Home » घरच्याघरी अशी तयार करा Face Powder, त्वचेला मिळेल नॅच्युरल ग्लो

घरच्याघरी अशी तयार करा Face Powder, त्वचेला मिळेल नॅच्युरल ग्लो

बहुतांश महिला सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. अशातच तुम्ही सकाळपासून ते रात्रीपर्यंत केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करत असाल तर सावध व्हा.

by Team Gajawaja
0 comment
Homemade face powder
Share

Homemade Face Powder : बहुतांश महिला सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. अशातच तुम्ही सकाळपासून ते रात्रीपर्यंत केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करत असाल तर सावध व्हा. याचा तुमच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसात फेस पावडरचा वापर अजिबात करू नये. खरंतर यामुळे चेहऱ्याला ग्लो मिळेल. पण बाजारात मिळणारे फेस पावडरमध्ये काही प्रकारचे केमिकल्स असतात. जे आपल्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात.

अशातच तुम्ही घरच्याघरी फेस पावडर तयार करू शकता. यासाठी तुम्हाला अधिक सामग्रीचा वापर करावा लागणार नाहीय. याबद्दलच जाणून घेऊया अधिक…

फेस पावडरसाठी लागणारी सामग्री
-एक कप आरारोट पावडर
-एक कप कोको पावडर
-एक चमचा जायफळ पावडर
-दोन थेंब एसेंशियल ऑइल

कृती
घरच्याघरी फेस पावडर तयार करण्यासाठी एक मोठ्या बाऊलमध्ये आरारोट पावडर घ्या आणि त्यात थोड पाणी मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. आता आपल्या स्किन टोननुसार कोको पावडर आणि जायफळ पावडरही मिक्स करा. या दोन्ही पावडर अँटी-ऑक्सिडेंट्सयुक्त असतात. तुम्ही या सर्व सामग्री एका बाऊलमध्ये व्यवस्थितीत मिक्स करा. यानंतर आता एसेंशियल ऑइलचे थेंब मिक्स करा.

फेस पावडर तयार करताना तेलाचा अधिक वापर करू नका. अन्यथा पेस्ट तयार होईल. या पावडरमध्ये तुम्ही टी-ट्री ऑइलचा वापरही करू शकता. या सर्व सामग्री व्यवस्थितीत मिक्स केल्यानंतर एका हवाबंद कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवा. यानंतर कधीही तुम्ही ही पावडर तुमच्या चेहऱ्याला लावू शकता.

घरच्या घरी तयार करण्यात आलेल्या फेस पावडरचे फायदे
-आरारोटचा वापर फेस पावडर तयार करण्यासाठी करणार असल्यास यामुळे त्वचा मऊ होते. ही पावडर अँटीसेप्टिक गुणांनी भरपूर असते. याशिवाय या पावडरमुळे डाग दूर होऊ शकतात. (Homemade Face Powder)

-जायफळात अँटी-बॅक्टेरियल गुण असता. जायफळाचा वापर फेस पावडरमध्ये वापर केल्यास तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचत नाही.

-कोको पावडरच्या मदतीने फेस पाडवमुळे तुमच्या त्वचेची शेड हलकी किंवा डार्क होऊ शकते. पण फेस पावडर तयार करताना कोको पावडरचा वापर मर्यादित करावा.

(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)


आणखी वाचा :
सनस्क्रिन लावल्याने व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होते का?
सुंदर त्वचेसाठी रात्री झोपना करा हे उपाय, उजळेल सौंदर्य
लग्नसोहळ्यात स्लिम दिसायचेय? लक्षात ठेवा या गोष्टी

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.