Home » Home Remedies for Monsoon Diseases: पावसाळ्यात सतत होणाऱ्या आजारांवर करा ‘हे’ घरगुती उपाय !

Home Remedies for Monsoon Diseases: पावसाळ्यात सतत होणाऱ्या आजारांवर करा ‘हे’ घरगुती उपाय !

पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते.आणि त्यामुळे लोक जास्त आजारी पडतात.

0 comment
Home Remedies for Monsoon Diseases
Share

उन्हाळ्यानंतर येणारा ऋतु म्हणजे पावसाळा आणि या ऋतुमध्ये येताच आजारांचा धोका अधिक वाढतो . त्याचबरोबर पावसात भिजल्याने सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजार सतत होत असतात .लहान मुले आणि वृद्ध तसेच कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्यांना या ऋतूत सर्वाधिक धोका असतो.पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते.आणि त्यामुळे लोक जास्त आजारी पडतात. अनेकांना सतत आजारी पडल्यावर औषधे खाणे आवडत नाही आणि त्यामुळे तोंडाची चव ही जाते. जर तुम्हालाही औषधे घेणे आवडत नसेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. कारण ज्यांना औषधे खाणे आवडत नाही त्यांच्यासाठी आणि आज काही सोपे अणि घरच्या घरी करता येणारे काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे  ठणठणीत बरे व्हाल आणि तुम्हाला औषधे खाण्याची गरज भासणार नाही.(Home Remedies for Monsoon Diseases)
Home Remedies for Monsoon Diseases

Home Remedies for Monsoon Diseases

–  तुळस प्रत्येकाच्या गरज सहज उपलब्ध असते आणि हे एक नैसर्गिक औषध आहे ज्याचा वापर सर्दी, खोकला आणि तापापासून आराम मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो. तुळशीची ताजी पाने वापरून तुम्ही त्याचा काढा बनवून पिऊ शकता. तुळशीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि सामान्य सर्दीची लक्षणे कमी करण्यास मदत करतात
 
– सर्दी झाल्यास व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ किंवा फळे खाऊ शकतात. शिमला मिरची आणि संत्री खाणे देखील फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. 
 
– पावसाळ्यात आयुर्वेदात औषधी मानल्या जाणाऱ्या आले, हळद, लसूण, दालचिनी आणि काळी मिरीचे सेवन सुरू करा. या सर्व गोष्टी गरम असतात. तसेच पावसात भिजल्यावरही थंडीपासून बचाव होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामध्ये असणारे अँटीबॅक्टेरियल, अँटीमाइक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म प्रतिकारशक्ती वाढवतात. 
Home Remedies for Monsoon Diseases

Home Remedies for Monsoon Diseases

 
– वरील उपायाव्यतिरिक्त तुम्ही हर्बल पिण्याचे पाणी देखील पिऊ शकता. आजकाल फ्लूची लक्षणे दूर करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी साध्या पाण्याऐवजी हर्बल पाणी प्यावे. वाळलेले आले, कोथिंबीर आणि तुळशीची पाने उकळून तुम्ही ते घरी बनवू शकता.
हळदीमध्ये अँटी-व्हायरल गुणधर्म आणि अँटी-ऑक्सिडेंट्स असतात जे या ऋतूत सर्दी-खोकला आणि व्हायरल फिव्हरपासून संरक्षण करण्यास मदत करतात. दूध हे पोषक तत्वांनी समृद्ध मानले जाते. अशावेळी दुधात हळद घालून त्याची शक्ती आणखी वाढवता येते. एक ग्लास कोमट दुधात थोडी हळद मिसळून रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या. हे आपल्याला चांगली झोप घेण्यास देखील मदत करू शकते. 
 
– गरम पाण्यात आल्याचे टुकडे आणि दालचिनीचे काही तुकडे उकळून चहा बनवा. चवीसाठी या चहामध्ये थोडे मध घालता येते.हे पेय प्यायल्याने नाकाबरोबरच घशाला सुद्धा फायदा होतो. 
============================
हे देखील वाचा: Intermittent Fasting: इंटरमिटेंट फास्टिंगने खरंच वजन कमी होते का? जाणून घ्या या बद्दल अधिक 
============================
– सर्दी खोकल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता किंवा डिहायड्रेशन ची स्थिती निर्माण होते. हे टाळण्यासाठी काकडी, टोमॅटो,दूधी भोपळा , आणि पालक अशा पाण्याने युक्त भाज्या खा. यासोबतच रसाळ फळे सुद्धा खावीत.(Home Remedies for Monsoon Diseases)
 
– पावसाळ्यात तुम्ही तुमच्या घरात या औषधी वनस्पतीची वाफ करू शकता. मोहरी, हळद, गिलोय आणि लोबान यांसारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात जे आरोग्यासाठी उपयुक्त असतात.
 
मध, लिंबू आणि वेलची या तीन गोष्टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. या तिघांचे कॉम्बिनेशन आरोग्याला आश्चर्यकारक फायदे देऊ शकते. अर्धा चमचा मधात चिमूटभर वेलची आणि थोडा लिंबाचा रस मिसळून घेतल्यास खोकला आणि सर्दीपासून बराच आराम मिळतो. तसेच व्हायरल फिव्हर आणि आजारी पडण्यापासून रोखण्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर ठरू शकतो.
 
(डिस्क्लेमर: वरील लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे यातील उपाय करण्याआधी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या.) 

Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.