हल्ली केस गळणे, केस कोरडे होणे ही समस्या खुप सामान्य झाली आहे. केवळ महिलाच नाही तर पुरुषही केस गळण्याची तक्रार करताना दिसतात. अर्थात केस गळने किंवा त्यातील चार्म जाणे याची विविध कारणे असू शकतात.हवेत असणारे प्रदूषण, कॉस्मेटिक कलरचा वापर, जेनेटिक अशी अनेक कारणे यामागे असू शकतात. पण आपल्यातील प्रत्येकाला आपले केस छान , मुलायम, चमकदार, दाट असावेत अस वाटत असत.बाजारात अशी अनेक उत्पादने आहेत जी दावा करतात की ते सीरम, एसेन्स सारख्या केस गळतीची समस्या कमी करू शकतात. परंतु आपल्याला हे देखील माहित आहे की त्यामध्ये असणारी रसायने आपल्याला फायद्यापेक्षा जास्त नुकसान करतात, विशेषत: जेव्हा ते दीर्घकाळ वापरले जातात.पण तुम्हाला माहीत आहे का की असे काही खास आणि अतिशय सोपे हेअर मास्क तुम्ही अगदी घरच्या घरी वापरून तुमच्या केसांच्या समस्या सोडवू शकता. हो, हे शक्य आहे आणि आजच्या लेखात आपण याच सोप्या मास्क बद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात.(Homemade Hair Mask)

– अंड्यात असणारे प्रथिने केसांचे मूळ निरोगी बनवतात आणि त्यांना मजबूत बनवून त्यांना तुटण्यापासून रोखतात. हा मास्क बनवण्यासाठी एक अंडी फोडून त्याचा पिवळ बलक एका भांड्यात काढावा. त्यात एक चमचा एरंडेल तेल आणि २ चमचे मध घाला. सर्व काही व्यवस्थित मिक्स करा आणि मास्क बनवा.हा मास्क प्रथम आपल्या टाळूवर आणि नंतर केसांच्या टोकांवर लावा. एक तास तसेच ठेवा. त्यानंतर सौम्य शॅम्पू आणि कोमट पाण्याने केस धुवा.
– केळीमुळे केसांना पोषण मिळते. हेच कारण आहे की केळीपासून बनवलेला हेअर मास्क केसांमधील पोषणाची कमतरता पूर्ण करतो. घरच्या घरी सोप्या पद्धतीने केळीपासून हेअर मास्क तयार होतो. घरगुती हेअर मास्क तयार करण्यासाठी प्रथम केळी एका बाऊलमध्ये मॅश करा. त्यानंतर त्यात मध आणि ऑलिव्ह ऑईल मिसळा. आता हे आपल्या टाळूवर केसांना लावून पाच मिनिटे ठेवा आणि कोमट पाण्याने केस धुवा. यानंतर तुम्हाला शॅम्पू करण्याची गरज भासणार नाही.
– दहीमध्ये व्हिटॅमिन बी, प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी असते, जे केसांच्या वाढीसाठी चांगले मानले जाते. हा हेअर मास्क केसांना मॉइश्चरायझ करतो तसेच तुटण्यापासून वाचवतो.हा मास्क बनवण्यासाठी १ कप दही ,१ टेबलस्पून एपल साइडर व्हिनेगर ,१ टेबलस्पून मध हे सर्व एकत्र करा. हा मास्क केसांच्या मुळांना लावा.मास्क केसांमध्ये 15 मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

– पपईमध्ये असलेले पोषक घटक केसांना मजबूत करण्यास मदत करतात. पपईचा हेअर मास्क बनवण्यासाठी दोन चमचे पपईचा पल्प काढा, मग त्यात एक चमचा मध घालून जाड पेस्ट तयार करा. मग हा हेअर मास्क आपल्या टाळूवर आणि केसांवर लावा आणि केस अर्धा तास असेच राहू द्या नंतर धुवून टाका.
– तीन चमचे काळे चणे रात्री भिजवून त्याची पेस्ट सकाळी तयार करावी. त्यात एक अंडी, एक चमचा लिंबाचा रस आणि एक कप दही मिसळून केसांना लावावे. अर्धा तास ठेवा आणि नंतर थंड पाण्याने केस धुवा. यामुळे तुमच्या निर्जीव केसांना चमक येईल.
– स्ट्रॉबेरीमध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीराला फायदेशीर ठरतात, तसेच केस मजबूत बनवतात. यात मॅग्नेशियम, मॅंगनीज, तांबे भरपूर प्रमाणात असतात आणि ही संयुगे केसांच्या फोलिकल्सला उत्तेजन देतात, ज्यामुळे केसांच्या वाढीस मदत होते. हा हेअर मास्क बनवण्यासाठी ४ ते ५ स्ट्रॉबेरी मॅश करा, नंतर त्यात एक चमचा मेयोनीज घालून केसांना लावा. अर्ध्या तासानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवावेत.
================================
हे देखील वाचा: Monsoon Health Tips: पावसाळ्यात स्वतःला स्वस्थ ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
================================
– एवोकॅडोमध्ये केस दाट आणि लांब करण्यासाठी आवश्यक निरोगी चरबी असतात. त्याचबरोबर त्यात नारळाचे दूध घातल्यास केसांना पोषण मिळेल आणि ऑलिव्ह ऑईलमुळे केस गळती ही थांबेल. हा मास्क बनवण्यासाठी एवोकॅडो घेऊन सोलून बि काढून टाका.आता, एवोकॅडो पल्प काढून मॅश करा. त्यात एक चमचा नारळाचे दूध घालावे.नंतर त्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑईल घालून चांगले मिक्स करा. हा मास्क केस आणि टाळूवर लावा. थोडा वेळ कोरडे झाल्यावर केस धुवून कंडिशनर लावावे.
– तुम्हाला कदाचित माहित नसेल, पण ग्रीन टी तुमच्या त्वचेसोबतच केसांच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. घरगुती ग्रीन टी हेअर मास्कमुळे केस तुटणे आणि गळण्याची समस्या दूर होते. आपण ते बनविणे आवश्यक आहे.हा ग्रीन टी होममेड हेअर मास्क बनवण्यासाठी आधी अंडी फेटून घ्या. त्यात दोन चमचे ग्रीन टी घाला. आता हा ग्रीन टी होममेड हेअर मास्क केसांना लावा आणि तासाभरानंतर थंड पाण्याने धुवा.
(डिस्क्लेमर: वरील लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे, यातील कोणताही उपाय करण्याआधी योग व्यक्तीचा सल्ला घ्या.)