरपेड बोनस जो दिला आहे तो पुन्हा घेतला जाणार आहे. सध्याची वाढता महागाई दर आणि अर्थव्यवस्थेच्या अनिश्चिततेच्या या काळात बोनस कोणत्याही कंपनीच्या कर्मचाऱ्यासाठी एक मोठा आधार मानला जातो. अशातच खात्यात आलेल्या बोनस मधील एक मोठा हिस्सा परत मागितल्याबद्दलच्या आदेशावर टीका केली जात आहे. होंडा मोटर्सला गेल्या तिमाहीदरम्यान गेल्या वर्षाच्या तुलनेत फायद्यात ४ टक्क्यांहून अधिक तोटा सहन करावा लागत आहे.

कंपनीने अमेरिकेतील ओहियो राज्यातील मॅरिसविले शहरात असलेल्या आपल्या फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांना नुकताच एक मेमो पाठवला आहे. यामध्ये कंपनीने असे म्हटले की, त्यांना ओव्हरपेड बोनसची रक्कम खात्यात जमा केली आहे. म्हणजेच जेवढा बोनस होता त्यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना दिला गेला आहे. एनबीसी४ च्या रिपोर्टनुसर, कंपनीने पुढे असे म्हटले की कर्मचाऱ्यांना हा ओव्हरपेड बोनस परत करावा लागणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांनी या मेमोचे उत्तर न दिल्यास रक्कम ही आपोआप त्यांच्या वेतनातून कापली जाणार आहे.

Honda Motors
Honda Motors

किती रक्कम परत मागवली हे कंपनीने केले नाही स्पष्ट
एनबीसी४ च्या मते, या बद्दल विचारल्यानंतर कंपनीने मेमो पाठवल्याची पुष्टी केली आहे. कंपनीने असे म्हटले की, त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांकडे बोनस मधील काही रक्कमेचा हिस्सा परत मागितला आहे. त्याचसोबत असा ही दावा केला आहे की, कंपनीचे हे पाऊल पूर्णपणे कायदेशीर आहे. दरम्यान, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याचा खुलासा करण्यास नकार दिला आहे की, किती बोनस दिला गेला होता आणि कर्मचाऱ्यांना किती हिस्सा परत करावा लागणार आहे.(Honda Motors)

कंपनीने अधिकृत विधानात असे म्हटले की, या महिन्याच्या सुरुवातीला होंडा मोटर्सने आपल्या असोसिएट्सला बोनस दिला होता. काही लोकांचा ओव्हरटाइम ही झाला होता. बोनस संबंधित मुद्दा एक संवेदनशील प्रकरण आहे आणि आम्ही याचा आपल्या असोसिएट्सवर पडणारा प्रभाव कमी करण्याच्या उद्देशाने वेगाने काम करत आहे. जसे की, हा एक खासगी मुद्दा आहे त्यामुळे आम्ही या प्रकरणी अधिक माहिती देणार नाही.

हे देखील वाचा- BATA कंपनी स्वत:च्याच देशात व्यवसाय करण्यास झाली फ्लॉप पण भारतात रचला इतिहास

कर्मचाऱ्यांच्या बायकांना बजेट कोलमडण्याची भीती
कंपनीच्या या पावलामुळे होंडाच्या कर्मचाऱ्यांच्या बायकांना त्यांच्या घराचे बजेट कोलमडण्याची चिंता सतावत आहे. एका कर्मचाऱ्यांच्या पत्नीने असे म्हटले की, तिच्या नवऱ्याला १० टक्के बोनस परत करण्यास सांगितला आहे. ही अत्यंत महत्वाची रक्कम आहे. त्यांनी असे म्हटले की, हा हिस्सा कारचा ईएमआय, आमच्या कर्जाचा अर्धा हिस्सा किंवा दोन-तीन आठवड्याच्या सामानाच्या समान आहे. आमच्यासाठी ही फार मोठी रक्कम आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.