Home » Hair Care : पावसाळ्यात केसांचे आरोग्य टिकवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

Hair Care : पावसाळ्यात केसांचे आरोग्य टिकवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

by Jyotsna Kulkarni
0 comment
Hair Care
Share

पाऊस हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडता ऋतू आहे. पाऊसात भिजायला, बाहेर फिरायला सगळ्यांनाच आवडते. मात्र पाऊसात बाहेर पडल्यानंतर थोड्याफार प्रमाणात आपण ओले होतोच. या ओले होण्यामध्ये केसांचा देखील समावेश असतो. पावसाच्या पाण्यात केस ओले झाल्यानंतर अनेक महिलांचे केस फिझी, चिकट होतात. पावसाळ्यात वातावरण बदलत असते. काही वेळा हवा थंड तर काही वेळा उष्ण, दमट असते. अशा हवेत केसांची काळजी घेण्याचे मोठे आव्हान महिलांसमोर असते. या ऋतूत वाढत्या आर्द्रतेमुळे, टाळू अस्वच्छ होण्याचे देखील प्रमाण वाढते. यामुळे केस गळण्याची समस्या जास्त जाणवते. केसांची चमक कमी होते आणि ते निस्तेज दिसू लागतात. (Hair Care)

मग या ऋतूमध्ये केसांची काळजी घ्यायची तरी कशी? असा प्रश्न स्त्री वर्गामध्ये सगळ्यांनाच पडतो. आज आम्ही तुमच्या याच प्रश्नाचे उत्तरं घेऊन आलो आहोत. आपल्या सर्वांनाच सुंदर, लांब आणि निरोगी केस हवे असतात. मात्र केसांची काळजी घेणे सोपे नसते. निरोगी केसांसाठी विविध उपायांसोबतच आहार देखील योग्य असावा लागतो. तुमच्या आहारामध्ये विविध प्रकारच्या भाज्यांचा आणि फळांच्या समावेश करणे फायदेशीर ठरते. आज आपण या लेखातून पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायची यासाठी काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत. (Marathi News)

१. पावसाळ्यात केसांना नीट पोषण मिल्ने गरजेचे असते. जर तसे झाले नाही तर केस तुटतात, गळतात. केसांना पोषण देण्यासाठी आठवड्यातून किमान २ वेळा कोमट तेलाने केसांच्या मुळांशी मसाज करा. केसांना तेल लावल्यानंतर काही तासांनी केस धुवावेत. या उपायाने केस तुटत नाही किंवा गळत देखील नाहीत. शिवाय केसांमध्ये कोंडा होणे, खाज येणे या समस्याही होत नाही. (Todays Marathi Headline)

२. पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, जर तुमचे केस पावसात ओले झाले तर घरी येऊन लगेच तुमचे केस स्वच्छ धुवा. पावसात ओले झाल्यानंतर तुमच्या केसांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यातील आम्लता तुमच्या टाळूच्या पीएचमध्ये असंतुलन निर्माण करू शकते. असे झाल्यास केसांच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे पावसात ओले झाले की लगेच केस धुवा. (Top Trending News)

Hair Care

३. पावसाळ्यात केसांची काळजी घेण्याच्या अजून एक महत्त्वाच्या गोष्ट म्हणजे टाळू आणि केस नेहमी कोरडे ठेवा. तुमचे केस नाजूक असतात आणि ओले असताना ते सर्वात जास्त असुरक्षित असतात. केस धुतल्यानंतर, केस गळणे कमी करण्यासाठी तुमचे टाळू लवकर वाळवा. तुमचे केस नैसर्गिकरित्या हवेत कोरडे होऊ द्या. केस वळवण्यासाठी ड्रायरचा वापर टाळा. केस ओले असताना ते बांधू नका. पावसाळ्यात बाहेर पडताना केस झाकण्यासाठी छत्री, टोपी किंवा स्कार्फ वापरा. (Marathi Latest NEws)

४. पावसाळा येताच अनेकांना केस गळतीची समस्या जाणवू लागते. याचे कारण म्हणजे या ऋतूमध्ये केस रुक्ष आणि कोरडे होतात. अशावेळी या ऋतूत हेअर कंडिशनिंग जरूर करा.

५. जर तुमचे केस पावसात ओले झाले असतील तर केस विंचरण्यापूर्वी ते चांगले कोरडे करा. केस गळणार नाहीत म्हणून मोठा दात असलेला कंगवा वापरा. पावसाळ्यात केस विंचरताना काळजी घ्या. ओले केस लगेच विंचरू नका कारण ते तुटण्याची शक्यता जास्त असते. (Marathi Top NEws)

६. पावसाळ्यात केसांची चमक आणि मऊपणा वाढविण्यासाठी आठवड्यातून एकदा खोल कंडिशनर लावणे. तुम्ही तुमच्या केसांच्या संपूर्ण लांबीवर कंडिशनर लावू शकता आणि ते गरम टॉवेलमध्ये १५ मिनिटे गुंडाळू शकता. उष्णतेमुळे कंडिशनर तुमच्या केसांच्या मुळांमध्ये खोलवर पोहोचण्यास मदत होईल आणि पावसाळ्यात होणारा अतिरिक्त कोरडेपणा टाळता येईल. (Top Stories)

=========

हे देखील वाचा :

Health Care : शरीरातील रक्त वाढीसाठी लोहयुक्त गोळ्यांचे सेवन करता? लक्षात ठेवा या गोष्टी

Health Care : ब्रम्ह मुहूर्तावर उठण्याचे आरोग्यदायी फायदे, मनं आणि तनं राहिल शांत

=========

७. तुम्ही जे खाता त्याचा तुमच्या केसांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. त्यामुळे कायम संतुलित आहार तुमचे केस निरोगी आणि चमकदार ठेवतो. पावसाळ्यात चुकीच्या आहारामुळे केस आणि टाळूच्या समस्या वाढतात. म्हणून, या दिवसात जंक फूडपासून दूर राहणे आणि ताजा, निरोगी आहार घेणे महत्वाचे आहे. तुमच्या आहारात प्रथिने आणि जीवनसत्वयुक्त पदार्थांचा समावेश करा कारण ते तुमच्या केसांना चमक देतात.  (Social Updates)

(टीप : कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.