Home » ल्युकेरियाच्या समस्येसाठी ‘हे’ आहेत रामबाण उपाय

ल्युकेरियाच्या समस्येसाठी ‘हे’ आहेत रामबाण उपाय

by Jyotsna Kulkarni
0 comment
White Discharge
Share

नेहमीच महिलांना आरोग्याच्या विविध तक्रारी भेडसावत असतात. घरं, संसार, मुलंबाळं, नोकरी आदी सर्वच सांभाळताना त्यांची तारांबळ होतच असते. स्वतःकडे इच्छा असूनही त्यांना लक्ष देता येत नाही. बऱ्याच स्त्रियांना सर्वात जास्त समस्या असते ती, पाळी संदर्भातली. पाळीच्या अनेक तक्रारींमध्ये एक तक्रार असते ती पांढरे पाणी जाण्याची. वैद्यकीय भाषेत याला ल्युकोरिया म्हणतात. ही समस्या केवळ विवाहित किंवा मुलं असलेल्या महिलांनाच असते असे नाही. कोणत्याही वयोगातील महिलांना ही समस्या कमी अधिक प्रमाणावर त्रास देतच असते.

पांढरे पाणी जाणे ही खूपच सामान्य बाब आहे. पाळी झाल्यानंतर अनेकदा महिलांना हा त्रास जाणवतो. मात्र हे पांढरे पाणी जाण्याची कारणं विविध असू शकतात आणि त्याची तीव्रता देखील अनेक गोष्टींवर अवलंबून असते. थोडा पांढरा स्त्राव होणे खूपच सामान्य बाब असली तरी योनीमार्गात जळजळ, खाज सुटणे आणि पांढऱ्या स्रावासह वेदना आदी गोष्टी जर या स्त्रावासोबत असतील तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

मासिक पाळीपूर्वी आणि नंतर पांढरा स्त्राव होतो. याशिवाय गरोदरपणात पांढऱ्या स्राव होऊ शकतो. या पांढऱ्या स्रावामुळे महिलांना खूप अस्वस्थ वाटते. तसेच, यामुळे अशक्तपणा, थकवा आणि संसर्गाच्या तक्रारी येऊ लागतात. मग या आजारावर काही घरगुती उपचार आपण करू शकतो. ते कोणते जाणून घेऊया.

White Discharge

  • पांढऱ्या स्त्रावापासून मुक्त होण्यासाठी मेथीचे दाणे वापरता येतात. एका भांड्यात एक लिटर पाणी उकळून घ्या. त्यात तीन चमचे मेथीचे दाणे टाका आणि 20 मिनिटे उकळा. हे पाणी थंड झाल्यावर सेवन करा. यामुळे लवकर आराम मिळू शकतो.
  • सकाळी पिकलेले केळ खाणे देखील एक सोपा उपाय आहे. केळ्यासोबत तूप खाल्ल्याने खूप लवकर आराम मिळतो. याशिवाय केळी गूळ किंवा साखरेसोबतही खाल्लेली चालते.
  • पांढऱ्या स्रावाच्या समस्येपासून अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असणारे धने देखील आराम देऊ शकतात. हे संसर्ग कमी करण्यास मदत करतात. यासाठी एक चमचा धने एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा आणि हे पाणी गाळून प्या. याचे नियमित सेवन केल्यास लवकर आराम मिळतो.
  • दोन चमचे आवळा पावडर दोन चमचे मधात मिसळून पेस्ट बनवा. दिवसातून दोन ते तीन वेळा खा. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. याचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात, ज्यामुळे पांढऱ्या स्रावाची समस्या दूर होण्यास मदत होते.
  • सफरचंद सायडर व्हिनेगरमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे संक्रमण दूर करण्यात मदत करतात. यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा सफरचंद व्हिनेगर मिसळून प्या. तुम्ही दिवसातून एक किंवा दोनदा याचे सेवन करू शकता.
  • अंजीर फळ किंवा ड्राय अंजीर रात्रभर पाण्यात ४ सुके अंजीर भिजवून सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते खाल्ल्यास ही समस्या दूर होते.

======

हे देखील वाचा :  मुलांना एनर्जी ड्रिंक देता का? उद्भवू शकतात या मोठ्या समस्या

======

  • पांढऱ्या स्रावाची समस्या दूर करण्यासाठी तांदूळ स्टार्च अर्थात तांदूळ शिजवलेलं पाणी नियमितपणे पिऊ शकता. सातत्याने असा त्रास होत असेल तर तांदळाचा स्टार्च पिणे लाभदायक असू शकते.
  • तुळशीची पाने पाण्यात बारीक करून त्यात मध मिसळून हे मिश्रण घेतल्याने पांढऱ्या स्रावाची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. हे मिश्रण दिवसातून दोनदा घ्यावे.
  • ल्युकेरियाच्या समस्येमध्ये भेंडीचं पाणी खूप फायदेशीर आहे. 100 ग्रॅम भेंडी आणि अर्धा लीटर पाणी घ्या. हे पाणी निम्मे होईपर्यंत पाण्यात भेंडी उकळा. पाणी थंड झाल्यावर त्यात थोडंसं मध मिसळून प्यावे. हा उपाय ही समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.