Home remedies for hair : आजकाल बिघडलेल्या लाइफस्टाइलमुळे केसगळती, केसांमधील कोंडा आणि केस पांढरे होण्याची समस्या उद्भवली जाते. कमी वयातील लोकांमध्ये केसांसंदर्भातील काही समस्या पाहिल्या जातात. या समस्या आपले सौंदर्य बिघडवतात आणि आत्मविश्वासही कमी करतात. केसगळतीचे मुख्य कारण म्हणजे हार्मोनल बदल, तणाव आणि खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करणे.
घनदाट केसांसाठी काहीजण महागडे प्रोडक्ट्स वापरतात. तर काही केमिकल ट्रीटमेंट करतात. पण काहीवेळेस या प्रोडक्ट्सचे विपरित परिणाम दिसून येतात. आयुर्वेदातील काही उपाय केसांसाठी केल्यास नक्कीच केस वाढण्यास मदत होईल.
शिरोधारा
शिरोधारा एक पारंपारिक आयुर्वेदिक उपचार आहे. यामध्ये तेल हळूहळू कपाळावर घातले जाते. यामुळे तणाव कमी होण्यासह केसांची मूळ मजबूत होण्यास मदत होते. दरम्यान, हा उपाय आयुर्वेदातील एक्सपर्ट्सच्या मदतीने करा.
शिरो अभ्यंग
शिरो अभ्यंग म्हणजे केसांचे मसाज करणे. भृंगराज आणि आवळा सारख्या हर्बल तेलाने केसांचे मसाज करावे. यामुळे केसांना पोषण मिळते आणि केसांची मूळ मजबूत होतात. केस गळतीची समस्या कमी होण्यासाठी आठवड्यातून दोनदा भृंगराज किंवा आवळ्याच्या तेलाने केसांना मसाज करा. (Home remedies for hair)
नस्य कर्म
नस्य कर्म नाकासंदर्भातील उपचार आहे. यामध्ये अणु तेलाचा वापर केला जातो. नस्य कर्मामध्ये शरिरातील समस्या संतुलित करण्यास मदत केली जाते. यामुळे केसांचे आरोग्यही राखले जाते. याशिवाय डाएटमध्ये व्हिटॅमिन बी-12 आणि डी संदर्भातील पदार्थांचा समावेश करावा. यामुळे केस मजबूत होण्यास मदत होईल.