हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी महागडी कोल्ड क्रीम वापरण्यापेक्षा घरगुती उपाय (Homemade Remedies) करणं कधीही उत्तम. हिवाळ्यातील दिवसात हवेतील आद्रता कमी होऊन वातरणात कोरडेपणा राहतो. त्यामुळे संपूर्ण शरीराची त्वचा कोरडी पडण्याची समस्या जाणवत असते. याचबरोबर आणखी एक समस्या म्हणजे ओठ फाटणे किंवा ओठातून रक्त येणे.
थंडीत कोरड्या हवेमुळे शरीराच्या इतर त्वचेपेक्षा पाच पट नाजूक असलेल्या ओठांमधील नैसर्गिक मॉइश्चर हिवाळ्यात कमी होते व परिणामी ओठ सुकतात, काळे पडतात आणि ओठांतून रक्त येण्याची समस्या निर्माण होते. या समस्यावर उपाय म्हणून हानिकारक केमिकल कॉस्मेटिक उत्पादने न वापरता साध्या घरगुती आणि नैसर्गिक उपायांनी (Homemade Remedies) ओठ नरम आणि मुलायम ठेवता येतात.
१. भरपूर पाणी पिणे –
दररोज शरीराला दिवसभरात ३ ते ४ लिटर पाण्याची आवश्यकता असते. उन्हातील अतिउष्णतेने आपण भरपूर पाणी पीत असतो परंतु थंडीच्या वातरणात शरीराला हवे तितके पाणी न मिळाल्याने त्वचा कोरडी पडण्यास कारणीभूत ठरते त्यामुळे थंडीतही त्वचा हायड्रेटेड ठेवण्यास पाणी अत्यंत प्रभावी उपाय आहे.
२. दुधाची साय –
कोरड्या ओठांसाठी दुधाची साय अत्यंत गुणकारी मानले जाते. ओठ कडक पडण्याची समस्या सतत जाणवत असेल आणि त्याचबरोबर ओठ काळे पडले असतील तर दुधाची आणि गुलाबाच्या पाकळ्या एकत्रित करून हे मिश्रण ओठांना लावण्यास ओठ मऊ मुलायम आणि नैसर्गिक गुलाबी दिसू लागतात.
३. तूप –
शुद्ध गायीच्या तुपाने कोरडया ओठांना हळुवार मालीश केल्याने ओठ नरम पडतात.रोज रात्री झोपताना एक चमचा अत्यंत कोमट तुपाने ओठांना हळुवार एक मिनिट करावा व रात्रभर ठेवावे. असे केल्याने आठवड्याभरात चांगले परिणाम दिसून येतील.
हे ही वाचा: Omicron – या ‘पाच’ गोष्टींचा दररोजच्या जेवणात समावेश करून ओमायक्रॉन व्हेरिएंटवर करा घरच्याघरी मात!
तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण पेरू खाण्याचे ‘एवढे’ आहेत फायदे!
४.व्हॅसलिन –
कोरड्या शुष्क ओठांना मॉइश्चरायझरची अत्यंत गरज असते. प्रदूषणमुळे ओठांना त्रास होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे तिन्ही ऋतूत रोज ओठांना वॅसलीन लावल्याने ओठांचे आरोग्य चांगले राहते. शिवाय बाहेर जात असताना चांगल्या प्रतीच्या मॉइश्चरायझर क्रीम आणि सनस्क्रीमचा वापर केल्याने त्वचेचे सनटॅन आणि ड्रायनेस पासून रक्षण होऊन त्वचेचे आरोग्य सुधारते.