अवघ्या काही दिवसातच ३१ डिसेंबरचा दिवस येत आहे. या दिवशी सगळेच नवीन वर्षाचे स्वागत करताना जोरदार पार्टी करतील. ३१ डिसेंबर असल्याने सगळ्यांचाच मस्त पार्टीचा मूड असेल. ३१ डिसेंबरला पार्टी करत, डान्स, मजामस्ती करत नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. प्रत्येक जणं काही दिवस आधीपासूनच ३१ डिसेंबरच्या पार्टीचे प्लॅनिंग करत असतो. आता ३१ डिसेंबरची पार्टी दारू आणि नॉन व्हेज शिवाय पूर्ण कशी होणार. पार्टीचा दुसरा अर्थ दारू असा आहे. आता सर्वच लोकं पार्टीसाठी एकत्र जमलेले असताना मजा, मस्ती आणि गप्पांमध्ये मर्यादेपेक्षा दारूचे सेवन केले जाते. (New Year)
दारू पिताना हे लक्षात येत नाही, मात्र दुसऱ्या दिवशी या अति दारूचा दुष्परिणाम हँगओव्हरच्या रूपात त्रास द्यायला लागतो. रिकाम्या पोटी दारू प्यायल्याने, कमी पाणी प्यायल्याने, जास्त दारू प्यायल्याने हँगओव्हर होतो. हँगओव्हर झाल्यामुळे अनेकांना मोठा त्रास होतो, जसे की डोकेदुखी, डोके जड होणे, मळमळ, चक्कर येणे. हे असे होण्याचे कारण म्हणजे, दारूमुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सची पातळी कमी होते. म्हणूनच डोकेदुखी, तहान, थकवा, अस्वस्थता आणि चिडचिडेपणा अशी हँगओव्हरची लक्षणे दिसू लागतात. (Hang Over)
हँगओव्हर कमी करण्याचे उपाय
– हँगओव्हर उतरवण्यासाठी नारळाचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. नारळपाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात आणि आवश्यक त्या पोषक तत्वांचीही पूर्तता करतात. (Latest Marathi News)
– हँगओव्हरची लक्षणे कमी करण्यासाठी मध हा एक चांगला उपाय आहे. मधामध्ये असलेल्या पोटॅशियममुळे अल्कोहोलचे परिणाम कमी करण्यास मदत होते. मधामध्ये फ्रुक्टोज (Fructose) देखील आढळतो, जो साखरेचा एक प्रकार आहे. यामुळे शरीरातील हँगओव्हरची लक्षणे कमी होतात.

– पुदीना देखील अल्कोहोलच्या नशेपासून मुक्त होण्यास उपयुक्त ठरू शकतो. यासाठी ३-४ पुदिन्याची पाने पाण्यात टाका आणि चांगले उकळा. यानंतर कोमट पुदिन्याचे पाणी प्या. यामुळे पोटातून गॅस निघेल आणि दारूची नशाही हळूहळू निघून जाईल. (Top Marathi Headline)
– आलं हे दारूच्या नशेपासून मुक्त होण्यासाठी आले देखील उपयुक्त ठरू शकते. आले डोकेदुखी, अस्वस्थता आणि अल्कोहोलमुळे होणारी उलट्या कमी करण्यास देखील मदत करू शकते. यासाठी तुम्ही आल्याचा रस काढून त्यात मध मिसळून ते पिऊ शकता.
– दारू प्यायली असेल आणि नशा झाली असेल तर दारूची नशा उतरवण्यासाठी केळी खाऊ शकता. अल्कोहोल हँगओव्हरपासून मुक्त होण्यासाठी केळी खूप उपयुक्त ठरू शकते. केळीमध्ये पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात पोषक तत्वे मिळतील. ज्यामुळे तुमचा थकवा आणि डोकेदुखीपासून आराम मिळेल. (Top Trending News)
– मधाचे सेवन केल्यानेही हँगओव्हर कमी होऊ शकतो. मद्यपानामुळे होणारा दुष्प्रभाव कमी करण्याचे गुणधर्म मधात असतात. तसेच मधाचे सेवन केल्याने पचनासंबंधी असलेल्या समस्यांपासूनही आराम मिळतो.
– मद्यपान जास्त झाले असेल तर त्यामुळे होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी दह्याचे सेवन करणेही फायदेशीर ठरते. मात्र साखर किंवा मीठ न घालता नुसते दही खायचे आहे, हे लक्षात ठेवावे. (Top Stories)
=======
Travelling : भारतातील सर्वोत्तम रोड ट्रिप करायची असेल तर ‘ही’ ठिकाणं आहेत परफेक्ट ऑप्शन
=======
– टोमॅटोमध्ये असलेले फ्रुक्टोज अल्कोहोलला कमी करते आणि शरीराला ताजेतवाने बनवते.
– एक कप कडक कॉफी प्यायल्याने हॅंगओव्हर निघून जाते. एकाच वेळी कॉफी पिण्याऐवजी थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने अर्धा अर्धा कप कॉफी प्या. यामुळे सुस्ती दूर होऊन डोकेदुखीवर आराम मिळतो. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
