Home » Face Fat :’या’ घरगुती उपायांनी करा चेहऱ्यावरील चरबी कमी

Face Fat :’या’ घरगुती उपायांनी करा चेहऱ्यावरील चरबी कमी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Face Fat
Share

गतिमान जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या बदललेल्या चुकीच्या सवयींमुळे आज बऱ्याच लोकांना लठ्ठपणाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वजन वाढताना आपल्याला कधीच पटकन लक्षात येत नाही, मात्र वजन वाढल्यानंतर आपण जागी होतो आणि वाढलेल्या वजनामुळे चिंतेत जातो. वजन वाढते म्हणजे केवळ पोट, हात, पाय, मांड्याच जाड होतात असे नाही. वजन वाढले की, आपला चेहरा देखील जाड दिसायला लागतो. आपल्या चेहऱ्यावर चरबी जमा होऊ लागते आणि त्यामुळे आपले गाल गुबगुबीत दिसतात, डबल चीन येते, गळ्यावर देखील चरबी जमा होते, गळा आणि चेहऱ्यामध्ये जागाच राहत नाही. आदी गोष्टींमुळे आपले सौंदर्य कमी होते. सगळ्यांनाच सुंदर दिसायचे असते, आणि त्यासाठी सगळेच प्रयत्न करतात. (HEalth)

अनेकदा खासकरून मुली चेहऱ्यावरील चरबी लपवण्यासाठी मेकअपचा आधार घेतात मात्र मेकअपमुळे ही समस्या तात्पुरती कमी होते पण जर कायमची ही समस्या घालवायची असेल, कमी करायची असेल तर आपण काही छोटे छोटे उपाय करणे आवश्यक आहे. चेहरा गुबगुबित दिसायला लागला की आपला आत्मविश्वास देखील कमी होतो. कधी कधी तर वजन कमी होऊनही चेहऱ्यावरची चरबी मात्र जैसे ठेच असते, ती काही कमी होत नाही, ज्यामुळे आपण स्वतःला आरशात पाहताना अस्वस्थ होतो. मग आज आपण या लेखातून चेहऱ्यावरील चरबी कमी होण्यासाठी काही छोटे छोटे उपाय जाणून घेऊ. (Marathi News)

चेहऱ्याचे सोपे व्यायाम
चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी जर नियमितपणे चेहऱ्याचा व्यायाम केला तर चेहऱ्याच्या स्नायूंना योग्य टोन मिळू शकते. ज्यामुळे चेहरा सडपातळ दिसू लागेल. गाल फुगवणे, ओठ डाव्या-उजव्या बाजूला करणे, दातांवर दाब देऊन जबडा फिरवणे आदी व्यायाम केले तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला दिसेल. चेहऱ्याचे व्यायाम केल्यामुळे चेहऱ्यावरील स्नायू चांगल्या प्रकारे अ‍ॅक्टिव्ह होतात. जर किमान दोन महिने तुम्ही चेहऱ्याचे व्यायाम केले तर नक्कीच फेस फॅट कमी होईल. (Todays Marathi Headline)

Face Fat

मेथीचे दाणे
मेथी दाणा हा आपल्या स्वयंपाकघरातील एक अतिशय उपयुक्त पदार्थ आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स असल्याने ते शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकून चेहऱ्यावरील सूज आणि चरबी कमी करण्यास फायदेशीर ठरतात. रात्री पाण्यात भिजवलेले मेथीचे दाणे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास चेहऱ्यावरील चरबी कमी होण्यास मदत होते. (Social News)

योग्य झोप
झोपेची कमतरता असल्यास शरीरात तणाव वाढतो. याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो तसा चेहऱ्यावर देखील होतो. कमी झोपेमुळे चेहऱ्यावरील चरबी वाढते आणि सूज दिसू लागते. त्यामुळे दररोज प्रत्येकाने किमान ७ ते ८ तासांची चांगली झोप घेणे गरजेचे आहे. यामुळे मेटाबॉलिज्म सुधारते आणि फेस फॅट कमी होण्यास मदत होते. शक्यतो रात्री ९:३० ते १०:३० च्या दरम्यान झोपून सकाळी ५:३० ते ७ च्या दरम्यान उठणे उत्तम मानले जाते. तुमचे आरोग्य आणि फिटनेस मध्ये बदल पाहण्यासाठी तुमची झोपण्याची वेळ बदलून नक्कीच पाहा. (Top Trending News)

जंक फूड टाळा
बिस्कीट, क्रेकर्स, पास्ता, बर्गर आदी पदार्थ रिफाइंड कार्ब्स फॅट्स वाढवण्यासोबत वजन वाढवू शकतात. या रिफाइंड कार्ब्सवर प्रक्रिया केली जात असल्याने यात पोषकतत्वे आणि फायबरची कमतरता असते आणि त्यात साखर जास्त असते. जंक पदार्थ जास्त आणि सतत खाण्याने नक्कीच चेहऱ्यावरील चरबी वाढू शकते. (Latest Marathi News)

पाणी जास्त प्या
योग्य प्रमाणात पाणी पिणे हे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असते. पाणी प्यायल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. जर तुम्हाला ही चेहऱ्यावरील फॅट्स कमी करायचे असतील तर जास्तीत जास्त पाणी प्या. त्यामुळे तुमचे पोट भरलेले राहील. दररोज आठ ग्लास पाणी तुमचा चेहरा सडपातळ होण्यास आणि तुमच्या शरीरातील चरबी कमी करण्यासाठी तुमच्या चयापचय प्रक्रियेस गती देण्यास मदत करू शकते.(Top Marathi News)

==========

हे देखील वाचा : Health : छातीत कफ साठल्यामुळे त्रास होतो? ‘हे’ उपाय करा आणि आराम मिळवा  

Health : बीटचे सेवन केल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

============

लिंबू
लिंबू आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम वाढवण्यास खूपच लाभदायक आहे. लिंबू पाण्यात मिसळून पिणे हा एक उत्तम डिटॉक्स उपाय सुद्धा आहे, जो चेहऱ्यावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी उत्तम ठरतो. सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्यायल्याने तुमचं पोट साफ होतं आणि चेहऱ्याची चरबीही कमी होते. (Top Stories)

मिठाचे प्रमाण कमी
जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात पाणी जमा होते आणि चेहरा सुजलेला दिसतो. प्रोसेस्ड फूड, चिप्स, आणि पॅकेज्ड स्नॅक्समध्ये मीठाचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे ते टाळा. त्याऐवजी ताज्या भाज्या, फळं आणि हेल्दी स्नॅक्स खा. (Social Updates)

(टीप : कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.