Home » ‘या’ उपायांनी चेहऱ्यावरील सुरकुत्या करा कमी

‘या’ उपायांनी चेहऱ्यावरील सुरकुत्या करा कमी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Remedies For Wrinkles
Share

स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकालाच आपल्या चेहऱ्याची त्याच्या सौंदर्याची काळजी असते. आपापल्या परीने सगळेच घरगुती, छोटे-छोटे, सोपे असे उपाय करत असतात. मात्र हे उपाय आपल्याला सूट होतील आणि फरक पडेल असे नाही. सगळ्यांनाच नेहमीच मोठ्या सलोनमध्ये जाऊन, वेगवेगळ्या थेरपी करून सौंदर्य जपणे शक्य नसते. अशा वेळेस आपण घरगुती उपाय शोधत आपल्या समस्या दूर करतो. (Remedies For Wrinkles)

चेहऱ्यावर सुरकुत्या येणे ही खूपच सामान्य आणि नैसर्गिक बाब आहे, मात्र कमी वयात आणि लवकर असे होणे योग्य नाही. पण आजकालच्या आधुनिक जगात ही समस्या खूपच वाढत आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या कि तुम्ही तुमच्या वयापेक्षा जास्त वयस्कर दिसू लागतात. जसजसे वय वाढते तसतसे त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिन नावाच्या प्रथिनांचे प्रमाण कमी होत जाते. अशा वेळेस त्वचेची आर्द्रता, चमक आणि सौंदर्य कमी होऊ लागते. मग अशा वेळेस आपण पाहू उपाय करत या सुरकुत्या कमी करत त्यांना हळूहळू घालवू शकतो. चाल जाणून घेऊया या उपायांबद्दल.

कोरफडीचा गर :

चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर कोरफडीचा वापर करू शकता. कोरफड त्वचेशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. कोरफडीमध्ये भरपूर पोषक तत्व असून, त्यात व्हिटॅमिन ई असते जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. शिवाय कोरफड त्वचेला हायड्रेट करते. एलोवेरा जेल घ्या आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. 20-25 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. (Remedies For Wrinkles)

तेल मालिश :

बदाम तेल, खोबरेल तेल किंवा अर्गन तेल आदी तेलाने तुम्ही चेहऱ्यावर तेलाने मसाज करा. या मसाजमुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण वाढते. याशिवाय कोलेजनच्या निर्मितीलाही मदत होते. तेलाच्या मसाजमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर होतात.

Remedies For Wrinkles

केळी :

केळी चेहऱ्याला हायड्रेट करण्याचे काम करते. केळीमध्ये नैसर्गिक तेल आणि जीवनसत्त्वे असतात जे त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर केळीचा फेस मास्क लावा. यासाठी एक केळ घेऊन ते चांगले मॅश करा आणि ते चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासानंतर चेहरा धुवून टाका.

योग्य आहार :

चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर करण्यासाठी जीवनसत्त्वे आणि खनिजे युक्त आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्वचेतील कोलेजन वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असलेले पदार्थ खा. सोबतच व्हिटॅमिन सी आणि ई असलेले क्रीम किंवा सीरम चेहऱ्याला लावू शकता. (Remedies For Wrinkles)

भरपूर प्रमाणात पाणी प्या :

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही हायड्रेटेड राहाल आणि तुमची त्वचा चमकदार होईल. याशिवाय पाणी पिण्याने सुरकुत्या आणि बारीक रेषा देखील बऱ्याच प्रमाणात टाळता येतात. भरपूर प्रमाणात पाणी पिण्यामुळे आरोग्यासोबतच त्वचेला सुद्धा फायदा होतो.

मध :

चेहऱ्यावर आणि डोळ्याभोवती मध लावा आणि एक-दोन मिनिटे मसाज करा. भरपूर कामामुळे आणि स्क्रीनमुळे तुमच्या डोळ्यांवर परिणाम होतो आणि वयानुसार सुरकुत्या दिसू लागतात. ते त्वचेचे पीएच संतुलित करते आणि सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी मदत करू शकते. (Remedies For Wrinkles)

======
हे देखील वाचा : पोट कमी करण्यासाठीचे काही उपाय
======

ऑलिव्ह ऑईल :

ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. सुरकुत्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलने चेहऱ्याला मसाज करू शकता.

दही : 

दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते, जे त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करते. दह्याने चेहऱ्याला मसाज करा, नंतर चेहरा पाण्याने धुवा.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.