उन्हाळा म्हटले की, आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावू लागतात. अति ऊन आपल्या शरीरासाठी अजिबातच चांगले नाही. आपणही जर कडक उन्हात गेलो तर आपल्याला अनेक त्रास होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यातील त्रास विविध उपाय करून आपल्याला कमी करता येतात. मात्र याच उन्हाळ्यात सगळ्यांना सर्वात जास्त भेडसावणारी आणि डोकेदुखी ठरणारी समस्या म्हणजे ‘घाम’.(Sweating)
उन्हाळ्यात घाम येणे खूपच सामान्य बाब आहे. सगळ्यांनाच कमी जास्त प्रमाणात घाम येत असतो. मात्र हा घाम खूप त्रासदायक देखील असतो. अति घाम येण्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते, लवकर थकवा जाणवतो, चिडचिड होते. घाम न येण्यासाठी आपण २४ तास एसीमध्ये नाही बसू शकत. मग घाम कमी यावा किंवा येऊच नये यासाठी काही उपाय असतात का? जरी घाम आला तरी त्याचा आपल्याला त्रास होता कामा नये. त्याआधी जाणून घेऊया घाम का येतो? आणि घाम येण्याची कारणं. (Summer News)
घाम का येतो?
आपल्या त्वचेवर असणाऱ्या घामाच्या ग्रंथी घाम तयार करतात. घामाच्या ग्रंथी ह्या संपूर्ण शरीरावर असतात. मात्र त्यातही प्रामुख्याने त्या कपाळावर, काखेत, हातापायांचे तळव्यांवर जास्त असतात. त्यामुळे प्रत्येकाला तेथे घाम जास्त येत असतो. घामामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. सोबतच घामामध्ये सोडिअम, पोटॅशियम क्षार देखील असतात. आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे मुख्य काम घाम करत असतो. (Top Marathi News)
=========
हे देखील वाचा : रात्रीच्या वेळी झोपेत घाम येणे आरोग्यासाठी ठरु शकते धोकादायक, ‘या’ आजाराचे तर लक्षणं नाही ना?
=========

घाम जास्त येण्याची कारणे
⦁ उन्हाळ्यातील उकाड्यामुळे किंवा कडक उन्हात जास्त फिरल्याने, काम केल्याने घाम येतो.
⦁ जास्त काम किंवा व्यायाम करण्याने घाम भरपूर येतो.
⦁ जास्त गरम, तिखट किंवा अधिक मसालेदार पदार्थ खाण्यामुळे.
⦁ शरीरातील पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे,
⦁ काही लोकांना जास्त जास्त घाम ते घेत असलेल्या विशिष्ट औषधांमुळे देखील येऊ शकतो. यासोबतच मेनोपॉज, स्थूलता, रक्तातील साखर कमी होणे, थायरॉइड .
उन्हाळ्यात घामापासून वाचण्यासाठी काही सोपे उपाय.
*लिंबू आणि मीठ
लिंबू आणि मीठ एकत्र करुन घाम येणाऱ्या भागी चोळायचे. असे करताना तुमचा शरीराचा जास्त घाम येणारा भाग स्वच्छ असायला हवा. त्यानंतर त्यावर लिंबू आणि मिठाचे मिश्रण चोळावे. थोडावेळ तो भाग तसाच ठेवावा आणि मग अंघोळ करावी किंवा तो भाग धुवून टाकावा. लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असल्याने बॅक्टेरिया नष्ट होतात आणि घाम कमी होण्यासाठी मदत होते. (Top Trending Marathi News)
*कॉर्नस्टार्च आणि बेकिंग सोडा
कॉर्नस्टार्ज आणि बेकिंग सोडा हे एकत्र करावे आणि हे मिश्रण रोज रात्री काखेत किंवा घाम येणाऱ्या भागी लावा. ३० मिनिटे ठेवून नंतर आठवणीने धुवून टाका. मात्र जर हे मिश्रण जास्त काळ शरीरावर राहिल्यास अन्य त्रास होण्याची शक्यता असते. कॉर्नस्टार्च आणि बेकिंग सोडा या दोन्ही गोष्टींमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. बेकिंग सोडामध्ये असलेले अल्केलाईन हे घामातील बॅक्टेरीयाला आकर्षित करतात. (Social News)
*टोमॅटोचा रस
खूप घाम येत असेल तर तुम्ही टोमॅटोचा रस पिऊ शकता. जर टोमॅटोचा रस प्यायचा नसेल तर काखेत अथवा घाम येणाऱ्या ठिकाणी १० मिनिटांसाठी हा रस लावावा त्यानंतर अंघोळ करावी.(Home Remedies For Sweating)

=========
हे देखील वाचा : Sweat Smell : चारचौघात घामाच्या दुर्गंधीमुळे ओशाळलेपणा जाणवतो….? मग करा ‘हे’ सोपे उपाय
=========
* बर्फ
जर तुम्ही उन्हात बाहेर जात असाल तर त्याआधी तुम्हाला ज्या भागात घाम येतो त्या भागावर बर्फ चोळा. यामुळे घाम येणे कमी होते.
* बटाटा, काकडीचा रस
जर चेहऱ्याला जास्त घाम येत असेल तर बटाट्याचे तुकडे करून ते चोळल्याने घामापासून आराम मिळतो. चेहऱ्यावर जास्त घाम येत असल्यास काकडीचा रस लावावा आणि काही वेळ तसाच राहू द्याव आणि नंतर धुवून टाकावे.
*मीठ
उन्हाळ्यात जास्त घाम येत असेल तर आहारातील मीठाचे प्रमाण कमी करावे. अतिमीठ खाल्ल्याने देखील घाम जास्त येतो.
(टीप : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांकडून किंवा डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.)
