Home » Hair Care : पांढरे केस काळे करण्यासाठी सोपे घरगुती उपाय 

Hair Care : पांढरे केस काळे करण्यासाठी सोपे घरगुती उपाय 

by Jyotsna Kulkarni
0 comment
Hair Care
Share

बदलत्या आणि खराब जीवनशैलीचा परिणाम आपल्या संपूर्ण आरोग्यावर होताना दिसत आहे. खूपच कमी वयात अनेक आजार होत आहेत, कमी वयातच केस गळत आहे, त्वचा देखील सुरकटत आहे. थोडक्यात काय तर तर कमी वयातच लोकांना म्हातारपण जाणवायला लागले आहे. यातून वाचायचे असेल तर आपली जीवनशैली उत्तम ठेवणे, सकस पोषक आहार, दररोजचा व्यायाम करणे आवश्यक झाले आहे. सध्याच्या वाढत्या प्रदूषणामुळे, धुळीमुळे केसांच्या विकारांचे प्रमाण देखील कमालीचे वाढल्याचे चित्र आहे. अतिशय तरुण वयात देखील टक्कल पडणे, केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस पांढरे होणे आदी अनेक त्रास होताना दिसत आहे.

केस पांढरे होण्याची समस्या तर कमालीची वाढली आहे. केस पांढरे झाल्यानंतर आपला आत्मविश्वास कमी होतो. कुठे बाहेर निघाल्या देखील लाज वाटते. पार्लरमध्ये जाऊन कलर करणे नेहमी शक्य आणि परवडणारे देखील नसते. शिवाय बाजारात मिळणाऱ्या कलरचा किंवा पार्लरमधील कलरचा काही साइड इफेक्ट झाला तर त्यामुळे होणार दुसरा त्रास देखील महागात पडणारा असू शकतो. मग केस काळे देखील राहावे, त्याचा त्रास देखील आपल्याला होऊ नये आणि पैसे देखील जास्त लागू नये असे छोटे आणि सोपे उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जे करून नक्कीच तुम्ही तुमचे केस काळे करू शकता. (Marathi News)

कढीपत्ता 
केस काळे करण्यासाठी कढीपत्त्याचा उपयोग लाभदायक ठरू शकतो. कडिपत्ता केसांना मुळापासून काळे करतो आणि मजबूत बनविण्यासाठी परिणामकारक ठरतो. यासाठी एका वाटीत नारळाचे तेल घेऊन ते गरम करा. त्यात मूठभर कडिपत्ता टाका आणि उकळवा. त्यानंतर हे तेल थंड झाल्यावर गाळून एका बरणीत ठेवा आठवड्यातून २-३ वेळा या तेलाचा केसांवर उपयोग करा आणि मसाज करा. काही काळातच केस काळे झालेले दिसून येतील (Latest Marathi News)

कोरफड 
पांढरे केस मुळापासून काळे करण्यासाठी कोरफड एक उत्तम उपाय आहे. केसांना कोरफडीचा गर लावल्यानेही केस गळणे आणि पांढरे होणे बंद होतात. यासाठी कोरफडीच्या गरामध्ये लिंबाचा रस टाकून पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट केसांना लावा. (Top Marathi Headline)

Hair Care

मेथी दाणे 
मेथीच्या दाण्यांचा वापर करून तुम्ही केसांना पांढरे होण्यापासून रोखू शकता. यामध्ये असलेले पोटॅशियम केसांशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या दूर करते आणि त्यांना काळे करते. रात्रभर पाण्यात मेथी दाणे भिजवून ठेवा आणि नंतर त्यात आवळा रस टाकून केसांच्या मुळांना नीट मसाज करा आणि तासाभरानंतर केस धुवा.(Todays Marathi Headline)

काळा चहा
चहा पावडरमध्ये नैसर्गिक गुणधर्म असतात जे केसांना काळे करण्यासाठी आणि मजबूत बनविण्यास मदत करतात. पाण्यात १ चमचा चहा पावडर घालून उकळवावे. त्यानंतर ही पावडर आणि चहा केसांना लावावा आणि केसांवर हलक्या हाताने मसाज करावा. १ तासानंतर स्वच्छ पाण्याने केस धुवावे. आठवड्यातून १ वेळा असे केस धुतल्यास उत्तम परिणाम दिसून येईल. (Hair Care Tips)

कांदे 
कांदा फक्त स्वयंपाकासाठी नाही तर तुमचे केस काळे करण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतो. काही दिवस आंघोळ करण्याआधी केसांना कांद्याची पेस्ट किंवा रस लावा. याने पांढरे केस काळे होऊ लागतील. तसेच केसांना चमकही येईल. (Marathi Trending News)

भृंगराज
बाजारामध्ये भृंगराज अत्यंत सहज मिळते. भृंगराज अथवा नारळाच्या तेलाचा वापर तुम्ही केस काळे करण्यासाठी होतो. यासाठी भृंगराज वा नारळाच्या तेलामध्ये तिळाचे तेल मिक्स करा आणि उकळून घ्या. थंड झाल्यावर ते केसांना लावा आणि १ तासाने केस धुवा. केस काळे होण्यासाठी हा घरगुती उपाय उत्तम आहे. (Top Marathi News)

आवळा 
आवळा आरोग्यासाठी फायदेशीर असतो आणि त्याचे अनेक आयुर्वेदिक फायदे देखील आहेत. आवळ्याचे  नियमित सेवन केल्याने पांढऱ्या केसांची समस्याही दूर होऊ शकते. यासाठी आवळा खा आणि मेहंदीमध्ये मिक्स करून केसांना लावा. तसेच आवळा बारीक करुन गरम खोबऱ्याच्या तेलात टाकावा. हे तेल रोज केसांना लावा. (Latest Marathi Headline)

काळी मिरी
काळ्या मिरी आपल्या केसांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठीही उपयोगी ठरते. १ चमचा काळी मिरीची पावडर घेऊन त्यात लिंबाचा रस आणि अर्धा कप दही मिक्स करावे. ही पेस्ट केसांना मुळापासून लावा आणि १ तास तसंच ठेवा आणि मग केस धुवा. आठवड्यातून ३ वेळा या पेस्टचा केसांवर वापर केल्याने नक्कीच फायदा होईल. (Marathi Trending News)

==========

Health : जेवणानंतर अंघोळ करणे योग्य की अयोग्य?

==========

व्यायाम आणि आहार 
लहान वयात केस पांढरे होण्याची समस्या टाळण्यासाठी, भरपूर हिरव्या भाज्या खाव्यात आणि दररोज दोन मिनिटे नखे एकमेकांवर घासण्याचा व्यायाम करावा. जर एखाद्या व्यक्तीने या सर्व गोष्टींचे योग्य पालन केले तर लहान वयात पांढरे झालेले केस पुन्हा काळे होऊ शकतात आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते. (Top Stories)

जास्वंदीचे फुल 
सफेद केसांसाठी जास्वंदीच्या फुलाचा वापर अत्यंत परिणामकारक होतो. केस काळे करण्यासाठी तुम्ही रात्रभर जास्वंद पाण्यात भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी या पाण्याने केस धुवा. नियमित याचा वापर केल्याने केस काळे होण्यास मदत मिळते. (Social News)

(टीपः आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा ब्युटिशियनचा सल्ला नक्की घ्या)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.