महिला कायमच आपल्या हातापायावरील आणि चेहऱ्यावरील अनावश्यक अतिरिक्त केस काढत असतात. हे केस काढण्यासाठी बहुतकरून महिला वॅक्सिंग करतात. असे सांगितले जाते की, वॅक्सिंग केल्यामुळे चेहऱ्यावरचे अतिरिक्त केस निघून जातात आणि त्वचा अधिक मऊ आणि क्लीन होते. नियमित वॅक्सिंग केल्याने केसांची वाढ कमी होते आणि मृत त्वचा देखील सहज काढता येते. परंतु उन्हाळ्यात वॅक्सिंगमुळे अनेकांच्या त्वचेवर पुरळ उठतात आणि काही वेळा त्यांच्यात पू देखील जमा होतो. आपल्या चेहऱ्याची त्वचा नाजूक असते. त्यामुळे जेव्हा चेहऱ्यावर वॅक्सिंग केले जाते त्यानंतर थोडी काळजी घेणे आवश्यक असते. (Beauty Tips)
जर तुम्हाला देखील वॅक्सिंग केल्यानंतर चेहऱ्यावर पुरळ येत असेल तर घाबरण्याची गरज नाही. हे पुरळ साधारणपणे ३-४ दिवसात बरे होतात. चेहऱ्याची योग्य काळजी घेतल्यास ते सहज कमी होऊ शकतात. वॅक्सिंग करताना जिथे जास्त केस असतात त्या भागावर वॅक्स लावून त्यावर स्ट्रिप्स लावून जोरात खेचले जाते आणि नकोसे केस काढले जातात. चेहऱ्यासाठी असेच केले जाते. मात्र त्यामुळे चेहऱ्यावर लालसरपणा, रॅशेस, खाज येणे, जळजळणे आणि वेदना होणे अशी लक्षणे दिसू लागतात. ज्या महिलांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांना ही समस्या आणखी त्रास देऊ शकते. यासाठी आपण घरच्याघरी काही सोपे उपाय करून आपला त्रास बरा करू शकतो. (Waxing)
बर्फ
चेहऱ्यावरील लालसरपणा दूर करण्यासाठी चेहरा बर्फाने शेकू शकता. त्यासाठी एका सुती कापडात बर्फ टाकून त्याने चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. ५ मिनिटे बर्फाने शेकल्यावर चेहऱ्यावरील लालसरपणा कमी झाल्याचे जाणवेल. हा सर्वात उत्तम उपाय आहे. (Skin Care)
कोरफड
वॅक्सिंग केल्यानंतर चेहऱ्याच्या किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर तुम्हाला लालसरपणा दिसत असेल तर तुम्ही कोरफडीचा वापर करू शकता. कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात आणि त्यामुळे त्वचेलाही थंडावा मिळतो. तसेच त्यातील अँटीसेप्टिक घटकांमुळे सूज आणि पुरळ यापासून आराम मिळतो. (Latest Marathi Headline)
साखर
व्हॅक्सिंगनंतर त्वचेवर येणारे पुरळ आणि जळजळ कमी करण्यासाठी घरामध्ये तयार केलेल्या साखरेच्या स्क्रबचा वापर करून पाहावा. हे स्क्रब तयार करण्यासाठी अर्धा कप ऑलिव्ह ऑइल किंवा नारळाच्या तेलामध्ये अर्धा कप साखर मिक्स करावी. हे मिश्रण तयार झाल्यानंतर त्वचेवर लावा आणि हलक्या हाताने स्क्रब करा. (Social Updates)

थंड पाणी
वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेची स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर थंड पाण्याचा स्पर्श करावा आणि त्वचा स्वच्छ करावी. थंड पाण्यामुळे त्वचेवरची सूज कमी होण्यास मदत होते आणि त्वचेची जळजळ कमी होते. वॅक्सिंग केल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. कापसाच्या कपड्याने त्वचा हलक्या हाताने पुसून घ्या. वॅक्सिंग केल्यानंतर २४ तासांपर्यंत गरम पाण्याचा वापर टाळा. (Top Marathi News)
पुदिना
पुदिन्याची पाने बारीक करा आणि ही पेस्ट वॅक्स केलेल्या भागांवर लावा आणि १० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा आणि नारळाचे तेल लावा. असे केल्याने तुम्हाला खाज सुटणे आणि जळजळ होण्यापासून त्वरित आराम मिळेल. (Top Trending Headline)
ओला नपकीन
वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर पुरळ उठत असेल, तर रुमाल किंवा टॉवेल थंड पाण्याने ओला करून त्वचेवर दाबून धरा. याने तुम्हाला १५ मिनिटांत आराम मिळेल.
मॉइस्चरायझर
वॅक्सिंग करून आल्यानंतर चेहरा जास्त कोरडा पडण्याची शक्यता असते. त्यामुळे वॅक्सिंग करून आल्यानंतर चेहरा स्वच्छ करून चेहऱ्यावर मॉइस्चरायझरचा लावावे. त्वचेला मॉइस्चरायझर लावल्यामुळे आर्द्रता मिळते आणि त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. तेलकट त्वचा असलेल्या महिलांनीसुद्धा चेहऱ्याला मॉइस्चरायझर लावावे. चेहऱ्यावर नेहमी हलके आणि नॉन-कॉमेडोजेनिक मॉइस्चरायझर लावावे. (Todays Marathi Headline)
इसेन्शियल ऑइल किंवा नारळ तेल
त्वचेवर लाल पुरळ उठत असल्यास त्वचेवर लॅव्हेंडर तेल लावा. झटपट आराम मिळवायचा असेल तर पेपरमिंट ऑइल लावा. त्वचेवर नारळ तेल आणि टी ट्री ऑइल देखील लावू शकता. या तेलांमधील पोषण तत्त्वांमुळे त्वचेवर येणारी खाज कमी होते. याव्यतिरिक्त तुम्ही बेबी पावडरचाही वापर करू शकता. (Latest Marathi Headline)
=========
=========
काकडी
काकडीमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. चेहऱ्यावर लालसरपणा असेल तर काकडीचे पातळ काप करावेत व ते चेहऱ्यावर ठेवा. हवे असेल तर काकडी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेऊ शकता. चेहऱ्याला मॉइश्चरायझ करण्यासाठी काकडीचा वापर फायदेशीर मानला जातो. काकडी चेहऱ्यावर ठेवल्याने जळजळ व सूज दूर होण्यासही मदत होईल. (Top Stories)
गुलाबजल
वॅक्सिंग केल्यानंतर चेहऱ्यावरील छिद्रे उघडतात आणि त्यात घाण धुळीचे कण अडकण्याची शक्यता असते. ही समस्या टाळण्यासाठी गुलाबजल थेट चेहऱ्यावर स्प्रे करावे. गुलाबजल थंड असून हे चेहऱ्यासाठी टोनरप्रमाणे काम करते. वॅक्सिंगनंतर चेहऱ्याची आग व रेडनेस कमी करण्यासाठीही ते फायदेशीर ठरते. फ्रिजमधील थंडगार गुलाबपाणी लावल्यास त्वचेची पीएच लेव्हल सुधारते. (Social News)
( टीप : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
